STORYMIRROR

Rohini Kamble

Romance

3  

Rohini Kamble

Romance

तूझी माझी आशिकी - भाग १

तूझी माझी आशिकी - भाग १

2 mins
281

"आई छत्री दे ग लवकर उशीर होतोय क्लास ला जायला"‌ अशी हाक ऐकू‌ येते.

संध्याकाळ झालेली असते व बाहेर पाऊस पडत असतो. रीया भराभर पावले टाकत होती, तसा क्लास तिच्या घराच्या जवळ होता पण थोडा उशीर झालेला.


तर "रीया" म्हणजे आपल्या कथेची नायिका. दिसायला जास्त सुंदर नाही पण गव्हाळ वर्ण, कुरळॆ केस, काळॆ बोलके डोळॆ.. ती आधी पासूनच अभ्यासु होती. यंदा बारावीच वर्ष विज्ञान शाखेला. आज रीया ने लाइट पिंक कलर चा चुडिदार घातला होता, कपाळ।वर छोटी टिकली व हातात ब्रेसलेट, सुंदर दिसत होती ती.

"हाय रीया!! तू कालचा होमर्वक केलास का? आज आपला तास आहे केमिस्त्री चा" काजल.

"नाही ग मला थोडे डाउट्‍‍स आहेत ते मी सरांना विचारणार आहे" रीया.

"आपण आज न्यू चापटर स्टार्ट करणार आहोत, सर्वांनी वाचायला घ्या" सर.

सर्व जण अभ्यास करत असतात तितक्यात तिथे एक नवीन मुलगा येतो" मे आय कम इन सर"?

"येस कम इन श्रेयश" सर.

"श्रेयश दिसायला गोरा, घारे डोळॆ, हैंडसम होता. त्याच्या बोलन्यावरून हुशार वाटत होता तो.


श्रेयशची सर्वांशी ओळख झाली, त्याच्या बोलक्या स्वभावामुळॆ त्याचे लवकर मित्र झाले.  रीया नेहमी अभ्यासात गुंग असायची, कोणाशी जास्त बोलत नसे तीची एकच खास मैत्रिण होती "नेहा" जिला ती सर्व शेअर करत असे. दोघी शाळॆ पासूनच्या घटट्‍‍ मैत्रिणी.

"अग रीया आज क्लास सुटल्यावर मस्त पाणीपूरी खायला जाऊ" नेहा.

"हो जाऊ ना मी पण खूप दिवस खाल्ली नाही" रीया.

क्लास सुटल्यावर मुलांनी देखील मोर्चा‌ वळवला पाणीपूरी खायला.

"अरे तुम्ही कधी आलात? आमच्या मागावर तर नाहीत ना?" नेहा.

"काहीही! तु काय हीरोइन आहेस? कमी खा पहिलेच किती जाड आहेस" राज.

सर्व जण हसायला लागले. तशी नेहा रागाने राजकडे पाहू लागली.

"काय ग नेहा तुझी मैत्रिण हसत पण नाही नेहमी गुमसुम असते तिला मूलांशी बोलायला नाही आवडत का? " श्रेयश

"ती तशीच आहे. आमचे खाऊन झाले चला‌ आम्ही येतो आता बाय" नेहा.

श्रेयश रीया ला जाताना पाहत होता. "अरे लक्ष कुठे आहे तुझ? चल निघु" राज.

राज व श्रेयश एकाच कोलेजला व एकाच वर्गात होते त्यांची चांगली मैत्री झाली होती.

"काय नाही रे एवढी शांत मुलगी मी बघितली नाही. जाऊ दे चल" श्रेयश.

श्रेयशला कदाचित माहित नाही ही वादळापूर्वीची शांतता आहे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Romance