तूझी माझी आशिकी(भाग ३)❤️
तूझी माझी आशिकी(भाग ३)❤️
रीया व श्रेयश वेगवेगळ्या कोलेजला शिकत होते त्यामूळॆ त्यांची अजून मैत्री झाली नव्हती.
दुसऱ्या दिवशी रीया नेहमीप्रमाणे क्लासला गेली. आज ती थोडी खुश दिसत होती.
सर्व जण आले होते पण तिची नजर श्रेयशला शोधत होती. तो अजून आला नव्हता. ती खूप बैचेन झाली होती. तिला कळत नव्हते तिच्या सोबत काय होतय
तेवढयात श्रेयश येतो, त्याने ब्लॅक कलर चा टीशर्ट घातलेला असतो त्याच्या गोऱ्या रंगावर उठून दिसत होता.
रीयाचा ब्लॅक फेवरेट कलर असतो ती त्याच्याकडे पाहत असते
"आज तूला उशीर का झाला? मला वाटल नाही येणार तू आज. " राज.
"काय नाही रे जरा काम होत म्हणून" श्रेयश.
"त्यांच मधे बोलणं व हसनं चालू होत, रीया त्याला चोरून पाहत होती व गुणगुणत होती,
"तेरी क्यूट सी smile उत्ते,
किन्ना मरदी तेरा किन्ना करदी,
भावे सांवलाई रंग वे,
अखा च अखा पाले आ सोहणेया,
ना दूर जा सोहणेया तू मेनु आ गया पसंद वे"
"काय गं लक्ष कुठे आहे तुझं आज? खूप खूश दिसतेस क्या बात है? " नेहा.
"हममम मला माहितीये, सांगू का नेहाला" काजल हसत हसत बोलते.
"जाना गं, मी ते ते सहज गात होते" रीया गालातल्या गालात हसते.
"काय लपवताय तुम्ही दोघी माज्यापासून? रीया सांग नाही तर मार खाशिल हा, तू माझी बेस्टी आहेस ना.. " नेहा.
काय चालू आहे तुमच्या तिघींच? अभ्यास करायचा नसेल तर घरी जाऊ शकता... "सर".
"साॅरी सर" रीया.
रीया सर्व टीचरची लाडकी होती पण आज तिने पहिल्यांदा सरांचा ओरडा खाल्ला होता ते ही श्रेयश मूळॆ, पण तीला हसु ही येत होते.
तीला श्रेयश सोबत बोलायचे होते त्याचा नंबर घ्यायचा होता पण समजत नव्हते कसे बोलावे, कारण काय दयावे.
ती मूलांनमद्ये फक्त राज सोबत बोलत असे ते ही कधी कधी होमर्वक बदद्ल...
क्लास सुटल्यावर रीयाने थोडी डेरिंग केली, त्याला बघून तिचे हृदयाचे ठोके वाढले होते. आज ती पहिल्यांदा श्रेयशशी बोलणार होती..
"श्रेयश ते ते मी.. अरे तुज्याकडे न्यू सोंग असतील तर देना" रीया.
"जास्त नसतील, थांब बघतो. ५-६ आहेत घे." श्रेयश.
"ओके, थँक यू. चल मी निघते बाय "रीया.
"अगं ऐकना... " श्रेयश.
रीयाने मागे पाहिले नाही व पूढे निघून गेली..
"या मूलीला समजून घेणे खूप अवघड आहे" श्रेयश.
"खाल्लीस माती! साधा एक नंबर तू मिळवू शकत नाही, लानत है तूझपे" रीया स्वताशी बडबडत होती.
आज रात्री रीयाला झोप मात्र लागणार नव्हती, तीला श्रेयशचा चेहरा डोळ्यासमोर दिसत होता. ती मनातल्या मनात कविता करु लागली..
"प्रथम दर्शीनी तूज्या प्रेमात पडले मी..
तूज्या समुद्रा सारख्या डोळ्यात हरवून गेले मी..
असे वाटे भेटीचा तो क्षण पून्हा यावा आयुष्यात..
मनाला हुरहुर लागे तू माझा होशील ना..
नेहमी तूज्या भेटीची ओढ असे मना..
तूज्या शिवाय मला करमेना.."
"रीया श्रेयशचा नंबर कसा मिळवणार.. पाहू पुढिल भागात.. "
वाचकांनो, कथा लिहायचा माझा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला?मला कमेंट करुन कळवा, त्यामूळॆ मला प्रोत्साहन मिळॆल... "
Stay tuned...Thank you!!

