Rohini Kamble

Romance Fantasy Others

3  

Rohini Kamble

Romance Fantasy Others

तुझी माझी आशिकी - भाग ४

तुझी माझी आशिकी - भाग ४

4 mins
219


रीयाचा मूळ स्वभाव शांत नव्हता पण भूतकाळातील एका प्रसंगामूळॆ तिने स्वताला अभ्यासात गुंतवूण घेतले होते..

श्रेयशने तिच्या हृदयाची तार छेडली होती.. तिला याची जाणीव होऊ लागली होती की श्रेयश‌ तिला आवडू लागला आहे..❣️

आता रीया पेचात पडली होती, ती विचार करत होती श्रेयशचा नंबर कसा मिळवायचा ते..

"अरे मला सूचले कसे नाही, राजकडे श्रेयशचा नंबर असेलच त्याला मागते.. " रीया. 😇

थोडया वेळाने रीया राजला मेसेज करते,

"हाय राज.. " रीया.

"हाय.. बोलना‌ काय झालं?" राज

"अरे मला‌ जरा श्रेयशचा नंबर पाहिजे होता.. देशील का? "रीया.

"का? कशाला? काय काम आहे तूला? "राज.

"अरे किती प्रश्न विचारशील..नाही द्यायचा तर सरळ सांग" रीया. 😒

"अगं तस नाही.. म्हणजे काय मेसेज असेल तर सांग मी त्याला पास करतो" राज.

"नको जाऊदे, आय वील मॅनेज.. बाय" रीया. 😏

खरं तर राजच्या मनात रीयाविषयी थोडा सॉफ्टकॉर्नर होता त्यामूळॆ त्याला तिला नंबर द्यायचा नव्हता..

२ दिवसानंतर गणेश चतुर्थी होती, क्लास मधून काही जणांच्या घरी गणपतीचे आगमन होत असे.. नेहाच्या घरी पण २ दिवसांचा गणपती येत असे व रीया लहानपणा पासून तिच्या घरी जात होती..

आज क्लासमध्ये बायोलोजीची टेस्ट होती त्यामूळॆ रीया रीवीजन करण्यासाठी लवकर गेलेली..ती पाहते तर काय श्रेयश तिच्या आधीच येऊन एकटा अभ्यास करत होता..

ती पण पुस्तक उघडून अभ्यास करु लागली..

"श्रेयश एकटाच आहे.. अजून सर्व आले नाहीत.. नंबर मागू का मी? पण कसं विचारू मी?तो काय बोलेल? " रीया मनात बोलू लागली.. 🤔

ती नंबर मागणारच होती, तितक्यात बाकी मूले येतात..व‌ राहून जाते..

सर्व जण बायोलोजीची टेस्ट देतात, दुसऱ्या दिवशी क्लासला गणपतीमूळॆ सुट्टी होती.

"रीया उदया तू येणार आहेस ना माज्या घरी?" नेहा

"हो गं, ही पण काय विचारायची गोष्ट आहे.. "रीया. 😅

"सध्या तू वेगळ्याच दुनियेत असतेस ना म्हणून सांगून ठेवलेल बरं" नेहा. 😂

रीया नेहाकडे डोळॆ बारीक‌ करून रागाने पाहू लागली.. 😒

"साॅरी ना रीयू, मेरी जान उदया ये नक्की नाही तर तूज्याशी बोलणार नाही मी.." नेहा 😘

"हो बरं होईल‌ मग, सतत तूझी बडबड ऐकावी लागते." रीया हसते. 🤣

"या जन्मात तरी तूला माझी बडबड सहन करावी लागेल.. पर्याय नाही.. "‌नेहा. 😏

"उठा ले रे देवा.. मूझे नही इस लडकी को उठा ले" रीया.

त्यावर दोघी हसू लागतात व घरी जाण्यास निघतात... 😄

दुसऱ्यादिवशी रीयाला काजलचा फोन येतो..

"हेलो, अगं निघालिस का? आपल्याला २-३ जणांच्या घरी जायच आहे.. उशीर होईल. " काजल.

"हो निघाले.. तू कुठे आहेस?" रीया

"तूज्या घराजवळच्या बस स्टाॅप कडे आहे.. ये लवकर" काजल.

"हो आले.. बाय" रीया.

रीयाने आज डार्क ब्लू कलरचा अनारकली ड्रेस घातलेला असतो, त्यावर मॅचिंग इअर रिंग, कपाळावर मॅचिंग टिकली व केसांची सुंदर हेअर स्टाइल... 😍

"हाय काजल, अगं आपण दोघीच? बाकी कोण येणार नाही का? " रीया.

"माहित नाही, थांब राजला फोन करते" काजल.

"बरं ऐकना मला श्रेयशचा नंबर देना, मी विचारते त्याला पण" रीया.

"ओके बघ विचारून, काजल क्षणाचाही विचार न करता रीयाला श्रेयशचा नंबर देते."

रीयाला खूप आनंद होतो, शेवटी तिला नंबर मिळालेला असतो.. ती फोन लावते. 😍

"अग नंंबर बरोबर आहे ना? लागत नाहिये" रीया

"हो गं मी तूला चुकीचा नंबर का देईन?" काजल

"ओके चल आपण निघू" रीया.

तितक्यात तिथे राज येतो..

"तूमच बोलून झाल असेल तर निघायच का? उशीर होतोय" राज

"वाह! तूला यायला उशीर झालाय, आणि तू आम्हालाच बोल" रीया

"हो जरा काम होत, बाय द वे आज छान दिसतेय तू "राज😉

"हो का.. धन्यवाद! ज्याने बोलायला हवं तो कुठे आहे देव जाणे" रीया 🙄

"काय बोललीस का?" राज

"कुठे काय.. अरे हो.. श्रेयश पण येतोय ना?फोन करना" रीया

"केलेला मी.. तो नाही येणार बोलला" राज

हे ऐकून रीयाचा चेहरा पडला.. तिला वाटले होते श्रेयश येणार म्हणून ती खूश होती.. 😞

"मी छान नाही दिसत आहे का राज?" काजल मुददाम रागाचा आव आणत बोलते 😠

"हो ग माझी आई छान दिसतेय तू पण.. चला आपण निघूया आता.." राज

सर्वजण पहिल्यांदा नेहाकडे जातात व गणपती बाप्पाचे दर्शन‌ घेतात..

"नेहा तयार हो तू पण आपल्याला सरांकडे आणि आकाशकडे जायच आहे" रीया.

"नको ग मला घरी काम आहे.. तूम्ही जाऊन या" नेहा

"थांब‌ मी काकूंना विचारते" रीया

"काकू आम्ही नेहाला आमच्या सोबत नेऊ का? "रीया

"हो गं.. त्यात काय विचारायच.. नेहा लवकर ये पण घरी" नेहाची आई.

"बघितलस.. उगाच नाटक करतेस.. चल आता गपचूप" रीया.

सर्वजण छान गणपती बाप्पाचे दर्शन‌ घेतात व आपआपल्या‌ घरी जातात..

रीया घरी आल्यावर श्रेयशचा विचार करू लागते..

"श्रेयश‌ का आला नसेल? मेसेज करून बघू का? नको‌ राहूदे उदयाच करते अस पण आता उशीर झालाय.."

दुसऱ्या दिवशी राज व श्रेयश कोलेजच्या केंटीन मध्ये बसलेले असतात.. तितक्यात त्याला अनोळखी नंबर वरून मेसेज येतो...

"मनातले अबोल संकेत ज्यांना न बोलता कळतात, त्यांच्याशीच मनांची खोल नाती जुळतात.."

good morning... ❣️

"अरे राज हा नंबर कोणाचा आहे? एक मेसेज आलाय.."श्रेयश

तितक्यात अजून एक मेसेज येतो..

"हेय मी रीया.. सो साॅरी मी ते काजलला मेसेज करत होते चुकून तूला आला" रीया.

"ओके नो‌ प्रोब्लेम" श्रेयश

"काय झालं? तू का smile करतोय.. कोणाचा मेसेज होता? राज

"अरे रीयाचा होता..चूकून केला अस कायतरी बोलली. जाऊदे चल आपण वर्गात जाऊ लेकचर अटेंड करू" श्रेयश

"रीयाने श्रेयशचा नंबर कसा मिळवला असेल? काय काम असेल तिचं त्याच्याकडे? " राज मनातल्या मनात..

आज क्लासमध्ये श्रेयशने रीयाकडे पाहून smile दिली.. तिनेही त्याला गोड smile दिली..😃

"आज मिस आपल्याला बायोलोजी पेपर चेक करून‌ देणार वाटत" श्रेयश

"हो कदाचित.. बघू" रीया

तितक्यात बायोलोजीची मिस येते..

"मिस तूम्ही पेपर चेक केले का?" रीया

"नाही गं राणी.. थोडे बाकी आहेत उदया देते" मिस

आज खूप दिवसांनी रात्री रीया गाणे ऐकत असते व स्वताला इमॅजीन‌ करते..

"मेरे दिल को ये क्या हो गया,

मैं न जानू कहाँ खो गया,

क्यों लगे दिन में भी रात है,

धुप में जैसे बरसात है,

ऐसा क्यों होता है बार बार,

क्या इसको ही कहते हैं प्यार"

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance