Rohini Kamble

Romance

3  

Rohini Kamble

Romance

रेहना है तेरे दिल मे(भाग 1)

रेहना है तेरे दिल मे(भाग 1)

3 mins
211


आज रविवार असल्यामूळॆ घरात सर्व आरामात चाललं होत, लगबग नव्हती. राघवची आई त्याला उठवायला त्याच्या रूममध्ये येते..

"राघव, ए राघव उठ राजा उशीर होतोय..विसरलास का आपल्याला जायच आहे.. " आई

आई खिडकीवरून पडदे बाजूला करते व सकाळचे कोवळॆ ऊन बेडरूम मध्ये येते..

"काय गं आई झोपू देना.. आज असं पण रविवार आहे..आणि रविवारची एकच सुटटी असते मला.. " राघव तोंडावर चादर घेत‌ बोलतो.

"अरे अस काय करतोस आपल्याला मूलगी पहायला जायच आहे ना.. घडयाळात बघ ११ वाजले" आई राघवच्या जवळ बसून‌ बोलते.

"आई तू मला‌‌ न‌ विचारता का असे ठरवतेस? मी तूला सांगितल आहे ना मला इतक्यात लग्न नाही करायच.. मी कोणतीही मूलगी पाहणार नाही" राघव

"अरे एकदा पहायला काय हरकत आहे.." आई

"नाही म्हणजे नाही..झोपू‌दे गं मला" राघव

"ठीक आहे फ्रेश होऊन ये मी नाश्ता करायला घेते" असे म्हणत आई चेहरा पाडून किचनमध्ये निघून जाते.

"तर राघव म्हणजे आपल्या कथेचा नायक वय २७, उंची ५'१०, दिसायला गोरा, काळॆ बोलके डोळॆ, स्मार्ट , well मेन्टेन बॉडी जी त्याच्या पेर्सनालिटीला सूट करत होती"

राघव हा नामांकीत आयटी कंपनी मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर असतो व घरचं सर्व व्यवस्थित असत.

राघव नाश्ता करायला येतो,

"वाह! आज आलू पराठा! वो भी बटर मारके..आई मला १ जास्त देना" राघव

आई त्याला शांतपणे वाढते..

"साॅरी ना आई तू रागवू नको‌‌स ना.. मी असं कूठे म्हणतोय की मला‌ लग्न नाही करायचय, पण थोडा वेळ हवाय" राघव

"मला या वर्षात तूज्या लग्नाचा बार उडवून द्यायचा आहे बस.. या वर्षी आपल्या घरी सून आली पाहिजे मला आता जबाबदारीतून मोकळॆ कर " आई

"तूला कोणती मूलगी पसंत आहे का? आम्हाला सांग तसे.. शेवटी तूझी पसंत ती आमची पसंत" आई

"तस काय नाही गं आई.. पण मी अजून मेंटली प्रिपेर नाही शिवाय माझे करिअर सेट नाही" राघव

"बाबांनी तूला त्यांचा बिझनेस सांभाळायला सांगीतले तर तू नकार दिलास.. उगाच आता कारणे देऊ नकोस, मला तूझं काही एक ऐकायच नाही" आई

"हा मेरी मदर इंडिया.. मी विचार करेन बस खूश.. बरं बाबा आणि रितू कूठे आहेत?" राघव

"अरे बाबा सकाळीच वाॅक करायला गेलेत अजून आले नाहीत व रीतू मैत्रिणीकडे गेली आहे.." आई

राघवच्या घरी आई, बाबा व‌ लहान बहिण असा छोटा व सूखी परिवार होता.. रीतू यंदा बी काॅमच्या दुसऱ्या वर्षाला असते.

"चल आई मी जरा विनयकडे जाऊन‌ येतो..खूप दिवस त्याला भेटलो‌ नाही आणि आज त्याचा वाढदिवस पण आहे" राघव

"ठीक आहे जा.. लवकर घरी ये पण.. आणि माज्याकडून त्याला शुभेच्छा दे" आई

"हो आई नक्की" राघव

राघव कार घेऊन‌ निघतो.. व विनयच्या घराखाली येऊन त्याला हाक मारतो,

"विनय, ए विन्या खाली ये लवकर" राघव

"तूच ये वर, चहा घेऊ एकत्र.." विनय

"अरे नको माझा चहा झालाय..तू घे आणि ये खाली" राघव

"थांब आलोच.. " विनय ५ मिनीटांनी खाली येतो,

"हैप्पी बर्थडे भावा" राघव

"थँक यू ‌, बाय द वे कूठे जायचं ठरले आहे?"विनय

"बाहेर लंच करू मस्त नोनवेज.. मग मरीनला फिरू.. वाटेत संदीपला पण घेऊ.. चल बस कार मध्ये.." राघव

तिघेजण शाळॆपासूनचे घटट्‍‍ मित्र..जिथे जाणार तिथे सोबत.. वाटेत संदीपला पिकअप करतात.. बाहेर छान लंच करतात.. व बीचवर फिरायला जातात.

(नायकाची ओळख झाली..पूढील भागात आपण नायिकेला भेटू )

Stay tuned.. Thank you


क्रमश:

कथा आवडल्यास कंमेंट देण्यास विसरू नका!



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance