Anuja Dhariya-Sheth

Classics

4.0  

Anuja Dhariya-Sheth

Classics

(ऑनलाईन) शुभमंगल सावधान....

(ऑनलाईन) शुभमंगल सावधान....

6 mins
249


हल्ली बऱ्याच गोष्टी ऑनलाईन करता तुम्ही लोकं.. मग् लग्नासाठी का नाही ट्राय करत.. किती तरी संस्था आहेत.. सुधीर काका आपल्या पुतण्याला सुयोगला सांगत होते..


अहो काका, एकदा कडू अनुभव घेतलाय, तो हि समोरासमोर भेटून, समाजातले ओळखीचे असून.. आता हे असे ऑनलाईन.. मला भीती वाटते..


सुयोग एक उच्चशिक्षित, निर्व्यसनी मुलगा.. घरची कारखानदारी, घरात सर्व सुबत्ता.. मोठा असल्यामुळे सर्व जबाबदारी त्याच्या वरच होती.. बहिणीचे लग्न झाले.. धाकट्या समीरचे मामाच्या मुलीवरच प्रेम होते.. त्यामुळे ती सोयरीक अगदीच घरातली.. संगीताचे लग्न एकच मुलगी म्हणून थाटामाटात लावुन दिले. आई- बाबा एका अपघातात गेले तेव्हापासून सुयोग आणि सुधीर काका सर्व काही बघत होते.


हे सुधीर काका म्हणजे खर तर त्याच्या बाबांचे अगदी जीवश्चकंठश्च मित्र.. तसे तें पायाने थोडे आदू त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी पाठ फिरवली.. सुधीर पोरका झालेला पाहून संजयरावांनी म्हणजेच सुयोगच्या वडीलांनी त्याला आधार दिला.. त्याची जाण सुधीरला नेहमीच होती, म्हणून तर त्या मुलांना सुधीर काकाचा आधार होता..


संगीताच लग्न झाल्यावर, आत्या बाईंच्या ओळखीने एक स्थळ आले, आता उशीर नको म्हणून झट मंगनी पट ब्याह झाला अन् सारीका घरात आली.. पण तीच वागण जरा वेगळच वाटत होते.. हळू हळू रुळेल असे सर्वाना वाट्त होते.. पण तीचं वागण अजूनच विचिञ होत होते.. घरात रोज कलह, वाद.. सर्व चित्रच बदलून गेले.. सुधीर काकांवर चोरीचा आळ घेतला तिने अन् सुयोगच्या सहनशक्तीचा अंत झाला.. त्याने रातोरात तिला माहेरी नेऊन सोडली खूप वाद झाले अन् मग् खर कारण बाहेर आले की तिच्या मनाविरूद्ध हे लग्न झाले होते.. अन् शेवटी २ महिन्यातच घटस्फोट झाला..


कोर्ट आणि बाकी सर्व फॉर्मॅलिटी होई पर्यंत वर्ष गेले.. मधल्या काळात समीरचे लग्न अगदी साधेपणाने झाले आणि संचिता घरात आली. मामाची मुलगी त्यामुळे तिच्या येण्याने घर हसत खेळत होईल याची सुधीर काकांना खात्री होती.. घरातले वातावरण हळू हळू निवळत होते. संचिताच्या येण्याने घर अगदी भरून गेले, सर्व काही अगदी बारीक सारीक गोष्टींमध्ये ती जातीने लक्ष घालत होती..


पण सुयोग मात्र अजूनही शांतच असायचा.. म्हणूनच काकांनी आज परत एकदा विषय काढला.. किती मुली बघितल्या पण गावाकडे राहायला मुली तयार नव्हत्या, एवढी सुबत्ता असून सुद्धा गावात राहतात म्हणून मुली नकार देत होत्या..


समीरचा संसार मात्र छान चालला होता. संचिता अगदी मनापासून करायची सुयोग दादा आणि सुधीर काकांचे.. आपल्या पुतण्यांना खेळवण्यात सुयोग रमून जायचा, मनमोकळा हसायचा.. पण तें फ़क्त तेवढ्या पुरतेच असायचे.. नंतर मात्र स्वतःच्या विचारात असायचा..


काका म्हणाले, अरे ऑनलाईन लग्न जमले तर जमले.. प्रयत्न करायला काय हरकत आहे.. असे म्हणून काकांनी संचिताला हाक मारली, ऑनलाईन लग्न जमवायला कुठे कुठे अकाउंट काढतात सांग बर मला...

सुयोग दादा तयार आहे हे पाहून तिला एवढा आनंद झाला की हातातले काम टाकून तीने लॅपटॉप वर माहीती बघायला सुरुवात केली.. एक दोन संस्थांमध्ये लगेच रजिस्टर केले, त्यांचे एप स्वतःच्या मोबाइल मध्ये घेऊन तीने काही जणींना स्वतः फोन लावले पण गावात राहायला कोणी तयार नाही..


त्यांना अजून एका नामांकीत वेब साईटची माहीती मिळाली. तिथे ३००० रू भरून रजिस्टर करता क्षणीच त्यांचा एक तासात फोन आला, तुमचे प्रोफाईल हे काही मुलींना आवडले आहे तर तुम्ही १७०००-१८००० भरावे लागतील.. पैशांची काहीच कमतरता नव्हती.. सुधीर काका आणि तिला मात्र खूप घाई लागली उत्साहाच्या भरात तें अगदी भरभरून बोलत होते.. त्यांचे बोलणे समीरने ऐकताच त्याला संशय आला. त्यांनी त्या दोघांना थांबवत सुयोग दादा सोबत शांत बोलतो मग् काय तें करू..


संचिताला मात्र त्या बाबतीत तेवढे काही माहीती नव्हती आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात याची कल्पना नव्हती, त्यामुळे तिला राग आला..


त्या दोघांनी ह्या विषयावर अभ्यास केला असता हि किती लबाडी आहे हे लक्षात आले त्यांच्या.. तोवर संचिता आणि काका यांनीं अजूनही अशा बऱ्याच ठिकाणी थोडे थोडे करत २०,००० रू घालवले होते. त्यांना पैशाची काही कमी नव्हती.. पण ह्या भामट्यांना अद्दल घडवायची असे त्यांनी ठरवले..


दोघांनी मिळून प्लॅन केला आणि हे ऑनलाईन ऋणानुबंध जुळवणार्या भामट्यांना कसे अडकवायचे हे ठरवले..


संचिताने शोधून काढलेल्या प्रत्येक संस्थेत त्यांनी समीरचे खोटे अकाउंट काढले, येणारे प्रत्येक फोन रेकॉर्डिंग करून ठेवले त्यांनी दिलेली माहिती स्क्रीन शॉट काढत सेव करून ठेवली. काही ऑनलाईन संस्थांकडून मिळालेले फोटो, माहीती हि सुद्धा बनावट होती.. त्यांनी या सर्व प्रकारातले पुरावे महिन्याभरातच गोळा केले.. आणि तें सर्व बघून संचिता अन् काका मात्र थक्क झाले.. खरंच काय काय घडत या दुनियेत कोणावर विश्वास ठेवायचा? अन् कोणावर नाही..


सोशल मिडियाचा आधार घेत त्यांनी या ऑनलाईन खोटे ऋणानुबंध बांधणार्या संस्थाना चांगलेच वेठीस धरले.. त्यांनी किती तरी युवक-युवतींना फसवले असते.. हि पोस्ट जशी वायरल झाली तसे यांचे जाळे पकडण्यात आले..


या सगळ्या प्रकारात जिची अशीच फसवणूक झाली होती अशी साधना गोगटे म्हणजेच सुयोगची वर्गमैत्रीण त्याला भेटली.. तिचे पूर्वायूष्य खूप भयानक होते.. आई-वडीलांनी अशाच एका संस्थेमधून लग्न जमवले.. मुलगा अमेरिकेत राहणारा होता.. सर्व काही चांगले म्हणून आई-बाबा भूलले, लग्न करून ती परक्या देशात आली खरी.. पण ज्या माणसावर विश्वास ठेवून ती परक्या देशात आली त्यांनीच तिला परकी केली.. खुप् अत्याचार सहन केला होता तिने.. सिगरेटचे चटके, बेल्टचे फटके किती अन् काय सहन केले तीने... शेवटी त्या नरकातून तिने सुटका करत कसा तरी मायदेश गाठला होता.. त्यामुळे ती त्या धक्क्याने अगदी खचून गेली होती..


सुयोग आणि साधना एकमेकांसमोर आले असता तिची ती अवस्था बघून सुयोगला खूप वाईट वाटले.. क्षणभर त्याच्या मनात आले, खरच या संस्थाविषयी तक्रार करून त्यांना शिक्षा मिळेलही.. पण त्यांच्यामुळे ज्यांच्या वर असा मानसिक आघात झालाय त्याचं काय? सुयोग काही तरी मनाशी ठरवून घरी आला.. सुधीर काकांना मिठी मारून खूप रडला, मोकळा झाला..


काका, साधनाला मी बरे करेन अन् तिच्याशीच लग्न करेन.. त्या वेळेस आई बाबा गेले आणि मी तिच्याशी असलेले नाते तोडले, जबाबदारी मला जास्त महत्वाची वाटली तिचा विचार केला नाही.. तीच्या ह्या अवस्थेला मी कुठे ना कुठे जबाबदार आहे.. ती थांबायला तयार होती.. पण मी...


एवढे वर्ष संयमाचा घातलेला बांध आता सुटला होता.. काकांनी त्याला धीर दिला, समीर आणि संचिता यांचा तर त्याला प्रत्येक गोष्टीत पाठींबा होता...


पैसा, अडका कशाचीही कमी नव्हती.. त्यामुळे साधनाच्या आई-वडीलांशी सल्ला मसलत करून त्यांनी तिची जबाबदारी घेतली.. मोठ्यात मोठ्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली.. साधना मध्ये फरक दिसून येत होता पण अजून आई- बाबा सोडले तर ती बाकी कोणालाच ओळखत नव्हती.


ह्या सर्व गोष्टीत सहा महीने निघून गेले, ऑनलाइन संस्था विरूद्ध असलेली केस अजूनही चालू होती, तारीख पे तारीख पडत होती.. पण त्या सर्वांपेक्षाही सुयोगला आता साधना बरी होण महत्वाचं होते..


साधना आणि सुयोगचे नाते परत नव्याने फुलत होते.. साधनाच्या आईने तिला तीच्या पूर्वाआयुष्याबाबत डॉक्टरांच्या सल्ल्याने माहिती दिली होती..


तिला फारसे काही आठवत नसले तरी सुयोगसोबत नव्याने आयुष्य सुरु कराव असे तिलाही वाटत होते.. योग्य वेळ बघून सुधीर काका आणि साधनाचे आई बाबा यांनी त्या दोघांना एकत्र बसून हि गोष्ट मनावर घ्यायला लावली आणि दोघांच लग्न लावुन दिले..


ऑनलाईन ऋणानुबंध आणि माहीती असून बांधले गेलेले ऋणानुबंध या मधुन दोघेही शेकून निघाले होते त्यामुळे खरच त्यांच्यासाठी हे शुभमंगल अगदी सावधानच...

पण शेवटी त्यांच्या मध्ये असलेल्या प्रेमाच्या, मैत्रीच्या, संस्काराच्या ऋणानुबंधाने तें ह्या रेशीमगाठीत बांधले गेले होते.. अन् एकमेकांना सात जन्माचे वचन देत त्यांच्या आयुष्यात खर्या अर्थाने आनंदाची, सुखाची एन्ट्री झाली होती...


कथा पुर्ण काल्पनिक असली तरी ऑनलाईन लग्न जमवताना खरच सावधान.. ऑनलाईन ऋणानुबंध जूळता जूळता असे अनेक अनुभव अनेक नामाकीत संस्थामधून येतात.. बऱ्याच जणांना आले असतीलही... म्हणूनच पुढच्यास ठेच मागचा शहाणा या प्रमाणे तुम्ही नक्कीच खात्री कराल.. नाही करावीच हि माझी तुम्हाला अगदी विनंती आहे.. कारण खोटे प्रोफाईल दाखवून हे तुम्हाला फसवत असतात..


सगळ्याच संस्था अशा आहेत असे मला अजिबात म्हणायचं नाही.. आजू बाजूला आलेला अनुभव त्यावरून हि कथा सुचली.. कोणा बद्दल गैरसमज पसरवण्याचा हेतू नाही.. कोणाचे मन दुखावण्याचा हेतू नाही...


कशी वाटली कथा? आवडली असेल तर खाली असा आकार आहे तो नक्की प्रेस करा.

अभिप्राय द्यायला विसरू नका हं..!! अर्थात तुमच्या कंमेंटमधून..


अजून लेख वाचत राहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका.... साहित्य चोरी हा गुन्हा आहे.

सदर कथेच्या प्रकाशनाचे, वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे याची नोंद घ्यावी.

कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics