दुर्भाग्य....
दुर्भाग्य....
आयुष्याच्या सुदंर वळणावर
सापडलेलं प्रतिबिंब ते तुझं होतं
हरवल ते मन माझं होतं
देऊ केलेलं ते सौभाग्य मला ते तुझं होतं
तु नाकारलं ते दुर्भाग्य माझं होतं...
मी खुप वेळा प्रयत्न केला माझं प्रेम व्यक्त करण्याचा ..मी तुझ्यासाठी झगडलेयं, पण सार अपेक्षेपेक्षा निरर्थक ठरलयं.. तुला मी आवडते की नाही हे मला ठाऊक नसतानाही तुझ्यावर मी प्रेम करत राहीले.. माझी अपेक्षा तुझ्या होकाराची नव्हती.. ते तुझ्यावर विसंबून होतं..
तु मनानं नितांत सुदंर आहेस .. पण तुझ्या मोहक रुपापेक्षा बरचं काही बघितलं होतं मी तुझ्यात.. तु मला समजुन घेतल नाहीस.. माझ्या भावनांचा विचार केला नाहीस..आणि माझी भावनाच अशी झाली की, दरवेळी तुच समजुन घ्यायला हवसं मला समजुन घेण्याची जबाबदारी तु कधी उचललीच नाही.. माझ्या
भावना विश्वात तु रमला च नाहीस.. माझं मन तुझ झालच नाही.. माझ्या मनाचा गाभारा तुझ्या प्रेमानं अधिकच सुगंधी झाला होता.. आणि मनाच्या एका कोप-यात तुझी मोहक मुर्ति कायमची कोरली गेली .. पण तुला ते कळलच नाही
आठवते तुला ते अनोळखी दिवस .. त्या दिवशी तुझ्या पावलांना मिळालेली दुस-या दोन पावलांची साथ.. पण आयुष्यातलं वास्तविकतेचं गणित उलगडल्यावर कुणाचा "पती" हे लेबलं तुला चिकटलयं.. पण भुतकाळातील पाश तोडणं अवघड जाईल तुला... तु माझ्या जीवनात एकदम स्वप्नातल्या परीसारखा आलास .. श्रावणातला वारा अंगाला स्पर्शुन जावा आणि अलगद जाग यावी तसा तु आलास आणि निघुन जात आहेस...
तुझ्या विरहाची दाहकता पचवन्या इतकी खरचं आता माझ्यात ताकद नाहीये...
दवबिंदु सारखं आपलं नातं सुदंर ..पण काही क्षणाचचं.. रक्तानात्याचा म्हण किंवा जातीपातीचा म्हण विचार तसा नाहीच .. फक्त हे जीवन जगायचयं.... तुझविण ....