STORYMIRROR

सुमनांजली बनसोडे

Others

3  

सुमनांजली बनसोडे

Others

आईसाठी

आईसाठी

1 min
170

*नोकरीच्या निमित्ताने धामणगावात आले... अन् 5 जुलै 2000 रोजी तुझी गाठ पडली... आणि त्याच क्षणी तुझ्या त्या वात्सल्य सिंधु आईप्रमाणे आपण मायलेकी झालो... तेंव्हा पासुन ते आतापर्यंतचे आपले हे नाते बहतर गेले खरे...*

 *पण ...पण आज* *कानावर विश्वास बसेना गं... तू गेल्याची बातमी कानावर पडली... खूप कोसळले गं.... अगं जरी ही तू जन्म दिला नसलास तरी ही तु आई... अगं तुच म्हणायची ना... पोटात वाढवल्यावरच आपलं मुल होतं अस नाही... आपण दोघी तर झालोच की माय लेकी.... बघ बरं...*


   *आपल्या नात्यात जात च काय धर्म ही आडवा आला नाही... लोक जेंव्हा आपल्याला पाहायचे तेंव्हा ते ही पाहणारे अवाक व्हायचे ग....*

   *हिंदु-मुस्लिम हे समीकरणच आपण मायलेकीने बदलुन टाकलं गं...* *काय ती ओढ.. काय ते प्रेम... तुझे ते वात्सल्य... अगं पण आता नाही ना हे सगळ... तु तर गेलीस ग सोडून .. मागचा पुढचा काहीही* *विचार न करता.... आज कळाले गं....*

 

*"स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी..."*


*खरचं गं... आई... अम्मी... अग ... आम्ही पोरके झालोत... अगं तुच तर बाबांना वचन दिलेले ना... मी मुलांचा सांभाळ करेल... नातवंडाना पाहील...*

*सुनांकडे लक्ष देईल.. आणि सगळेच डाव अर्ध्यावर सोडुन गेलीस.... का केलस असं... अग ... आमच्या कुणामधे ही तुझा जीव सुद्धा अडकला नाही का ग... सांग.... आपली सन 2000 पासुनची मैत्री... मायलेकीच नातं ... कस विसरलीस गं...* 


 *काय.गं.... तुझ्या जाण्याने इतक्या वेदना कुणाला सांगु.... फाटलेले आभाळ.. आता कसे शिवू.... सांग ना आई....*


*तुझं अस्तित्व म्हणजे...*

*माझा श्वास आहे...*

*तुझ्या शिवाय माझं आयुष्य...* 

*नुसताच एक भास आहे ....*


*तुझीच पोरकी लेक*


Rate this content
Log in