सुमनांजली बनसोडे

Others

2  

सुमनांजली बनसोडे

Others

निःशब्द भावना

निःशब्द भावना

3 mins
166


आज जरा मन सुन्न झालं... खरचं कोरोना इतका भयानक आहे... हे प्रत्यक्ष पाहीले... ते कसे... आज सकाळी शाळेच्या वाटेने जात होते समोर ॲब्युलन्स दिसली ... रिकामी असेल कदाचित असा विचार मनात चालुच होता... पण माझ्याच शाळेच्या दिशेने माझ्या पुढेच दिसत होती.. आणि शाळेत स्टाफ सोबत चर्चा करताना कळले चार दिवसापुर्वी मरण पावलेल्या 52 वर्षीय व्यक्तीचा आज बाप ही गेला पाॅझीटिव्ह होता कदाचित ... ऐकवल्या ही जात नव्हतं... घरी न्यायचं नाही ... गावाच्या बाहेर फक्य घरातील दोन व्यक्ती या आणि अंतविधी करावा .. अस ही कानावर पडलचं ... काय ही परिस्थिती... ऐवढ सगळ चालु असतानाच पुर्ण स्टाफ आमचा .. सरपंच , अंगणवाडी कार्यकर्त्या.. मदतनिस... सर्व निघालो गावात.. कुटुंब सर्वेक्षण ... लसीकरण प्रबोधन करायला ... रस्त्याने , गल्लीने चाललो खरे.. पण अतिशय भयानक परिस्थीती... एक एक वाक्य कानावर येऊ लागलं.. आम्ही कुठे फिरायला जात नाही .. आम्हाला कोरोना कसा होईल... असचं मरण आलं तरी चालेल पण लस घेणार नाही... मास्क बिस्क नाही लावला तरी काही फरक पडतं नाही... असे आणि असे कीतीतरी वाक्य शब्द कानावर येत होते ...


वाटत होतं ... आता काय म्हणावं ... राग तर येत होता ... पण कसं आणि काय समजावुन सांगावं... अस करत करतं ... फिदी फिदी हसणारे ही दिसले... मनात राग तर येतच होता ... पण नाईलाज ... आणि अशा ठिकाणी आलो जिथे आमचा लाडका विद्यार्थी , अतिशय हुशार असलेला विद्यार्थी .. ज्याच्या वडीलांना त्ता सार्थ अभिमान होता अशा विद्यार्थ्याच्या घरापुढे येऊन आम्ही सगळे उभे त्याचे वडील ही पाॅझीटिव्ह ... घाटीत ॲडमिट... विचारपुस केली असता कळलं आता बरी आहे तब्तेत ... जाडजुड धिप्पाड 6 फुटाचा माणुस... असेलच बरा... अस मनात विचार करत .. तेथुन निघालो आम्ही सगळे ... अस करत करत ... जेमतेम अर्ध्या तासात घरी पोहचले... आणि 10 मिनिटात फोन वाजला... अंगणवाडी कार्यकर्त्या मॅडम चा फोन ... उचलला .. आणि कानावर विश्वास बसेना... 


रणवीरचे वडील वारले ... काय म्हणायच्या आत फोन कट... ह्या आठवड्यातली चौथी व्यक्ती कोरोना ने मरण पावलेली... काय चालले ... ह्या गावात... अहो रोज चार ते पाच पाॅझीटिव्ह .. आणि दररोज मरणाची बातमी... काय आहे हे... काही ही समजेना.... यात नेमकी चुक कुणाची... शासनाची, प्रशासनाची की गावक-यांची ... शिक्षकांची, अंगणवाडी कार्यकर्त्या, मदतनीस, आशाकार्यकर्त्या..की सरपंच.. कुणाची नेमकी कुणाची... आज सकाळची अंतविधीची आग ही थंड झाली नसेल तर लगेच दुसरी बातमी .. 


आपले आता तरी डोळे उघडावे... या साठी तर कदाचित भगवंताने या गावाला शिक्षा म्हणून तर पाहिले नसेल ... असा ही विचार मनात येतो... खरचं जेंव्हा आपल्या जवळचा कुणीतरी अशा परिस्थितीत जातो ना ... तेंव्हा मन हेलावुन जाते हो... रणवीर जरी विद्यार्थी होता ना तरी तो शाळेचा आत्मा आहे... आणि त्याच्यावर ऐवढे दुःख... या क्षणाला .. नाही पाहवतं भगवंता... थांबव रे बाबा.. हे कुठेतरी... नाहीतर लोकांना तरी अक्कल दे... मास्क लावायची .. सर्व निर्बंध पाळायची.. खरचं भगवंता ... लोकांना नेण्याची घाई करतोस तस आला की थोडीथोडी अक्कल पण देत जा रे भगवंता ... म्हणजे कमीत कमी घरातील असा कर्ता पुरुष तरी जाण्याचं थांबेल... खरचं थांबेल...


Rate this content
Log in