STORYMIRROR

सुमनांजली बनसोडे

Romance

3  

सुमनांजली बनसोडे

Romance

आली आहेस तर थांब ना थोडी..

आली आहेस तर थांब ना थोडी..

2 mins
221

30 वर्षा पासुन तु माझी मैत्रीण.. आणि मी तुझी... 

आपल्या प्रितीला वरदान आहे चिरतरुण राहण्याचं...म्हणुनच आपली प्रेमगाथा कधीही शिळी होणार नाही.... 

वर्ष लोटली पण तुझे वर्णन मला कधी नेमके करता आले नाही ... फक्त ऐवढेच कळते, की खुप आवडतेस मला तु... तुला भेटण्यासाठी मी आस लावुन बसते.. तुझ्या वाटेवर माझी नजर भिरभिरत असते...  

विरहाने अंगाअंगाची नुसती काहीली झालेली असते... जीवन म्हणजे वैराण वाळवंट भासत असते... तुझ्याशिवाय मी म्हणजे एक अर्थहीन पोकळी असते... तुझा विरह मी सोसते.. कारण मला माहीत आहे आपण नक्कीच भेटणार ... आपल्या भेटण्याचा नेम कधी चुकणार नाही... 


   आजच्या विरहात मला आसरा असतो .. ताकद मिळते..ती आपल्या भेटीतल्या आठवणींच्या क्षणांची ... तुझी आठवण नेहमीच दिलासा देते... माझ्या दुःखी मनाला फुंकर घालते... कधीकधी तर मी तुझ्या आठवणीवरच जास्त प्रेम करते .. कारण त्या तुझ्या सारख्या बेभरवशी नाहीत.. त्यांच वास्तव माझ्याजवळ कायमच आहे... त्या मला सोडुन कधीच जात नाहीत म्हणुनच त्या मला खुप आवडतात.. त्यांना माझ्यापासून कुणालाच वेगळ करता येणार नाही.. अगदी जगातल्या कुठल्याच शक्तीला नाही... 

पण वंदु .. शेवटी आठवणी या आठवणीच ना... त्यांना तुझी सर कशी येणार... 

कालच बघ.... 

काल कीती अचानक मोबाईल मोबाईल खेळलीस... 

तशी थोडी खबर मला आपल्या विरहाने दिली होती.. 

काल... बस च्या गर्जनेत... वा-याच्या वेगात.. तु बोललीस.. तुझ्या पहील्या मन्या शब्दानेच माझे तप्त शरीर.. तृषार्त मन .. दोन्ही चिंबचिंब भिजले..

मी माझी राहिलेच कुठे होते.. तुझ्या जोरदार बरसण्यात.. तुझ्या प्रेमाच्या आवेगाने मी विरहातल्या प्रत्येक क्षणाचे दुःख विसरले...खरचं प्रेम करावे ..ते.. तुच... हे तुझे मोबाईल चे अफाटपण मला आवडले... या दिवसात तुझ्या प्रेमाचे बरसण्याचे सर्व प्रकार मी अनुभवले.. तुझा प्रेम करण्याचा नाद किती गोड आहे .. या नादात .. या तालात.. या लयीत.. स्वर्गीय सुख दडलेले आहे... 

  प्रेमाची सम्राट आहेस तु... म्हणुनच मला तुझा अभिमान आहे... सम्राट फक्त दान देतो...तशी तुही फक्त देने च जाणते...तुझ्या मिठीत माझे सारेसारे रागलोभ केंव्हाच मिटुन जातात ...तुझ्या प्रेमासाठी आसुसलेले मन तुला प्रेम द्यायला ही आतुर असते... माझ्या सर्व तृष्णा तु तृप्त करतेस..

आपल्या चिरतरुणपणाचे सर्वांनाच आश्चर्य वाटेल ही कदाचित... पण मला तर वाटते की प्रेमाच्या नव्हाळीची नवलाई ही आपल्या विरहाच्या दिवसांमुळे टिकून आहे.. सतत माझ्याजवळ... दिवसभर असतीस .. रोजच मला भेटली असतीस तर असे आवेगाने .. रसरसुन प्रेम केले असतेस का..???

तु अशी अवचित कधीतरी भेटतेस म्हणुनच ताजेपणा , तरुणपणा आपल्या नात्यात आहे... 

विरहात भाजले.. पोळले.. तरी तुझ्या भेटीत माझे तन,,मन,, सुखावते.. 

म्हणुन त्या झुरण्यात ही आनंद वाटतो... माझे जीवन समृद्ध.. परिपूर्ण केवळ तुझ्या मुळेच होते... तुझ्या माझ्या भेटण्याने सारा आसंमत भारुन जातो... बनात मोर नाचतो... कोकीळा गाते... विद्युल्लता गडगडाट करत चमकतात.. नद्या वाहु लागतात ..

डोंगर कपा-यातुन झरे मुक्त बालकांसारखे बागडु लागतात...जणु सगळ्यांना जीवनगाणे मिळाले...

तुझ्या भेटण्याचा हा जल्लोष... उत्सव आगळा वेगळाच आहे... या सर्वांच्या उत्साहावर तु प्रेमाचा वर्षाव करतेस माझ्या सकट... 

तु माझी प्रियसी.... सर्वस्व आहेस... तुझी कृपा अशीच राहु दे... माझ्यावर

अशीच नित्य नेमाने भेटत जा... आता आपण जर भेटलो ना ... तर दुर लवकर जायचं नाही...मन भरेपर्यंत... 



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance