सुमनांजली बनसोडे

Romance

3  

सुमनांजली बनसोडे

Romance

पहिल्या प्रेमाच्या आठवणी

पहिल्या प्रेमाच्या आठवणी

1 min
609


     जीवनाच्या काटेरी वेलीवर मैत्रीच्या प्रेमाचे सुंदर फुल फुलत असते... त्याला फुलवावे तितके ते फुलते.. मैत्री म्हणजे मन व विचार यांची गुंफण होय... मैत्रीच्या नात्याची खरी सुरुवात ही मुळी विश्वासावरच अवलंबुन असते... कोणतही नातं असो , मग तिथे प्रेम ,जिव्हाळा, आणि आंतरिक ओढ असते.. तिथे विश्वास असतोच... मैत्रीचे नाते व्यक्तीच्या जीवनातील अविभाज्य अंग आहे... मैत्रीशिवाय माणुस परिपूर्ण होवू शकत नाही... मैत्रीच्या नात्यांमधे एकमेकाना गुणदोषांसकट स्विकारुन एकमेकांना निःस्वार्थ मित्र प्रेम केले जाते... जसे हे मैत्रीचे नाते माणसाला हसवते तसेच रडवते ही.... 


बऱ्याचदा अशा पवित्र नात्यांमधे अनेक वाईट गैरसमज निर्माण होतात व ती तुटली जातात... व मनं विदीर्ण होतात... प्रत्येक व्यक्तीला मैत्रीच्या रुपात जगण्यासाठी हवा असतो एक आधार... कारण मैत्रीत स्वार्थ, फसवेगिरी, यांना कदापिही स्थान नसते... मैत्रीला वय, जात, लिंग यांचे बंधन नसते... कारण मैत्री ही पवित्र तेजोमय असल्यामुळे सर्व बंधने जळून जातात... 


"मैत्रीला प्रेमाची झालर असते.." एवढ्यासाठीच... आपले मोहपाश कितीही तोडायचे ठरविले तरीही ते तोडता येणार नाही... कारण ते कच्च्या धाग्यांनी थोडेच बांधले गेलेत... ते तर मनाच्या मंदिरातील पक्क्या धाग्यांनी गुंफले गेलेत... बेमालूमपणे एकमेकांना कधीच न सांगण्यासाठीच, आपण आहोत तोपर्यंत कायम जपायचे आपण आपली नाती गोती... कधी हसत, कधी रडत... तर कधी रागावत... व त्यासाठीच होते आपली आठवण...


तो एक क्षण आठवला म्हणून...


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance