सुमनांजली बनसोडे

Romance

3  

सुमनांजली बनसोडे

Romance

तुझ्या आठवणीचे निर्माल्य

तुझ्या आठवणीचे निर्माल्य

3 mins
354


   उन्हाळ्यातल्या वळवाच्या पावसा सारखी तुझी आठवण मन भडभडून गेलं... तशीच वर्गात बसले... तुझ्या साठी लिहिलेली एकनएक पोस्ट चाळायला लागले .. पोस्ट कुठली ती... ती तर निर्माल्यच... कधी काळी मी च माझ्या ह्दयोश्वरीला अर्पण केलेल्या तुला लिहीलेल्या सर्व कविता कीतीतरी वेळा वाचुन थकले... मी..

अन् अचानक भरभरुन आलं...आणि मग पुन्हा लिहायला बसले... 

पण काय लिहु... काहीच सुचत नाही आज .. बघ ना वंदु... शब्दांनीही पाठ फिरवली आज... काळा प्रमाणे तुझ्यासाठी काहीतरी लिहावं म्हणुन.. शाळेत आल्यापासुन प्रयत्न करतेय.. पण छान..ग.. वंदु.. सगळच निरर्थक.. 

आज सकाळ पासुन काय झालं कुणास ठाऊक ..डझनभर पान ही चुरगाळून झाली असतील .. आतापर्यंत नेमकी कुठुन सुरुवात करावी .. काहीच कळत नाही .. विचारांच्या गर्दिच संमेलनच भरलयं जणु... 

कुणीतरी संथ पाण्यात दगड फेकाव आणि असंख्य तरंग त्यावर निर्माण व्हावेत तशी अवस्था झाली आहे.. कुठुन सुरुवात करावी काहीच सुचत नाही.. पण सुरुवात तर करायला हवी ना ... 


वंदु.. तुझी बोलण्याची सुरुवात.. चार पाच दिवसांनी भेट झाल्यास 

"सृष्टि त असुन दृष्टित न पडणारी माझी प्राणप्रिये.. मन्या.." 

अशी करतेस .. कीती छान बोलतेस ग वंदु... मला कधी अस बोलताच आलं नाही... पण गरज ही नाही म्हणा...

कारण अंतराने जरी एकमेकींपासुन दुर असलो तरी मनानं आपण तितकाच जवळ आहोत...

 तुझ्या घरातील दिवाना वरती पहिल्या भेटीतल्या सरी ने मी तर केव्हाच कोंडून ठेवलयं तुला .. माझ्या मनाच्या गाभा-यात .. माझ्या पापण्याच्या मिठीत.. डोळ्याच्या मिठीत ... तु आणि मी... मी आणि तु... बस्स... हो ना वंदु... ??

त्या दिवशी तु पहिल्यांदाच बोलणार होतीस.. कसला तरी कागद समोर करत त..त..प..प.. करत होतीस... 

त्या दिवाना वरची पहीली भेट कशी विसरेन गं वंदु... ?? किती गोंधळुन गेली होतीस... तुझी तशी अवस्था बघुन किती उडवली होती गं मी तुझी.. मी जाते..मी जाते....असं म्हणत... हळुच तुला मिठी मारली... तुही मला जवळ घेत हातात हात घेतलास... तुझ्या हाताचा स्पर्श हवा असताना मी तेवढ्यात हात मागे घेतला.... तेवढ्यात माझ्याकडे पाहुन तु पुटपुटली... 

तु जाणार नाही याची खात्री आहे मला .. माझ्या मन्या... 

प्रेम करतोस ना माझ्यावर..???

मी ही ..हो ..म्हणत कुशीत शिरले...

ती रात्र आत्ताहि आठवते .. अगदी जशीच्या तशी... कदाचित तुला ही... हो ना ग वंदु... ???

 मलमली तारुण्य आपले..

पुर्ण रात्र ते पांघरावे...

मोकळ्या केसात माझ्या 

तु मी जीवाला गुंतवावे...

मी तुझ्यासाठी गाणं म्हटलं... कविता म्हटली... आणि तु त्या आनंदाने ऐकल्या ही.. कीती छान मन्या लिहीतेस तु कविता.. अशी तुझी वाक्य असतात... 

उपमा, उत्प्रेक्षा.. रुपके... अंलकाराची अगदी बरसात करते मी तुझ्यावर आणि तुला ते आवडत नाही..  

खोटी स्तुती नको करु मी काही फारसी सुदंर नाही... म्हणुन तु मला 

"शब्दप्रभु" मन्या अस म्हणतेस..  

तुला आठवत का.ग माझी पहीली कविता फक्त तुझ्याचसाठी होती... 

"स्वप्नसई" आठवत ना तुला.. रोज उशीरा येणं... आणि उशीरा जाणं... हा नियम तुझाच होता... म्हणुन 

स्वप्नागत आपली सखी येणे आणि जाणे म्हणुनच "स्वप्नसई" नाव देत कविता लिहीली होती...

तु खुप हसली होतीस तेंव्हा... 

आठवत ना तुला...

न जाणे हा काय ही कितीदा मला तुझ्या सोबतचे नाते बदलायला लावणार आहे... आत्ता पर्यंत मी तुझी मैत्रीण होते... नंतर तु प्रियसी.. नि आता.....??? 

आता कोण आहे मी तुझी..????

प्रत्येक क्षणातुन दाटलेला तुझ्याच आठवणीचा गडद वास... नाही का पुसता येणार हा काळ... पाटीवरच्या चित्रासारखा...दुर फेकणा-या काळोख्यात घुमत आहे लक्ष हाका... कुठपर्यंत हे सारे...???

न संपण्यासाठीच काही वेदना 

कीती व्याकुळ झाली आहेस 

तु सुद्धा सहज करताना ...


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance