Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

Jyoti gosavi

Comedy


4.0  

Jyoti gosavi

Comedy


उंदीर मामा ची करामत

उंदीर मामा ची करामत

1 min 171 1 min 171

उंदीर मामाच्या विषयाला अनुसरून, माझा देखील मजेशीर अनुभव. 

नुकतेच नवीन लग्न झाले होते .लग्नाला दोन चार महिने झाले असतील. चाळीमध्ये राहत होतो. चाळीच्या दोन खोल्या, त्यामध्ये पाच माणसे. आम्ही दोघे ,सासुबाई, दीर, आणि भाचा, त्यामुळे स्वयंपाक घर म्हणजे आमची बेडरूम. 

त्यामुळे तेथे उंदीर मामाचा वावर होता. रात्री झोपल्यानंतर शेल्फ, फळी, याच्यावरील भांडी धडाधड अंगावरती पडत असत. एकदा मध्यरात्री जागी झाले आणि डोळे उघडून पाहते तर आमचे नवरोजी हातात काठी घेऊन उभे .

क्षणभर मला काही समजलेच नाही. नंतर भीती वाटली. अरे बाबा हा माणूस मध्यरात्री हातात काठी घेऊन करतो काय? मला मारतो की काय ?तेव्हा काही स्वभावाचा अंदाज नव्हता .मग मी विचारले आहो काय करता? त्यावर त्यांनी हातातली काठी "ठक ठक "आवाज करत वरच्या कौलांवरती आपटली, आणि असेच इकडे "ठक ठक" कर तिकडे "ठक ठक" कर असे करत करत कौलातून दोन उंदीर पळाले. तेव्हा मला समजले की, हे उंदरांना पळवण्यासाठी काठी घेऊन उभे आहेत. तेव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला.


Rate this content
Log in

More marathi story from Jyoti gosavi

Similar marathi story from Comedy