सुमनांजली बनसोडे

Others

3  

सुमनांजली बनसोडे

Others

नाना.....

नाना.....

2 mins
195


  फार वर्षांपूर्वी मी तुम्हांला एक पत्र लिहिले होते. काही मनोगत मांडणारे होते... त्यानंतर मी आजवर तुम्हांला काहीच सांगायच्या भानगडीत पडले नाही..

कारण आज तुम्हाला जाऊन बरोबर 24वर्ष झालीत...

ह्या 24 वर्षात कधी ना कधी, कुठे ना कुठे तुमची आठवण आलीच...


तुम्हांला आम्ही चारही भावंडांनी काहीच त्रास दिला नाही.. आणि झालाच तरी तुम्ही तो फार करून घेतला नाही.. हा गुण तुमच्याकडून सतत शिकायचा प्रयत्न मात्र मी नेहमीच केला..आयुष्यात तुमच्याकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी मी शिकायचा सतत प्रयत्न केला..

"आपण स्वत:ला बदलू. शकतो इतरांना नाही.." हे सतत तुम्ही कृतीतून दाखवत गेलात..!

  आज तुमची पुणूयतीथी ..तुमच्या फोटोसमोर दंडवत करून अभिवादन करायची वेळ 24 वर्षा पासुन आमच्यावर आली...


आपला इतिहास आपणच लिहून ठेवायचा म्हणून तुमच्यावर खूप लिहिले..

आईवरही लिहिले बरेच पण ते फार उशीरा.. पण तिलाही भरपूर आनंद देता आला. तीही आहे त्या परिस्थितीत आनंद व समाधानाने जगते आहे .. तूम्ही गेल्यावरही मुले, सुना, जावई, नातवंडांसह जीवनाचा तीने खूप आनंद घेतला. .


नाना,

आज ही 1994/95 चे वर्ष आठवते*  

 तुम्हांला कॅन्सर ने घेरले... 1996 चा तो ऑक्टोंबर महिना...आणि डाॅक्टरांनी कॅन्सरची 3rd स्टेज सांगताना ...फक्त 15 च दिवसांचे सोबती आहात ... हे तर ऐकुनच पायाखालची जमीन सरकली...

... 

पण तुमची इच्छाशक्ती तशी जबरदस्तच..! वयाच्या 53 व्या वर्षातही कार्यरत असलेले तुम्ही कॅन्सरने २७ दिवस झुंज दिलीत.. वाटत होतं तुम्ही बाबासाहेबांचे अनुयायी.. भगवान बुद्धा शिवाय तुम्ही कुठेही नतमस्तक केलेच नाही... समता सैनिक दला पासून ते नामांतर चळवळित सक्रीय सहभागी झालात.... ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या चांगल्या तुम्ही तुमच्या जीवनात घडवल्या म्हणुन अस वाटायचं काहीतरी चमत्कार होईल..

चांगल्या व्यक्ती सोबत चांगलच होत असतं ...  पण तसे घडले नाही..तुमची झुंज, तुमचा लढा अयशस्वी झाला..! 


  आपलं माणूस आपल्याला हवंच असतं..तसे आजही तुम्ही आमच्या रक्तात वास करून आहातच..!


तुमचे अनेक गुण आमच्यात आहेत..

तुमचा प्रत्येक विचार आमच्या धमन्यामधून, कृतीतून व मनातून वाहतो आहे..तुमचा चळवळीचा...आणि लिखानाचा वारसा मी निष्ठेने सांभाळणार आहेच..! हे सारं तुम्ही जाणताच.. तुमचा आमच्यावर प्रचंड विश्वास..! कसलीच बंधने कधी आम्हाला घातली नाहीत..आम्ही सारे त्यात खरे उतरल्याचे समाधान कायम तुमच्या चेहऱ्यावर सर्वांना दिसत होतेच..!


     नाना, ...कितीही लिहिले तरीही तुमच्याबद्दल लिहिणे थांबू शकणार नाही..तुमच्या आठवणी व किस्से कितीही लिहिले तरी संपणार नाहीच..!

पण आज विनम्र अभिवादन..म्हणावे..

हीच वेळ नियतिने आमच्यावर आणुन दिलेली आहेच...



Rate this content
Log in