तुझ्यावरती कितीही लिहिलं तरी
तुझ्यावरती कितीही लिहिलं तरी


तुझ्यावरती कितीही लिहिलं तरी ...
बरंच काही राहून जातं जे सांगावयाचे ...
भावनांचा कल्लोळ दाटतो मनी निष्प्रभ होते लेखणी
ध्यानीमनी नसताना ... सहजच उतरते कधी तू पानावरी
मी शोधतो तुला जेंव्हा मन पटलावरी तेंव्हा तू ....
तू देतेस हुलकावणी वास्तव जीवनातल्या प्रसांगापरी ..
कळेचना मला का असे घडावे ? , मुळासकट उपटून फेकाव्यात त्या आठवणी
वास्तव मी स्वीकारलंच आहे तर का मग पुन्हा हि भिक्षांदेही ?
अशी कशी ग तू माझ्यासाठी नकोशी , हवीहवीशी ..वेद्नानदायी
तू अन तुझी आठवण माझ्यासाठी असून अडचण नसून खोळंबा ?
विसरू पाहता पुन्हा - पुन्हा आठवणारी ... मजला नाहक छळणारी...
तर कधी प्रेरक आठवणीतून का होईना मजला आधार देणारी ...
तुझ्या आठवणींची शिदोरी पुरून उरते , पुनः - पुन्हा स्मरते
जगण्यास बळ देते तुझे ते स्नेहासिकत सानिध्य , तो स्पर्श ....
तुझ्या आठवणी हृदयाच्या खोल कप्प्यात जपून ठेवल्यात मी ...
माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत पुरून उराव्यात म्हणून ...
तुझ्यावरती काय लिहू ? किती लिहू ? कसं लिहू ? ...कळेचना
कितीही लिहलं तरी बरंच काही राहून जातं जाणते -अजाणतेपणे
मी झपाटल्यागत लिहत जातो पण ... लिहायचं ते राहून जातं खूप काही ...
तू भेटतेस मला प्रत्यक्षात जणू ... हितगुज करतेस उगाच असं वाटून जातं ...