तुला पाहता आज ही
तुला पाहता आज ही
राम खिड़कीतुन बाहेर बघत कॉफी पीत होता. नुकतीच पावसाला सुरवात झाली होती. रस्त्यावर थोड़ी फार गर्दी होती. पायी चालत जाणारे कसे बसे छत्री धरुन पावसा पासून सव्हताला सांभाळत चालले होते. झाड़े हिरवीग़ार दिसत होती.अधुन मधून एखादा पक्षी आपले पंख फड़फड़त जाताना दिसत होता. बाहेरच वातावरण आल्हादायक होत पण रामच्या मनात उदासी ठाण मांडून बसली होती." पाऊस हमखास घेऊन येतो तुझी आठवण कीती आणि कुठे करू माझ्या मनात तुझी साठवण" राम च्या मनात आपसुक या ओळी आल्या. ख़ुप आवड़ायचा तिला पाऊस . चिंब भिजत राहायची पाऊस वेडी होती काव्या. राम असा कसा रे तू अनरोमैंटिक पाऊस आवडत नाही तुला मग पावसा वर कविता बरी करतोस? अस कुठे आहे की पाऊस आवडत नाही म्हणुन मी त्याच्या वर लिहायचे नाही. आणि तसे ही तू आहेसच की माझी कविता माझी काव्या . हम्म राम तू सॉफ्टवेयर सारख्या टेक्निकल क्षेत्रात का आलास? मस्त रायटर व्हायचास ना! कावू मी काही इतका प्रोफेशनल लिखान नाही करत जस्ट जे मनात येत ते लिहून काढतो. तरी पण ख़ुप छान लिहितोस तू. कावू च्या आठवणीत राम चे डोळे भरून आले. अभिराम नाव त्याच सगळे मित्र घरचे लोक त्याला अभिच म्हणायचे पण फ़क्त काव्या त्याला राम म्हणत असे आणि त्याला ते आवडत ही होते. आज ही तो दिवस त्याला आठवत होता.राम मी तयार राहते तू लवकर ये. काव्या अरे यार मला नाही आवडत पाऊस माहित आहे ना तुला तरी तू हट्ट करतेस. मिस्टर अभिराम प्रेम आहे ना माझ्या वर मग लगेचच ये बाय म्हणत कावू ने फोन ठेवला. हम्म ही काव्या पण ना अजब आहे पन गोड ही आहे चला अभिराम तयार व्हा सव्हताशीच बोलत अभी अवारायला गेला. काव्या च्या घरा जवळ आला आणि हॉर्न वाजवला. आई राम आला मी निघते . कावू सांभाळुन जा पावसाचे दिवस आहेत हो आई नको काळजी करूस म्हणत कावू खाली आली. मस्त ब्लूय जीन्स येल्लो शर्ट आणि त्या वर ब्लूय जैकेट काव्या सुंदर दिसत होती. तिला फिरायला ख़ुप आवड़ायचे मोस्टली पावसात आणि अभिराम ला पावसात फिरायला बोअर व्हायचे. दोघांची नुकतीच एंगेजमेंट झाली होती. अभिराम सॉफ्टवेयर मध्ये जॉब करत होता आणि काव्या ही. तिथेच दोघे भेटले आणि प्रेमात पड़ले.राम आणि ती कार मधून सिंहगड़ा वर फिरायला आले होते. मस्त वातावरण होते बरेच कपल तिथे फिरायला आले होते. काव्या राम चा हात हातात घेवून फिरत होती. अचानक पाऊस सुरु झाला तसा राम एका झाड़ा कड़े गेला कावू चल तू पण भिजु नकोस. नाही तू जा मला भिजायचे आहे. आय लव रेन म्हणत ती भिजत राहिली. राम तिच्या कड़े बघत राहिला. पावसाचे थेम्ब कावू आपल्या हातात पकड़त होती काही थेम्ब तिच्या चेहऱ्यावर पड़त होते तसे ती अजुनच चेहरा वर करून पाऊस चेहऱ्या वर झेलत होती. तिच्या केसां वर पावसाचे थेम्ब जणु दवबिंदु भासत होते.तिला अस भिजलेली बघुन राम एकटा गालातल्या गालाता हसत होता. भिजलेल रूप तीच आपल्या डोळ्यात साठवत होता. चिंब भिजल्यावर काव्या त्याच्या जवळ आली . झाल भिजून का अजुन बाकी आहे अशा ने आजरी पडशील कावू राम म्हणाला. नाही पड़त आजारी तुझ्या सारखी नाही मी घाबरट आणि स्ट्रॉन्ग आहे मी. हो का मी कोणाला घाबरतो सांग. अजुन कोणाला या पावसाला. अस काय म्हणत त्याने कावू ला ओढले आणि पावसात घेवून गेला. राम तू आणि पावसात ? हो तू काय बोलली आय एम अन रोमान्टिक . बघ आता म्हणत त्याने कावू ला आपल्या जवळ ओढले तिच्या भोवती आपल्या बाहु चा विळखा घातला तिच्या नजरेत बघत राहिला . तिला त्याची नजर समजत होती . काव्या आता कुड़कुड़त होती. राम मला थंडी वाजते आहे चल ना बाजूला जावू . चल म्हणत तो तिला घेऊन झाड़ा खाली आला. आपल्या मिठित तिला कैद केले आणि आपले ओठ तिच्या ओठां वर अलगद ठेवले. त्याच्या ओठांचा उष्ण श्वास तो स्पर्श तिला हवा होता त्याने बराच वेळ तिला किस केले. दोघे एकमेकांच्या कुशीत ऊब घेत राहिले. पाऊस आता कमी झाला होता. कावू निघायचे का आता? हो चल जावूया काव्या बोलली. दोघे कार मध्ये आले. तिने सोबत आनलेले गरम जैकेट अंगात घातले. राम वाटेत चहा ची टपरी दिसली की थांब आपण चहा घेवू. राम मला एक सांग आज कसा काय तू पावसात भिजलास दरवेळी तर कीती मस्का मारावा लागतो तुला. हम्म कावू आज तुझ मन नाही मोडवले मला. नाही काहीतरी वेगळी गोष्ट आहे नक़्क़ी. राम ने कार थांबवली. काय झाले राम ? चहा घ्यायचा ना बघ समोर टपरी आहे चल. दोघे त्या टपरी जवळ आले. तिथे गरम गरम कांदा भजी सुद्धा होती. राम ने भजी आणि चहा सांगितला. राम तू मगाशी विषय टाळलास सांग आता नाहीतर नको मला चहा. अरे लगेच काय रूसतेस वेडा बाई. असच तुला आवडतो ना पाऊस सो आज मला ही आवडला. नाही ख़र सांग . कावू त्याने तिचा हात हातात घेतला मला आपल्या कंपनीने सहा महिन्या साठी दिल्ली ला जायला सांगितले आहे तिथे काही नवीन इंस्टूमेंट्स आणली आहेत त्याच ट्रेनिंग आहे. आणि तू मला आता सांगत आहेस. अग कालच मला बॉस ने सांगितले. मी तुला निवांत सांगणार होतो. मी कशी राहु मग तुझ्या शिवाय? अरे मी रोज कॉल करेन बोलू ना आपण. नुसते बोलने असे प्रेम असते का कुठे? कावू ते ट्रेनिंग मी पुर्ण केले तर माझे प्रमोशन होईल मग आपण लग्न करू सहा महीने बघता बघता जातील. नो मी नाही राहु शकणार तुझ्या शिवाय राम कावू चे डोळे भरून आले. कावू अस वेड्या सारखे नको वागू मला पण तुझ्या पासून दूर राहायला जड़ जाणार आहे पण काम पण महत्वाचे आहे ना? तुच जर अशी रडत राहिलीस तर मला जाणे अवघड होईल. राम नाही रडनार मी तू लवकर जा आणि लवकर परत ये मी वाट बघेन . दयाटस लाईक अ गुड़ गर्ल म्हणत त्याने तिचा गाल ओढला. चहा घेवून दोघे निघाले. राम दिल्ली ला गेला कावू ख़ुप रडली पण मनाला समजूत घातली. रोज ते विडिओ कॉल वर बोलत असायचे . एकमेकांना मिस करायचे. आता राम चे ट्रेनिंग संपत आले होते . दोन दिवसांनी तो परत येणार होता. आला की लवकर लग्न उरकून टाकायचे असे दोन्ही घरांनी ठरवून टाकले. नुकताच जुलै महिना लागला होता पाऊस ख़ुप पड़त होता. आज राम परत येणार होता कावू बोलली मी तुला एयरपोर्ट वर च भेटायला येणार. कावू पाऊस ख़ुप आहे तू नको येऊस मी आल्या वर पहिला तुला भेंटेंन आय प्रॉमिस पण पावसात नको येऊ. राम ने तिला समजावले मग संध्याकाळी नक़्क़ी भेट अस काव्या म्हणाली. राम घरी आला. त्याला कधी एकदा कावू ला भेटतो अस झाल होत आणि काव्या ही त्याला भेटायला अधिर झाली होती.पाऊस कमी होता म्हणुन ती तीची बाइक घेवून निघाली. राम वाटेत येणार होता. तिने त्याच्या साठी रोज फ्लावर चा बुके आणि चॉकलेटस घेतली होती. ठरलेल्या जागी ती आली. रोड च्या बाजूला आपली बाइक पार्क केली हातात बुके आणि चॉकलेटस पैकेट घेतले. राम तिच्या समोर पालिकडच्या बाजूला उभा होता. त्याला बघुन तिने हात हलवला. राम ला तिथेच थांब म्हणाली. रस्ता क्रॉस करून ती पलीकडे जाणार होती. भुरभर पाऊस पड़तच होता. अचानक एक कुत्र्याचे पिल्लू रसत्याच्या मध्येच जात होते ते काव्या ने बघितले पावसात भीजून ते पिल्लू ग़ारठले होते. उगाच गाड़ी खाली येईल म्हणुन तिने त्याला आपल्या हातात पकडले आणि रोड च्या बाजूला ठेवयला ती गेली आणि सेकंदात एक ट्रक काव्याला जोराची धडक देवून गेला. राम कावू म्हणत जोरात ओरडत पुढे आला पण त्याची कावू रस्त्याच्या मधोमध पडली होती रोज फ्लावर आणि चॉकलेटस सगळी कड़े अस्तव्यस्त पडली होती. लोक जमा झाली राम ने आपली कार आणली पटकन कावू ला हॉस्पिटल ला नेले. पण हॉस्पिटल पर्यंत पोहचन्या पूर्वीच काव्या हे जग सोडून गेली होती अभिराम ला एकट टाकून. राम चा आक्रोश सारा हॉस्पिटल बघत होता. कावू उठ मला सोडून कुठे चाललीस मी परत आलो आहे ग बघ एकदा डोळे उघड़ कावू तुझा राम आला आहे ग. या पावसानेच तुला दगा दिला . आता ही राम चे डोळे भरून आले. वर्ष झाले कावू ला जावून पण तिच्या आठवणी आज ही त्याच्या मनाला असंख्य यातना देत होत्या." भरून आलेल आभाळ,आणि मन दोन्ही सारखेच.
आभाळाला ही कोसळायच असत,आणि मनाला ही.
आभाळ पावसाच्या रुपात बरसते,मन मात्र तुझ्यासाठी तरसते.
आभाळच ठीक असत,त्याला धरणी घेते सामावून.
माझ्या भग्न मनाचे तुकडे ,सांग कोण घेईल सावरून."? राम अजुनच हळवा बनला होता.आता त्याची कावू काव्या च्या रुपात त्याची लेखनी बनून कायम साथ देत होती.

