त्राण#या चिमण्यांनो परत फिरा
त्राण#या चिमण्यांनो परत फिरा
बऱ्याच महिन्यांनी अगदी दोन वर्षांनी म्हणा ना, राहुल भारतात आला. स्मिता आणि सुनिल खूप खुश होते. एकूलता एक मुलगा एवढ्या दिवसांनी आला म्हणून स्मिताने खूप तयारी केली. आल्या पासून राहुल मित्र-मैत्रिणी यांच्या मध्ये गुंग झालेला असतो. स्मिता त्याच्या आवडीचे किती पदार्थ करत होती पण तो बाहेर काहीतरी खाऊन यायचा मग स्मिता चेहरा टाकायची, सुनीलराव तिला धीर देत होते.
अगं तूलाही बरे नसते, अधून मधून तब्येतीच्या कूरबूरी असतात ना मग् अंगात त्राण नसताना कशाला ओढून ताणून एवढा घाट घालतेस त्याला वाटलं तर तो तुला स्वतःहून सांगेल की, आई माझ्या साठी हे हे कर..
अहो आईच मन तुम्हाला नाही कळायचं.. असे म्हणत स्मिताने डोळे पुसले.
सुनीलरावांनी दुसऱ्या दिवशी त्याच्या लहानपणीचे सर्व फोटो काढले. राहुल उठल्या उठल्या सर्व फोटो बघून हरवून गेला. एक एक फोटो सोबत आठवणी सांगत त्याला आईच्या मनाची अवस्था सुनीलरावांनी हसत खेळत सांगितली. राहुलला जाणवले, आई आपल्याला किती मिस करत आहे. त्याने किचन मध्ये जाऊन आईला आराम करायला सांगितल आणि आज काहीतरी हलका-फुलका मेनु बनवायला घेतला. आईला खुर्चीवर बसून फक्त आणि फक्त गप्पा मारायला लावल्या.
स्मिता त्याच्या बालपणात हरवून गेली, गप्पांच्या आेघात लग्नाचा विषय काढला. राहुलच्या बोलण्यातून अजून वर्ष भर तरी विचार नाही हे समजल्यावर तिला बरे वाटले. त्याच्या मनात कॊणी नाही हे ती सूनीलरावांना सांगायला बाहेर आली. तिला झालेला आनंद तिच्या चेहेऱ्यावर दिसत होते.
बाहेर सुनीलराव फोटोंचा पसारा आवरत होते, स्मिता अगदी उत्साहात बोलत होती. वर्ष भर तरी विचार नाही लग्नाचा, कोणी मनात नाही म्हणाला. अहो मी काय म्हणते, लग्नाच्या निमित्ताने त्याला आता इथेच राहायला सांगूया.. मला माझी हौस करायची आहे हो, लग्नात, सून आली की तिचे सारे कौतुक सोहळे मला या आपल्या घरात करायचे आहेत. एवढे मोठे घर खायला येतं हो मला.
राहुलने सर्व ऐकले, त्यानी अगदी पटकन सांगितलं. आई, मी नाही येणार भारतात परत.. मला तिकडेच सेटल व्हायच आहे. हे ऐकताच स्मिता पेक्षा सुद्धा सुनीलराव गडबडून गेले. त्यांच्या पायातले त्राण गेल्यासारखे झाले, मटकन खालीच बसले. स्मिता मात्र धीराने घेत होती.
राहुल, आम्हाला तुझ्यासोबत राहायचं आहे.. स्मिता अगदी कळकळीने सांगत होती. आता या वयात आम्हाला असे एकाकी सोडु नको.
तुम्ही तिकडे चला, राहूल म्हणाला.
अरे, आमचे अख्खं आयुष्य इथे गेले, नातेवाईक इथे.. तिकडे तुम्ही तुमच्या विश्वात आम्ही कसे वेळ घालवू? इथे असलास तर आम्हाला पण बरे वाटेल. कामासाठी तू जा, पण कायमचा नको रे. स्मिता रडू लागली.
आई, आता प्लीज रडून मला कमजोर करू नकोस.. राहुल अगदी चिडुन बोलला... तुम्हीच मला परदेशी पाठवले ना.. आता तुम्हीच मला कमजोर करत आहात... मी एवढे यश मिळवले, म्हणून सर्व कौतुक करतायत माझे... तिकडे यशाचा रस्ता दिसतोय मला... माझी हि भरारी मी तुमच्यामुळे घेऊ शकलो, अन आता तुम्हीच का मला मागे खेचताय... राहुल म्हणाला
राहुलचे हे बोलणे ऐकून, स्मिताने सुनीलरावांच्या खा़ंद्यावर हात ठेवत त्यांना आधार दिला.
स्मिता त्याला म्हणाली, राहुल खर आहे तुझे तू हुशार आहेस, तूला यश मिळाव, तू चांगले शिक्षण घेऊन तुझ्या आयुष्याचे कल्याण व्हावे म्हणून आम्ही तूला पाठवले. आम्ही तुला मागे का खेचू? पण तूला एक सांगूं.. "पिल्लू बनून घरट्यात येणार मूल जेव्हा पक्षी होऊन आकाशात गरूडभरारी घेते, तेव्हा आई-वडिलांना होणारा आनंद हा वेगळाच असतो, पण हाच पक्षी जेव्हा स्वतःचे घरटे वेगळे करतो तेव्हा मात्र त्यांना स्वतःचे पंख तोडल्याप्रमाणे यातना होतात...." हे बोलुन त्यांनी सुनीलरावांना धीर देत आत नेले.
अगं काय बोलतोय हा.. माझ्यात अजून काही ऐकायचे त्राण नाहीत आता.. मला सहन होत नाही ग.. पहाडासारखा बाप आज लहान मुलासारखा ओक्साबोक्शी रडत होता.. स्मिता त्याची आई होऊन धीर देत होती.
आईचे हे वाक्य राहुलला खूप लागले. त्याने विचार केला, त्याला त्याची चूक समजली. राहुलने आई-बाबांची माफी मागितली. नेहमीच मी तुमच्यासोबत राहीन. तुम्हाला कधीच अंतर देणार नाही असे वचन दिले...
काही महिन्यातच त्याने भारतात ट्रान्सफर करून घेतली. स्मिताने छानशी मुलगी बघून त्यांचे लग्न लावुन दिले. राहुलने त्याचे वचन पूर्ण केले. एक सुखी कुटुंब त्या घरात आनंदाने नांदू लागले.
कशी वाटली कथा? आवडली असेल तर खाली ❤️ असा आकार आहे तो नक्की प्रेस करा.
अभिप्राय द्यायला विसरू नका हं..!! अर्थात तुमच्या कंमेंटमधून.. अजून लेख वाचत राहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका.... साहित्य चोरी हा गुन्हा आहे.
सदर कथेच्या प्रकाशनाचे, वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे याची नोंद घ्यावी.
कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.
