STORYMIRROR

Priyanka Kumawat

Romance

4  

Priyanka Kumawat

Romance

तुझी केव्हाच होते

तुझी केव्हाच होते

1 min
273

कशी विसरणार मी साजना

आपली ती पहिली भेट

मजल दरमजल करत आलेला

मला भेटायला तू थेट !!

काय बोलावे दोघांना समजेना

नजर नजरेस न मिळेना

उगाच इकडे तिकडे पाहत

चोरून पाहयचे का कळेना

फक्त आवाज होते

ऐकत इतके दिवस

आज सुखावले नयन

आला भाग्याचा हा दिवस

बस क्षण इथेच थांबावे

थांबावे हे जग सारे

फक्त तू आणि मी तिथे असावे

बाकी कोणी मला नको रे

खुलली कळी माझी

मन क्षण क्षण सुखावले

बोलला होशील का तू माझी

तेव्हा हसू ओठांवर आले

मी तर तुझी केव्हाच होते

मन तुला कधीच अर्पिले

गुलाबी लाली गालावरची

अन डोळे माझे हे बोलून गेले


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance