तूझी माझी आशिकी (भाग ६)❤️
तूझी माझी आशिकी (भाग ६)❤️
रीयाला श्रेयशचा खूप राग आलेला असतो..ती घरी पोहचते आणि पाहते तर श्रेयशचे मेसेज आलेले असतात..
"हाय" श्रेयश
"काय करतेस? मी आज बाबांसोबत बाहेर गेलेलो म्हणून आलो नाही क्लासला.. " श्रेयश
"काय शिकवल आज?" श्रेयश
रीया त्याचे मेसेज पाहते पण reply देत नाही..
"काय झाल या मूलीला.. काल पर्यंत तर बोलत होती माज्याशी.. जाऊदे मेसेज बघेल तेव्हा देईल reply. " श्रेयश स्वताशी बोलतो
श्रेयश सकाळी फोन चेक करतो पण तरी रीयाचा एकही reply नसतो.. तो परत एक मेसेज करतो
"Good morning" श्रेयश
आज श्रेयश क्लासला लवकर येतो रीयाशी बोलता यावे म्हणून.. तितक्यात रीया येते,
"हेय.. रीया" श्रेयश
"काय झाल? मी काल क्लासला आलो नाही म्हणून रागवलीस का?"श्रेयश हसत बोलतो
रीया त्याला इग्नोर करते व बेंचवर जाऊन बसते..
"काय झाल हीला.. का रागवली असेल माज्यावर?" श्रेयश स्वताशी
श्रेयश तिच्याकडे मधे मधे बघत असतो..पण ती एकदाही त्याच्याकडे बघत नाही.. तीचा राग लवकर जाणारा नव्हता.
क्लास सुटल्यावर रीया लवकर घरी जाते..
"हेय नेहा.. रीयाला काय झाल?" श्रेयश
"कूठे काय? माज्याशी तर बरोबर बोलतेय" नेहा
श्रेयशला काय करावे समजत नाही..घरी पोहचून तो मेसेज करतो,
"काय झाल? Silent treatment आहे का?" श्रेयश
"बाप रे..एका मूलीच्या नाकावर किती राग येतो.."श्रेयश
"एकदा सांग तरी मी काय केल ते.." श्रेयश
रीया त्याचा मेसेज पाहते व शेवटी न राहवून reply देते..
"का बोलू मी तूज्याशी? मला सर्व समजल आहे जे तू आकाशला बोललास" रीया
"काय बोललो मी?"श्रेयश
"हेच मी तूज्या मागे लागलीये व तूला प्रपोज केला"रीया
"काय!!! अगं मी अस का बोलेन आणि तू मला कूठे प्रपोज केलास" श्रेयश
"ते मला माहित नाही पण तो असच बोलला मला" रीया
'देवा शपत मी अस बोललो नाही..थोडा तरी विश्वास ठेव.." श्रेयश
"एकदा ठेऊन बघितला आणि त्याच फळ पण भेटले" रीया
"तू direct माज्यावर आरोप करतेय..ठीक आहे उदया भेट क्लास सुटल्यावर व आकाशला माज्यासमोर विचार" श्रेयश
"ओके बाय" रीया
"बाय" श्रेयश
दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने सकाळचा क्लास असतो.. श्रेयशला आकाशचा खूप राग आलेला असतो..कधी त्याला विचारतो अस वाटत असत.
क्लास सुटल्यावर,
"आकाश थांब तूला कायतरी विचारायचे आहे" श्रेयश
"काय झालं? लवकर बोल मला जायच आहे" आकाश
तितक्यात रीया येते, तिघे एकत्र थांबलेले असतात,
"काय रे आकाश परवा मला काय बोललास तू" रीया चिडून विचारते
"काय बोललो मी? " आकाश
"थांब मी आठवण करून देतो.. हेच मी तूला बोललो की रीया माज्या मागे लागली आहे वैगरे.. खरं खरं सांग मी असं कधी बोललो? " श्रेयश
"ते ते मी.. मस्करी करत होतो" आकाश
"लाज नाही वाटत कोणत्या मूली बदद्ल वाईट बोलायला, माज्या जागी तूझी बहिण असती तर.." रीया
"Im sorry..मी परत अशी मस्करी करणार नाही.. पण खरच श्रेयश अस काहीच बोलला नाही.." आकाश
"तूज्यामूळॆ रीयाचा किती गैरसमज झाला.. परत अस करशील तर याद राख.. निघ आता" श्रेयश
आकाश निघून जातो,
"आता तरी तूझी खात्री पटली ना.. उगाच माज्यावर चिडतेस आणि आरोप करतेस" श्रेयश
"हममम" रीया
"आता तरी बोलशील का की नुसते हममम.."श्रेयश
"Sorry.. मी आकाशच ऐकून तूला बोलले.. मला खूप राग आलेला" रीया
"Its ok..पण परत तूला माज्याविषयी काय डाऊट असतील तर आधी मला विचार" श्रेयश
"Ok.. चल मी निघते.. नंतर बोलू बाय.." रीया
आता कूठे रीयाच्या जीवात जीव आला..
"वेडीच आहे मी किती वाईट विचार केला श्रेयश बदद्ल.. पण तो तसा नाहिये" रीया पूटपूटते
घरी जाऊन रीया maths चा अभ्यास करते.. दुसऱ्या दिवशी टेस्ट असते.. आजचा दिवस तिचा चांगला जातो..दुसऱ्या दिवशी श्रेयशचा birthday असतो
"अरे उदया श्रेयशचा birthday आहे.. मी त्याला रात्री १२ वाजता वीश करेन.." रीया
ती रात्र होण्याची वाट बघते व बरोबर १२ला मेसेज करते..
"Wishing you very happiest birthday.. Gbu.." रीया
"झोपला की काय.. किती लवकर झोपतो.. स्वताच्या birthday ला कोण लवकर झोपतात.." रीया
दुसऱ्या दिवशी सकाळी श्रेयश तिचा मेसेज वाचतो,
"Thank you so much..तू मला first वीश केलेस..आता दिवस छान जाईल.. " श्रेयश
"Enjoy your day.. Bubye" रीया
श्रेयश कोलेजला जातो.. तितक्यात राज येतो,
"Happy birthday भावा.." राज त्याला मिठी मारत,
"Thank you यार" श्रेयश
"पार्टी पाहिजे आता" राज
"हो रे देतो संध्याकाळी क्लास सुटल्यावर.. चल आता lecture ला जाऊ" श्रेयश
आज रीया क्लासला येऊन त्याची वाट पाहत असते.. तितक्यात तो येतो..ब्लॅक शर्ट, हेअर कट करून..अगदी हिरो सारखा..
"अगं लक्ष कूठे आहे तूझं?" नेहा
"श्रेयशकडे" रीया
"काय?" नेहा
"काय नाही.. Sums बघ आता सर येतील टेस्ट घ्यायला" रीया
सर्वजण श्रेयशला वीश करत असतात रीया मात्र अभ्यास करत असते..
"काही लोकांना birthday माहीत असून वीश करत नाहीत" श्रेयश रीयाकडे पाहत बोलतो..
रीया सर्व ऐकत असते पण उत्तर देत नाही.. गालातल्या गालात हसते..
क्लास सुटल्यावर..श्रेयश सर्वांना चाॅकलेटस् देत असतो व रीयासाठी स्पेशली २ dairy milk आणलेले असतात.
"Happy birthday श्रेयश" रीया
"खूपच लवकर.. Thank you..हे घे तूज्यासाठी dairy milk" श्रेयश
"अरे नको १ चाॅकलेट दे बस" रीया
"अगं घेना तूज्यासाठीच आणलय.. अस पण लहान मूलांना चाॅकलेट दिल्यावर त्यांचा राग लगेच जातो" श्रेयश तिला चिडवत बोलतो.
"ओय मी लहान नाहिये हा" रीया रागाचा आव आणत बोलते..
" लहान मूलांसारखीच तर वागतेस.. चिडतेस, रागावतेस माज्यावर.. चिडकी" श्रेयश
"हो का.. मी असच नाही रागवले त्याला कारण होत" रीया
"ते जाऊदे मी मूलांना treat देतोय येशील का तू? " श्रेयश
"नको मला उशीर होईल.. तू enjoy कर" रीया
"ओके मी तूला special treat देईन नंतर" श्रेयश
तितक्यात काजल येते व त्याच्या हातातून dairy milk घेते,
"रीया तूला नको आहे तर मी घेते" काजल
"अगं घे ना त्यात काय" रीया
"चला आम्ही येतो आता.. बाय" श्रेयश
"हो बाय" काजल व रीया.
रीया खूप खूश असते आज.. सर्व नाॅर्मल झाल्यामूळॆ.
आता रीया व श्रेयश रोज एकमेकांशी बोलू लागतात..त्यांची मैत्री होऊन १ महिना होतो..नकळत दोघे एकमेकांकडे ओढले जात होते.. ऋणानूबंध घटट् होत चालले होते..
ते एकमेकांना आवडू लागतात पण कोणीच समोरून कबूल करत नाही..खरंं तर श्रेयशला त्यांच्या मैत्रीला अजून थोडा वेळ दयायचा असतो.. एकमेकांना समजून घेण्यासाठी.
"कसा आहे हा मूलगा.. रोज बोलतो आम्ही मेसेज व फोन वर.. प्रेम असून पण प्रपोज करत नाही.. काय करू मीच करू का?" रीया स्वताशी बोलते.
"नको नको..मी नाही करणार.. घेऊ दे त्याला वेळ" रीया स्वताशी बोलते.
तर पहिले कोण प्रपोज करणार..श्रेयश की रीया? पाहू पूढील भागात.
Stay tuned.. Thank you!

