Author Sangieta Devkar

Romance Tragedy

3  

Author Sangieta Devkar

Romance Tragedy

तुला पाहता आज ही

तुला पाहता आज ही

6 mins
289


राम खिड़कीतून बाहेर बघत कॉफी पीत होता. नुकतीच पावसाला सुरुवात झाली होती. रस्त्यावर थोड़ीफार गर्दी होती. पायी चालत जाणारे कसे बसे छत्री धरुन पावसापासून स्वतःला सांभाळत चालले होते. झाड़े हिरवीग़ार दिसत होती. अधून मधून एखादा पक्षी आपले पंख फड़फड़त जाताना दिसत होता. बाहेरचं वातावरण आल्हाददायक होतं पण रामच्या मनात उदासी ठाण मांडून बसली होती."पाऊस हमखास घेऊन येतो तुझी आठवण किती आणि कुठे करू माझ्या मनात तुझी साठवण" रामच्या मनात आपसुक या ओळी आल्या.


ख़ूप आवड़ायचा तिला पाऊस. चिंब भिजत राहायची पाऊसवेडी होती काव्या. राम असा कसा रे तू अनरोमॅंटिक पाऊस आवडत नाही तुला मग पावसावर कविता बरी करतोस? असं कुठे आहे की पाऊस आवडत नाही म्हणून मी त्याच्या वर लिहायचे नाही. आणि तसे ही तू आहेसच की माझी कविता माझी काव्या. हम्म राम तू सॉफ्टवेयरसारख्या टेक्निकल क्षेत्रात का आलास? मस्त रायटर व्हायचास ना! कावू मी काही इतका प्रोफेशनल लिखाण नाही करत जस्ट जे मनात येतं ते लिहून काढतो. तरी पण ख़ूप छान लिहितोस तू.


कावूच्या आठवणीत राम चे डोळे भरून आले. अभिराम नाव त्याचं सगळे मित्र घरचे लोक त्याला अभिच म्हणायचे पण फ़क्त काव्या त्याला राम म्हणत असे आणि त्याला ते आवडतही होते. आजही तो दिवस त्याला आठवत होता. राम मी तयार राहते तू लवकर ये. काव्या अरे यार मला नाही आवडत पाऊस माहित आहे ना तुला तरी तू हट्ट करतेस. मिस्टर अभिराम प्रेम आहे ना माझ्यावर मग लगेचच ये बाय म्हणत कावूने फोन ठेवला. हम्म ही काव्या पण ना अजब आहे पण गोडही आहे चला अभिराम तयार व्हा स्वतःशीच बोलत अभि अवारायला गेला. काव्याच्या घरा जवळ आला आणि हॉर्न वाजवला. आई राम आला मी निघते. कावू सांभाळुन जा पावसाचे दिवस आहेत हो आई नको काळजी करूस म्हणत कावू खाली आली. मस्त ब्ल्यू जीन्स येल्लो शर्ट आणि त्या वर ब्ल्यू जॅकेट काव्या सुंदर दिसत होती. तिला फिरायला ख़ुप आवड़ायचे मोस्टली पावसात आणि अभिरामला पावसात फिरायला बोअर व्हायचे. दोघांची नुकतीच एंगेजमेंट झाली होती. अभिराम सॉफ्टवेयरमध्ये जॉब करत होता आणि काव्याही. तिथेच दोघे भेटले आणि प्रेमात पड़ले.राम आणि ती कारमधून सिंहगड़ावर फिरायला आले होते. मस्त वातावरण होते बरेच कपल तिथे फिरायला आले होते. काव्या रामचा हात हातात घेवून फिरत होती. अचानक पाऊस सुरु झाला तसा राम एका झाड़ाकड़े गेला, कावू चल तू पण भिजु नकोस. नाही तू जा मला भिजायचे आहे. आय लव रेन म्हणत ती भिजत राहिली. राम तिच्याकड़े बघत राहिला. पावसाचे थेंब कावू आपल्या हातात पकड़त होती काही थेंब तिच्या चेहऱ्यावर पड़त होते तसे ती अजुनच चेहरा वर करून पाऊस चेहऱ्यावर झेलत होती. तिच्या केसांवर पावसाचे थेंब जणु दवबिंदु भासत होते. तिला अस भिजलेली बघुन राम एकटा गालातल्या गालात हसत होता. भिजलेलं रूप तिचं आपल्या डोळ्यात साठवत होता. चिंब भिजल्यावर काव्या त्याच्या जवळ आली. झालं भिजून का अजुन बाकी आहे अशाने आजरी पडशील कावू राम म्हणाला. नाही पड़त आजारी तुझ्यासारखी नाही मी घाबरट आणि स्ट्रॉन्ग आहे मी. हो का मी कोणाला घाबरतो सांग. अजुन कोणाला या पावसाला. अस काय म्हणत त्याने कावू ला ओढले आणि पावसात घेवून गेला. राम तू आणि पावसात? हो तू काय बोलली आय एम अन रोमान्टिक. बघ आता म्हणत त्याने कावूला आपल्या जवळ ओढले तिच्या भोवती आपल्या बाहुचा विळखा घातला तिच्या नजरेत बघत राहिला. तिला त्याची नजर समजत होती. काव्या आता कुड़कुड़त होती. राम मला थंडी वाजते आहे चल ना बाजूला जावू. चल म्हणत तो तिला घेऊन झाड़ाखाली आला. आपल्या मिठीत तिला कैद केले आणि आपले ओठ तिच्या ओठांवर अलगद ठेवले. त्याच्या ओठांचा उष्ण श्वास तो स्पर्श तिला हवा होता त्याने बराच वेळ तिला किस केले. दोघे एकमेकांच्या कुशीत ऊब घेत राहिले. पाऊस आता कमी झाला होता. कावू निघायचे का आता? हो चल जावूया काव्या बोलली. दोघे कारमध्ये आले. तिने सोबत आनलेले गरम जॅकेट अंगात घातले. राम वाटेत चहाची टपरी दिसली की थांब आपण चहा घेवू. राम मला एक सांग आज कसा काय तू पावसात भिजलास दरवेळी तर किती मस्का मारावा लागतो तुला. हम्म कावू आज तुझं मन नाही मोडवले मला. नाही काहीतरी वेगळी गोष्ट आहे नक़्क़ी. रामने कार थांबवली. काय झाले राम ? चहा घ्यायचा ना बघ समोर टपरी आहे चल. दोघे त्या टपरी जवळ आले. तिथे गरम गरम कांदा भजीसुद्धा होती. रामने भजी आणि चहा सांगितला. राम तू मगाशी विषय टाळलास सांग आता नाहीतर नको मला चहा. अरे लगेच काय रूसतेस वेडा बाई. असंच तुला आवडतो ना पाऊस सो आज मला ही आवडला. नाही ख़र सांग. कावू त्याने तिचा हात हातात घेतला मला आपल्या कंपनीने सहा महिन्यासाठी दिल्लीला जायला सांगितले आहे तिथे काही नवीन इंस्टूमेंट्स आणली आहेत त्याच ट्रेनिंग आहे. आणि तू मला आता सांगत आहेस. अग कालच मला बॉसने सांगितले. मी तुला निवांत सांगणार होतो. मी कशी राहु मग तुझ्या शिवाय? अरे मी रोज कॉल करेन बोलू ना आपण. नुसते बोलणे असे प्रेम असते का कुठे? कावू ते ट्रेनिंग मी पूर्ण केले तर माझे प्रमोशन होईल मग आपण लग्न करू सहा महीने बघता बघता जातील. नो मी नाही राहु शकणार तुझ्या शिवाय राम, कावूचे डोळे भरून आले. कावू अस वेड्या सारखे नको वागू मला पण तुझ्या पासून दूर राहायला जड़ जाणार आहे पण काम पण महत्वाचे आहे ना? तुच जर अशी रडत राहिलीस तर मला जाणे अवघड होईल. राम नाही रडणार मी तू लवकर जा आणि लवकर परत ये मी वाट बघेन . द्याटस लाईक अ गुड़ गर्ल म्हणत त्याने तिचा गाल ओढला. चहा घेवून दोघे निघाले.


राम दिल्लीला गेला कावू ख़ुप रडली पण मनाला समजूत घातली. रोज ते विडिओ कॉलवर बोलत असायचे. एकमेकांना मिस करायचे. आता रामचे ट्रेनिंग संपत आले होते. दोन दिवसांनी तो परत येणार होता. आला की लवकर लग्न उरकून टाकायचे असे दोन्ही घरांनी ठरवून टाकले. नुकताच जुलै महिना लागला होता पाऊस ख़ुप पड़त होता. आज राम परत येणार होता कावू बोलली मी तुला एयरपोर्टवरच भेटायला येणार. कावू पाऊस ख़ूप आहे तू नको येऊस मी आल्यावर पहिला तुला भेटेन आय प्रॉमिस पण पावसात नको येऊ. रामने तिला समजावले मग संध्याकाळी नक़्क़ी भेट अस काव्या म्हणाली. राम घरी आला. त्याला कधी एकदा कावूला भेटतो अस झाल होत आणि काव्याही त्याला भेटायला अधीर झाली होती.पाऊस कमी होता म्हणून ती तिची बाइक घेवून निघाली. राम वाटेत येणार होता. तिने त्याच्यासाठी रोज फ्लाॅवरचा बुके आणि चॉकलेटस घेतली होती. ठरलेल्या जागी ती आली. रोडच्या बाजूला आपली बाइक पार्क केली हातात बुके आणि चॉकलेटस पॅकेट घेतले. राम तिच्या समोर पालिकडच्या बाजूला उभा होता. त्याला बघुन तिने हात हलवला. रामला तिथेच थांब म्हणाली. रस्ता क्रॉस करून ती पलीकडे जाणार होती. भुरभर पाऊस पड़तच होता. अचानक एक कुत्र्याचे पिल्लू रस्त्याच्या मध्येच जात होते ते काव्याने बघितले पावसात भिजून ते पिल्लू ग़ारठले होते. उगाच गाड़ीखाली येईल म्हणुन तिने त्याला आपल्या हातात पकडले आणि रोडच्या बाजूला ठेवयला ती गेली आणि सेकंदात एक ट्रक काव्याला जोराची धडक देवून गेला. राम कावू म्हणत जोरात ओरडत पुढे आला पण त्याची कावू रस्त्याच्या मधोमध पडली होती. रोज फ्लाॅवर आणि चॉकलेटस सगळीकड़े अस्ताव्यस्त पडली होती. लोक जमा झाली रामने आपली कार आणली पटकन कावूला हॉस्पिटलला नेले. पण हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्यापूर्वीच काव्या हे जग सोडून गेली होती अभिरामला एकट टाकून. रामचा आक्रोश सारा हॉस्पिटल बघत होता. कावू उठ मला सोडून कुठे चाललीस मी परत आलो आहे गं बघ एकदा डोळे उघड़ कावू तुझा राम आला आहे गं. या पावसानेच तुला दगा दिला . आताही रामचे डोळे भरून आले. वर्ष झाले कावूला जावून पण तिच्या आठवणी आजही त्याच्या मनाला असंख्य यातना देत होत्या.


"भरून आलेल आभाळ,आणि मन दोन्ही सारखेच.

आभाळाला ही कोसळायच असतं, आणि मनालाही.

आभाळ पावसाच्या रुपात बरसते,मन मात्र तुझ्यासाठी तरसते.

आभाळच ठीक असत,त्याला धरणी घेते सामावून.

माझ्या भग्न मनाचे तुकडे ,सांग कोण घेईल सावरून...."


राम अजुनच हळवा बनला होता.आता त्याची कावू काव्याच्या रुपात त्याची लेखणी बनून कायम साथ देत होती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance