komal Dagade.

Romance Classics Others

4.0  

komal Dagade.

Romance Classics Others

तू आणि मी...

तू आणि मी...

2 mins
289


               "अग किती बोलशील...? डोकं भणभण करतय....!, माझं काम चालय शांत डोक्याने करु देत....!दिसतय ना तुला....?


त्याच्या बोलण्याने ती दुखावली गेली. आता माझी बडबड दिसतेय. लग्नाआधी तर किती गोड आवाज म्हणून कौतुक करायचा. तुझं बोलणं ऐकत राहावं अस म्हणायचा आणि आता कुठे गेलं प्रेम...! लग्नाआधी प्रियसी लग्नानंतर मोलकरीण खरंच आहे. बाईच्या जातीचं असच असतं. लग्नाआधी कोडकौतुकं आणि लग्नानंतर हम आपके हे कौन...!ती मनातुन बोलून नाराज होऊन बेडरूममध्ये निघून गेली.


मनात त्याच्या बोलण्याची सल तिला टोचत होती. दुपारची झोप काही येईना. बाहेर जावं तर याच्याशी अबोला...!


तिला काय कराव सुचत नव्हतं. निपचित पडून राहिली बेडवर. त्यात तिला शांत बसणं जमत नसे. गप्पा मारणे तिचा आवडता छंद.


ती निघून गेल्यावर हा कामामध्ये गुंतला. कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम चालले होतें. त्यात तिच्या बडबडीने कामात लक्षही लागेना. पण त्याला ती दुःखी होऊन गेल्याने वाईट वाटत होतं.


तिची तरी काय चूक. शांत बसणं तिच्या स्वभावातच नव्हतं. घर त्याला आज सुनंसुनं वाटतं होतं. घरात पसरलेली शांतता त्याला त्रासदायक वाटत होती. तिचा अबोला त्याला असाह्य करत होता. ती येईल आणि बोलेल याकडे त्याच लक्ष लागून राहीलं होतं. काम करता करता त्याच लक्ष तिच्या दरवाजाकडे जात होतं. कशाला बोललो मी तिला जरा रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे होतं. तिला बोलण्याचा त्याला पच्छाताप होतं होता.


"कोणाशी बोलणार एकटी घरात...!मी नसल्यावर कसे दिवस काढत असेल ती....? तो विचार करत बसला.


संध्याकाळी सहा वाजत आले तरी आज त्याला चहा मिळाला नव्हता. कधी कधी कामामुळे चहा, नाष्टा, जेवण विसरणारा तो. ती मात्र न चुकता रोज काळजीने चहा, जेवण, नाष्टा देणारी ती त्याला आठवत होती.


आज त्यानेच तिच्याशी बोलायचं ठरवलं. तिच्या दुखवलेल्या मनावर अलगत फुंकर मारण्यासाठी तो उठला.


किचनमध्ये जाऊन त्याने दोघांसाठी कॉफ़ी करायला घेतली. कॉफ़ी तिच्या आवडती. दोघांना मिळून फक्कड कॉफ़ीचा बेत त्याने आखला. दोघांना कॉफ़ी घेऊन तो तिच्या रूमच्या दिशेने गेला. ती झोपलेली नव्हती. त्याचीच येण्याची वाट पाहत होती.


ए वेडाबाई उठा... किती हा अबोला. गरमागरम कॉफ़ी घ्या. त्याच्या बोलण्याने क्षणात सुखवली. त्याच्या मिठीत जाऊन विसवली.


" माफ कर मला. वर्कलोडमुळे तुला जास्तच बोलोलो.


ती म्हणाली, तू मला माफ कर....!

तुझ्या कामामध्ये मी व्यतय आणला. एकमेकांची माफी मागत कॉफ़ीचा घोट दोघांनी घेतला. त्या घोटाबरोबर क्षणात दोघांमधील अबोला नाहीसा झाला.



******समाप्त ********




Rate this content
Log in

Similar marathi story from Romance