Anuja Dhariya-Sheth

Tragedy Inspirational

4.0  

Anuja Dhariya-Sheth

Tragedy Inspirational

डोळ्यातील वासनेचे बोल

डोळ्यातील वासनेचे बोल

3 mins
1K


रेणू काय झालंय सांग मला.. राजेश म्हणाला


काही नाही.. मग् तुझे डोळे का असे दिसतायत..


रेणू नजर चुकवत होती..


राजेशने तिच्या जवळ जाऊन तिचा हात हातांत घेतला.. ती थरथरत होती.. शांत हो, तू नाही बोललीस तरी तुझे हे भेदरलेले डोळे खूप काही सांगत आहेत..


अहो कस सांगूं तुम्हाला.. मोठ्या ताई आल्या कि मला नेहमीच जाणवते..पण आज माझ्या मनातली भीती खरी ठरली.. दादांनी आज मला.. किती दिवस त्यांचे तें डोळे वेगळेच बोल बोलत होते.. मनात येऊन गेले माझ्या.. पण कस सांगू? कोणी विश्वास ठेवेल की नाही अशा हजार शंका माझ्या मनात येत होत्या..

पण आज त्यांनी मला गाठल.. तुम्ही कोणीच नव्हतात.. आई, मोठ्या ताई मंदिरात गेल्या होत्या.. तुम्हाला ऑफिस मधून यायला वेळ लागला आणि त्यांनी टीव्ही वर कसलस अश्लील शूटिंग असलेले गाणे लावले अन् माझा हात हातात धरला.. मी झटकला..


तें माझ्या मागे बाहेर आले.. त्यांच्या डोळ्यात तें भाव आज अगदी स्पष्ट दिसत होते.. मला भीती वाटू लागली.. काय करू मला काहीच कळत नव्हतं.. बाथरूम मध्ये जाऊन कडी लावुन बसले.. तेवढ्यात बाबा आणि तुम्ही आलात.. म्हणुन बाहेर आले, तुम्हीच म्हणालात, ते बाहेर गेले आताच.. मग् मी काही विषय काढला नाही.. लवकरच जेवण आवरून आपल्या रुममध्ये आले.. असे म्हणतं राजेशच्या गळ्यात पडून ती रडू लागली..


राजेश एकदम सून्न झाला.. आपल्या घरात असे काही घडू शकत यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता.. पण रेणूचे ते घाबरलेले डोळे बरच काही बोलत होते... दुसऱ्या दिवशी त्याने सुट्टी घेतली.. तो घरी असल्यामुळे रेणूला खूप सुरक्षित वाटत होते.. थोड्या वेळाने सर्व बाहेर गेल्यावर त्याने सुद्धा बाहेर जाऊन येतो असे खोटे सांगितलं.. तो बाहेर गेल्यावर रेणू एकटीच असणार हे माहित होते, त्यामुळे परत कालसारखाच तिचा हात धरला, रेणू घाबरली असली तरी हिंमत गोळा करून तिने एक कानशीलात लगावली..


तुझी हि हिम्मत ह्या घरच्या जावयावर हात उचललास? असे म्हणत दाट ओठ खावून तिचा अंगावर धावत जाणार तोच राजेश मध्ये आला.. त्याने लगेच धमकावल, आणि तिचे काही तिच्याही नकळत काढलेले फोटो दाखवले.. रेणू खूप घाबरली.. राजेशने तिला धीर दिला आणि अतिशय शांतपणे हा विषय हाताळायच ठरवल...


त्याने त्याचा मित्र जो इन्सपेक्टर होता त्याची मदत घायची ठरवली.. कारण घरच्या मोठ्या जावयावर केलेला आरोप सर्वांच्या कितपत पचनी पडेल तें माहीती नव्हते.. धीराने घेणे, हाच उपाय होता.. त्याचे रेणूवर असलेले प्रेम आणि विश्वास पाहून रेणूच्या डोळ्यात त्याच्या विषयी असलेले प्रेम आणि आदर दोन्ही वाढला होता..


राजेशच्या मित्राने एक प्लॅन आखला, त्या प्रमाणे रेणूला घरात एकटे ठेवून तें सर्व मुद्दामून बाहेर आले.. तिला एकटीला बघून त्याने परत धमकावायला सुरुवात केली.. आज राजेश पण नाही.. आता काय करशील? माझं ऐकले नाहीस तर तुझे हे फोटो मी वायरल करेन.. रेणू मात्र धीर एकवटून या प्रसंगाचा सामना करत होती.. मनात असलेली भीती डोळ्यात दाखवत नव्हती.. त्याने जबरदस्ती करण्या आधीच राजेश आणि मित्र तिथे पोहचले, विडिओ रेकाॅर्डींग दाखवत त्याला पकडून नेले.. ज्या डोळ्यात घाणेरडी वासना असायची त्याच डोळ्यात आज गुन्हा पकडला गेल्यामुळे शरम आली होती..


कथा पूर्ण काल्पनिक आहे, आपल्या आजू बाजूला अशा बऱ्याच जणी असतात ज्या अशा प्रकारच्या लैंगिक शोषणाला बळी पडतात, अशा प्रकारच्या अन्यायाला वाचा फोडायला घाबरतात.. म्हणुन असे गुन्हेगार यांचे फावत जाते.. पण हल्लीची नारी मात्र कोणालाही न घाबरता तिच्यावर अन्याय झाला तर करते "मी टू" चा फुत्कार...


पूर्वीची लाजरी-बूजरी स्त्री आता तुम्ही विसरा...

बिजली होऊन करते ती आता अत्याचार करणार्याचा कचरा....

अन् सक्षम होऊन करते अन्यायाचा निचरा...

आतापर्यंत तिला अबला म्हणत तुम्ही जपलात तुमचा खोटा अहंकार...

पण आता मात्र तीच्यावर होणार्या अन्यायाचा ती करेल मी टू म्हणत फुत्कार...

कशी वाटली कथा? आवडली असेल तर खाली ❤️ असा आकार आहे तो नक्की प्रेस करा.

अभिप्राय द्यायला विसरू नका हं..!! अर्थात तुमच्या कंमेंटमधून.. अजून लेख वाचत राहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका.... साहित्य चोरी हा गुन्हा आहे.

सदर कथेच्या प्रकाशनाचे, वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे याची नोंद घ्यावी.

कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy