STORYMIRROR

सुमनांजली बनसोडे

Romance

2  

सुमनांजली बनसोडे

Romance

तुझी मिठी अशीच राहु दे...

तुझी मिठी अशीच राहु दे...

2 mins
247

तुझी मिठी अशीच राहु दे... 


माझ्या पेटलेल्या ह्रदयाला चिंबचिंब भिजव.... 


आठवतोय तुला तो दिवस... भर दुपारी तुझी वाट पाहत... बसस्टॅन्ड वर ऊभी असताना ... तु आलीस ... तुझ्या समवेत मी गाडीवर बसले... तुझ्या खांद्यावर हात ठेवत... पोटावर हात ठेवत तुझ्या सोबत... घराकडे निघालो पण... जी माझ्या मनाची घालमेल... तीच तुझ्या ही मनाची अवस्था होती... चेह-यावर दिसत होतं ते स्पष्ट... एकमेकींच्या ही... 

दरवाजा उघडताच कडाडून गच्च मिठीत शिरलो... 

अचानक मृगाने सापळा विणला.... आकाशात ढग घिरट्या घालु लागले...

तप्त जमिनीला ओंजळीने पाणी पाजुन न्हाऊ घालण्यासाठी ..वारा बेभान वाहु लागला... अशीच एकंदरीत अवस्था आपल्या दोघींची ही... ह्या सगळ्यात तुला भिती वाटावी आणि तु मला जवळ घेतलस.. जसं स्वप्नाला कवेत घ्यावं... 

    आभाळ फाटुन आलं... वीज कडाडुन संचारावी... अगदी तशीच मीही तुझ्या मिठीत शिरले... तुझ्या माझ्यात आतापर्यंत लाजेचा पदर पांघरणारी "मी" धाडकन तुझ्या कुशीत शिरले... एक क्षण माझ्या डोळ्यात बघुन गालातच तु हसलीस... जणु त्या संधीची वाटच बघत होतीस... त्या मोकळ्या विशाल घरात फक्त तुझी मिठी तेवढी सुरक्षित हवीहवीसी वाटली... माझ्या कुशीत घट्ट अलिगंन देत तु मला तुझ्याच बाहोत घेत होतीस... आपल्या त्या 30 वर्षाची मैत्री आज पहील्या प्रेमाची सर तुझ्या प्रेमानं तुडुंब भरुन माझ्या केसांच्या बटेवरुन वाहात पुन्हा तुझ्या ह्दयात शिरु पहात होती... 

मी आणि तु सुद्धा स्वतःला हरवुन पापण्या मिटुन मग्न होतो की... कसलीच जाण नव्हती... हातात हात घालुन... एकमेकींच्या बाहोत..कुशीत.. असतानाच .. अचानक तुझी मिठी सैल झाली... हातही हातातुन सुटु लागले.... पुर आला होता पापण्यांना... तसाच भावने लाही.... मी सुद्धा भरकटले... कदाचित तो क्षण होता मुळी तुला मला एकत्र करायला... 

 ती पहीली प्रेमाची सर आजही मनात जपुन ठेवलीय...


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance