Rohini Kamble

Tragedy

3  

Rohini Kamble

Tragedy

प्रिय आजी

प्रिय आजी

4 mins
302


आजी म्हणजे प्रेमळ मायेचा झरा. माज्या मते "आ" म्हणजे आत्मा आणि जी म्हणजे "जिव्हाळा". आजी म्हणजे परिक्षेत पास झाल्यावर आपल्या पाठीवर शाबासकीची थाप मारणारी. रात्री जून्या काळातील भुताच्या गोष्टी सांगणारी. कधी आई बाबा आपल्यावर ओरडले तर त्यांना गप्प करणारी. आयूष्यभर सर्वांना प्रेमाने जपणारी.

खर तर माज्या आजीबदद्ल बोलायला माज्याकडे शब्द अपूरे पडतील.लहानपणापासून सर्वांनीच आजीचे प्रेम, माया अनुभवले असेल. माझी आजीही अगदी तशीच होती. वय ७०-७२, दिसायला एखादया जून्या अभिनेत्रीला लाजवेल अशी. थोडी जाड आणि अगदी दुधासारखी गोरी गोमटी त्यात कपाळावर मोठी लाल टिकली लावायची जी तिच्या सुंदर चेहऱ्यावर खूप शोभायची. मी नेहमी तिला मस्करीत म्हणायचे "आजी तूझा रंग देना ग मला! " मग ती हसायची. माज्या आईच आणि तिच नात कधीच सासू-सूनेसारख नव्हत अगदी आई मूलीप्रमाणे!

आजी साधी, सरळ, भोळीभाबडी कधीही कोणाच्या वाकडयात न शिरणारी अशी होती. ती शिकली नसल्याने तिला व्यवहारज्ञान नव्हते पण पैसे मात्र तिला मोजता येत होते.

आम्ही भावंडे आताही तिच्या मांडीवर डोके टाकायचो मग ती केसातून मायेने हात फिरवायची व गालाची पापी घ्यायची. आजीच्या मांडीवर डोके टेकवायला सर्वांनाच आवडते मग लहान असो की मोठे. तिने कधीच तिच्या मूलांवर धाक ठेवला नाही व कधी एका शब्दाने पण त्यांना ओरडली नसेल इतका शांत स्वभाव जणू गाय.

तिने‌ नेहमीच सर्वांना भरभरून प्रेम दिले पण बदल्यात कधीच त्याची अपेक्षा केली नाही. अस म्हणतात ना एक इच्छा पूर्ण करणारी विहिर असते ज्यात आपण १ रूपया टाकला की कोणतीही इच्छा पूर्ण होते अगदी तशीच. अस्सल सोन! जे या जगात शोधूनही सापडणार नाही. मी तर अभिमानाने म्हणेन माज्या आजीसारखी या जगात कोणतीच आजी नसेल. भांडण म्हणजे काय असते हे तिला माहित पण नसेल. तिलाही आम्हा सर्वांचा खूप लळा होता. ती आम्हाला सोडून‌ कोणाकडे राहतही नसे.

वाईट याच गोष्टीच वाटत मागच्याच वर्षी जून महिन्यात कोरोनामूळॆ ती आम्हाला सर्वांना सोडून गेली. जे आमच्यासाठी खूप अनपेक्षित होत. अस म्हणतात शेवटी देवाला प्रिय असणारी माणसे या जगातून लवकर जातात. कधीही तिची आठवण आली तरी माझे डोळॆ ओले झाल्याशिवाय राहत नाहित.

तर झाले असे मागच्या वर्षी कोरोना आजार नवीनच आलेला त्याबददल कोणाला एवढे माहितही नव्हते. माझी आजी तशी चालून फिरून होती पण सांधेदुखीचा त्रास होता आणि कोरोनामूळॆ तर घराच्या बाहेर जाणे पण टाळले होते. दूर्दैवाने तेव्हा कोरोनाची लसही आली नव्हती त्यामूळॆ मनात भिती होतीच. पण अस म्हणतात ना होनी को कोण टाल सकता है! तर दोन दिवस आजीला ताप आला त्यात तिला हाय बिपी होताच. ताप आल्याने आम्ही तिला जवळच्याच दवाखान्यात घेऊन गेलो. तेव्हा कोरोनामूळॆ डाॅक्टरने व्यवस्थित चेक‌ न‌ करता फक्त गोळ्या दिल्या. पण आजीने जेवण सोडल्याने गोळ्याही तिला पचल्या नाहित व तबयेत आणखीच खालावली. तिला कमजोरी आल्याने सलाईन चढवण्यासाठी आम्ही फॅमिली डाॅक्टरकडे घेऊन गेलो पण कोरोनामूळॆ त्यांनीही सलाईन चढवली नाही फक्त इंजेकशन व गोळ्या देऊन घरी पाठवले.

दोन दिवस आजी घरीच होती हळू हळू तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. जेवण तर तिने असही सोडलेले आम्ही जबरजस्ती तरी भरवत होतो. दुसऱ्यादिवशी आम्ही तिला तातडीने जवळच्या खाजगी हाॅस्पीटलला पळवले. पण तिला घेतले नाही तिचा ऑक्सिजन लेवल बाहेरूनच चेक केला जो कमी होता त्यामूळॆ त्यांना कोरोनाची शंका येत होती. त्यामूळॆ त्यांनी अॅडमिट करून घेण्यास नकार दिला व दुसरीकडे जाण्यास सांगितले.

आम्ही परत दुसऱ्या खाजगी हाॅस्पीटलला गेलो तिकडे ही बाहेरच थांबवले व आधी रिपोर्ट काढावा लागेल असे सांगितले. रिपोर्ट काढला‌ ज्यात फुफ्फुसे पूर्ण पांढरे दिसत होते तरी ही आम्हाला डाॅक्टरांनी स्पष्ट सांगितले नाही व आजीला अॅडमिट करण्यास दिवसाचे भाडे ६०००० सांगितले पण आमची परिस्थिती बेताची असल्याने सरकारी हाॅस्पीटलला घेऊन जाण्यास सांगितले. आमची नुसती धावपळ सूरू होती इकडून तिकडे.

शेवटी आम्ही आजीला शहरातल्याच सरकारी हाॅस्पीटलला नेले व तिकडे अॅडमिट करून घेतले. त्याक्षणी आजीची अवस्था पाहून मन तूटत होते ती हातवारे करून नको‌ नको सांगत होती. पण काय पर्यायच नव्हता हाॅस्पीटलला कोरोनाचे पेशंट जास्त असल्याने आम्हाला आत जायची परवानगी नव्हती. आजीला ऑक्सिजन मास्क लावले होते. ते सूद्धा आम्हाला कोणाला पाहता आले‌ नाही.

दोन दिवस आजी तिकडेच होती. डाॅक्टर म्हणत होते त्या काय बरोबर प्रतिसाद‌ देत नाहित. आम्ही खूप काळजीत होतो. काय करावे कळत नव्हते. तिकडे कोणी ओळखीचेही नव्हते. त्याच रात्री २‌ वाजता आम्हाला हाॅस्पीटलमधून घरी फोन आला की त्यांना नैसर्गिकपणे श्वास घेता येत नाहिये वेंटिलेटरवर ठेवावे लागेल. कदाचित हिच तिची शेवटची वेळ होती. असे ऐकल्यानंतर आम्ही कोणीच पूर्ण रात्र झोपलो‌ नाही रडून रडून वाईट अवस्था झालेली.

शेवटी दुसऱ्यादिवशी दुपारी १२ च्या सुमारास फोन आला की आजी आम्हाला सोडून गेली व इथे आमचा अश्रूंचा बांध फूटला. बाबा, भाऊ वैगरे हाॅस्पीटलला गेले. पण आजीचा कोरोना रिपोर्ट अजून न आल्याने ती सस्पेक्टेड होती. त्यामूळॆ आजीला घरी नेण्यास मनाई करण्यात आली. आम्हाला तिला शेवटचे पाहताही आले नाही.

शेवटी हाॅस्पीटलमध्ये सर्व प्रोसिजर पूर्ण केली व आजीला डायरेक्ट समशानभूमीत नेऊन अंत्यविधी करण्यात आला.कोरोनामूळॆ आम्ही कोणत्याच नातेवाईकांना घरी बोलवले नव्हते. शेवटी अंत्यविधीला जाऊ न शकल्याने आम्ही सर्वांनी एकत्र विडियो काॅल केला व पाहिले. बाबा, काका, भाऊ यांना पीपीइ किट घालण्यास दिलेले‌ व आजीलाही पूर्ण झाकलेले त्यामूळॆ विडियो काॅल मधून पण तिला शेवटचे पाहणे आमच्या नशीबात नव्हते.

आजीचा कोरोना रिपोर्ट हा दोन दिवसांनी आला ज्यात तिला कोरोना झालेला हे सांगितले व माज्या पूर्ण कुटुंबाला काॅरंटाईन सेंटरमध्ये‌ नेण्यात आले. तो क्षण आणि दिवस आठवला की आजही माज्या अंगावर काटा येतो. आजीच्या दुखातून सावरायला दोन दिवस नाही झाले की आमची रवानगी काॅरंटाईन सेंटरमध्ये झाली व सर्वांना वेगवेगळॆ ठेवलेले. तिकडे राहून खऱ्या अर्थाने मला कुटुंबाचे महत्त्व समजले.

एकच खंत वाटते आजी जाताना आमच्या काळजाला चटका लावून गेली. तिला शेवटचे डोळॆ भरून पाहताही आले नाही. आताही हा लेख‌ लिहताना मला अश्रू अनावर झाले.

प्रिय आजी,

"तू कूठे गेलीस आम्हाला सोडून? मला तूझी खूप खूप आठवण येते. असा एकही दिवस गेला नसेल जेव्हा आम्हाला तूझी आठवण आली नसेल व डोळ्यात पाणी आले नसेल. एवढच म्हणेन तू जिथे कूठे असशील आनंदात रहा इतकीच देवाकडे प्रार्थना


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy