तुझी माझी आशिकी - भाग ५
तुझी माझी आशिकी - भाग ५
दुसऱ्या दिवशी, संध्याकाळी ५ वाजता रीया श्रेयशला फोन करते..
"हेलो.. श्रेयश" रीया
"हा बोलना ग" श्रेयश
"अरे आज physics चे lecture आहे ना.. काय होमर्वक दिलाय का? २ दिवस क्लासला सुट्टी होती म्हणून माज्या लक्षात नाहिये.." रीया
"अगं होमर्वक तर नाहिये पण मिस न्यू चापटर शिकवणार आहे.. तर वाचून ये.. मिस प्रश्न विचारू शकते" श्रेयश
"बरं चालेल.. आणि एक विचारायच होत" रीया
"हा विचार ना," श्रेयश
"तू परवा आमच्या सोबत गणपती बघायला का आला नाहिस? आम्ही सर्वजण नेहाकडे गेलेलो मग सरांनकडे वैगरे.. " रीया
"हो सांगितल मला राज ने.. ते मला थोड बरं वाटत नव्हत म्हणून आलो नाही" श्रेयश
"ओके मग आज येतोयस ना क्लासला?" रीया
"हो.. मग काय आता तर मला रोजच याव लागेल.. तूला पहायला" श्रेयश मनातल्या मनात..😅
"काही म्हणालास का? मला मनातला ऐकू येत हा.. सो बी केअरफूल" रीया हसत म्हणते 😂
"काय बोलतेस खरच की काय.?" श्रेयश 😯
"नाही रे मी मस्करी करतेय"रीया 😄
"थेंक गाॅड.. बाय द वे तूझ दूपारच कोलेज असत ना जात नाहीस का तू?" श्रेयश
"जाते कधी कधी, कोणी येत नाही lecture ला मग मी जाऊन काय करू सो ओनली practical ला जाते.. उदया जाईन.. physics चे practical आहे.." रीया
"ओह आय सी.. माझ पण कोलेज थोड तसच आहे.. पण मी रोज जातो" श्रेयश
"हो ना.. मूलींना बघायला वाटत" रीया 😉
"नाही ग.. अस पण तूज्या सारख्या सूंदर मूली नाहीत इथे" श्रेयश हसून बोलतो.. 😊
"हो का..अरे तूझा birthday कधी असतो? " रीया
"का गं? काय surprise देणार आहेस का? Actually ३ दिवसांनी आहे.. "श्रेयश
"ओह नाइस, नाही सहज विचारल" रीया
"अजून काय बोलतेस" श्रेयश
"काय नाही तू खूप रिकामा आहेस वाटत आता म्हणून एवढे बोलतोयस माज्याशी" रीया
"हाहा.. थोडं बाहेर आलेलो दुकानात" श्रेयश
"बरं चल फोन ठेवते.. क्लासची वेळ होइल आता.."रीया
"ठीक आहे क्लास मध्ये भेटू.." श्रेयश
रीया फोन ठेवते व नाचू लागते..💃
"काय गं नाचतेस कशाला? काय झाल अचानक" आई
"काय नाही मन खूप प्रसन्न झालय.. आपण क्लास सुटल्यावर आपल्या इथे गणपती पाहायला जाऊ. " रीया
"बरं चालेल तू fresh हो.. मी चहा टाकते.. " आई
क्लासची वेळ होइ पर्यंत रीया physics चा चापटर वाचते..काहीही झाल तरी तिच मन अभ्यासावरून कधी विचलीत होत नसे..
रीया व नेहा दोघी एकाच बेंच वर बसायच्या, पण आज नेहा आली नव्हती त्यामूळॆ रीया एकटीच बसलेली असते..
थोडया वेळॆत श्रेयश येतो व रीयाला एकटी पाहून तिच्या बाजूला बसतो.. तशी रीया दचकते.. तिचे हृदयाचे ठोके वाढतात. ती मनातल्या मनात लाजते.. 😍
श्रेयश रीयाकडे पाहत गाणे गातो..
"नज़र के सामने जिगर के पास
नज़र के सामने जिगर के पास
कोई रहता है वो हो तुम..."❤️
रीया श्रेयश कडे पाहते तर तो नजर चोरतो व दुसरीकडे बघतो..
तितक्यात मिस येतात,
"काय रे श्रेयश आज तू पहिल्या बेंचवर कसा? नेहमी मागे बसतोस ना? " मिस
"हो मला ते मागून board वरचे दिसत नाही म्हणून पूढे आलो" श्रेयश 😬
"बरं ठीक आहे बस.." मिस
"आज आपण physics चे sums करणार आहोत.. मी board वर काही formula देतेय ते लिहून घ्या.." मिस
सर्वजण लिहत असतात.. मधे मधे श्रेयश रीयाकडे चोरून बघत असतो..
क्लास सुटल्यावर रीया घाई मधे घरी जायला निघते..
"आई मी आले ग, तूझी तयारी झाली का? आपल्याला गणपती पाहायला जायच आहे.."रीया
"हो ग थांब बाजूची काकी पण येतेय.. व चित्राला पण सोबत घेऊ" आई
चित्रा म्हणजे रीयाची लहान बहिण.. शाळॆत शिकत असते
व एक भाऊ असतो.. रीया सर्वात मोठी पण लाडकी असते.
सर्वजण गणपती पाहायला जातात.. तितक्यात रीयाला श्रेयशचा मेसेज येतो,
"हाय.. आज खूप घाईत होतीस.. any problem?" श्रेयश
"नाही मी आमच्या इथे गणपती पाहायला आले आहे.." रीया
"ओहो! BF सोबत का?" श्रेयश मुददाम विचारतो..😜
"नाही रे घरच्यांसोबत आलीये.. and for your kind info माझा BF नाही.." रीया 🙄
"ओके..thats great.. छत्री नेलीस ना? बाहेर पाऊस पडतोय.." श्रेयश
"हो.." रीया
"ओके देन यू हॅव फन.. आपण रात्री बोलू.. बाय" श्रेयश 🤗
रात्री रीया श्रेयशच्या मेसेजची वाट पाहत असते पण तो करत नाही मग ती झोपी जाते.. दुसऱ्या दिवशी श्रेयश तिला मेसेज करतो,
good morning..
"सो साॅरी काल मी तूला मेसेज करणार होतो पण मला अचानक झोप लागली" श्रेयश
"हममम..कुठे आहेस?"रीया
"chemistry lab मधे आहे.. सुटेन आता.. आणि तू?" श्रेयश
"मी कोलेजला जायला निघाले आहे.. माझं practical आहे सो.." रीया
"ओके ठीक आहे, नंतर बोलू.. नीट जा.. बाय" श्रेयश 😃
"हो बाय.." रीया
रीया कोलेजला जाते practical अटेंड करते व थोडा वेळ केंटिनला बसून घरी जाण्यास निघते.. व घरी येऊन ती कालचे physics चे sums सोडवत बसते..
"श्रेयशला मेसेज करू का? नको जाऊदे त्याच सकाळचं कोलेज असत झोपला असेल.." रीया मनात बोलते 🤔
आज नेहा व रीया एका बेंच वर बसलेले असतात.. श्रेयश अजून आलेला नसतो म्हणून रीया सारखी दरवाजाकडे बघत असते..
"काय गं काल का आली नाहीस? " रीया
"अगं गणपतीच विसर्जन होत ना म्हणून.. तू मला मिस केलस ना? " नेहा
"नाही ग वेडे मला खूप शांत शांत वाटत होत.. मस्त वाटले.. नाही तर तूझी कानात भूनभून चालू असते.. मधमाशी सारखी" रीया हसत बोलते🤣
"चल खोटारडी.. मला माहितीये तूला माज्याशिवाय करमत नाही..तू सारखी दरवाजाकडे का बघतेय, कोणाची वाट बघतेस?"नेहा 😒
"कोणाची नाही.. चल आपण maths चे sums सोडवू सर येतील इतक्यात.." रीया
क्लास सुटल्यावर,
"हेय राज.. आज श्रेयश का आला नाही? actually माझी maths ची बूक आहे त्याच्याकडे.." रीया
"तो बाबांसोबत बाहेर गेलाय, कायतरी काम आहे सो" राज
"ठीक आहे" रीया
राज निघून गेल्यावर,
"रीया, थांब ना.. तूला कायतरी सांगायच होत.."आकाश
"हो सांग ना.. " रीया
"त्यादिवशी मला श्रेयश तूज्या बदद्ल सांगत होता" आकाश
"काय बोलला ?" रीया
"हेच की, रीया माज्या मागे लागली आहे व तिने मला प्रपोज देखिल केले" आकाश
हे ऐकून रीयाचा रागाचा पारा चढला..
"काहीही काय बोलतोय तू.. डोक ठिकान्यावर आहे का? आम्ही एकमेकांशी अजून नीट बोलत देखिल नाही" रीया 😠
"जे खरं आहे तेच बोलतोय मी.. " आकाश
आता मात्र रीयाच्या डोळ्यात अंगार पेटला होता..
"श्रेयश असे कसे करू शकतो.. माझच चुकल जे मी त्याच्या प्रेमात पडले..स्वताला समजतो काय तो.. आता त्याची खैर नाही" रीया स्वताशी बडबडते.. 😡
रीया रागारागात घरी निघाली..
(क्रमशः)

