Rohini Kamble

Romance Fantasy Others

3  

Rohini Kamble

Romance Fantasy Others

तूझी माझी आशिकी(भाग२)❤️

तूझी माझी आशिकी(भाग२)❤️

2 mins
200


रीया क्लासवरून घरी येते,

"काय गं रीयू काय बनवू तूला खायला?" रीयाची आई.

"काही नको मी पाणीपूरी खाऊन आली आहे" रीया.

"ठीक आहे मी जेवण बनवायला घेते" आई.

रीया आणि आईच नात मैत्रिणी सारख होत. ती आईला सर्व शेअर करत असे. आईला तिचे सर्व मित्रमैत्रिणी माहित होते.

दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने सकाळचा क्लास होता. बायोलोजी चा तास होता.

रीया मिस ला काही प्रश्न विचारत होती.

"बापरे किती प्रश्न पडतात या मूलीला, माझ काय खरं नाही" श्रेयश.

"काय बोललास का तू?" राज.

"कुठे काय.. काय नाही" श्रेयश.

खर तर श्रेयश रीयाकडे पाहत असतो, बोलताना तिचे होणारे हावभाव याचे निरीक्षण करत असतो.

क्लास सुटल्यावर,

"अगं काजल थांब ना, तूला काहितरी विचारायच होत" श्रेयश.

"तू चुकीचा अर्थ नको काढूस, रीयाचा कोणी 'बी. एफ' आहे का?

"तशी काजल किंचिकत हसली, नाही रे एक होता वाटत पण ब्रेकप झालय" काजल.

"अच्छा म्हणून ती एवढी शांत शांत असते तर" श्रेयश.

"काय म्हणालास?" काजल.

"काय नाही चल निघतो बाय.. "श्रेयश.

दुसऱ्यादिवशी क्लास मध्ये,

"अग रीया तुला एक सांगायला विसरले मी, काल श्रेयश मला विचारत होता कि तूझा कोणी 'बी. एफ' आहे का? " काजल.

"ऒहहह मग तू काय बोललीस? " रीया.

"काय नाही एक होता पण ब्रेकप झाल वैगरे." काजल.

"वेडी कशाला त्याला सांगितलस, तू पण ना!! यापूढे कोणाला काय सांगत बसू नकोस." रीया.

"हो गं बाई, चल आता रिवीजन करुया" काजल.

काजलने रीयाच्या डोक्यात किडा टाकला होता, ती आता विचार करत बसली‌ होती.

" श्रेयशने असे का विचारले असेल? काय असेल त्याच्या मनात नक्की? असे खूप प्रश्न तिच्या मनाला पडत होते. "

घरी आल्यावर रात्री पण ती त्याच्या विचारात झोपून गेली.

"श्रेयश ने रीयाचा हात घटट्‍‍ धरला होता,

" रीयू बेबी माझ खूप प्रेम आहे तुज्यावर, आणि मी खूप सिरीअस आहे. मला साथ देशील ना? " श्रेयश.

"हो.. आयुष्यभर!!! " रीया.

असे बोलून रीयाने श्रेयशच्या खांद्यावर डोके टेकवले. तशी रीयाला झोपेतून अचानक जाग आली,

"अरेच्चा! स्वप्न होते, पण अशक्य आहे हे." रीया.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance