Anuja Dhariya-Sheth

Others

4.0  

Anuja Dhariya-Sheth

Others

अस्वस्थता मनाची

अस्वस्थता मनाची

2 mins
298


काय झालं अस्वस्थ वाटत आहेस? आईने विचारले...


साक्षी म्हणाली, काही नाही ग आई...


आई म्हणाली, माझ्यापासून लपवू नकोस काही...


साक्षीचे डोळे भरून आले..


काय झालंय बाळा?... आई


माझं मन खूप अस्वस्थ झालंय ग.. काय भीती? कसली भीती मला कळंत नाही ग... साक्षी


कसली भीती बाळा?... आई


अगं, आम्ही काही वर्षांपूर्वी कॉलेजच्या ट्रिपला गेलेलो आठवतय का तूला?... साक्षी


हो आठवतय, पण त्याच काय आता?... आई


अगं आई तेव्हा रोशन नावाच्या एका मुलाने मला प्रपोज केले.. मी नकार दिल्यावर त्याने माझ्यावर... असे बोलताना तिला हूंदका आवरला नाही..


साक्षी.. काय बोलतेस? काय झालंय.. आई धक्का बसल्याने ओरडली...


मला सांग काय झालंय? अगं १५ दिवसावर लग्न आलय तुझे.. साकेत आणि त्याच्या घरच्या माणसांना काही समजले तर... आईच काळीज ते धडधडल..


साक्षी म्हणाली, आग आई त्याने प्रयत्न केला.. पण मी जोरात कानाखाली मारली, तेव्हा त्या आवाजाने काही मित्र-मैत्रिणी आले त्यामुळे तो प्रयत्न असफल ठरला...

पण आता तो मला धमकी देतोय.. मला भीती वाट्ते...


आता आईच्या लक्षात सर्व गोष्टी आल्या.. तीने साक्षीला धीर दिला.. शांत हो.. घाबरू नको.. तुझी बाजू चुकीची नाही ना.. मग् शांत हो..


आपण साकेतरावांना सारं काही खरं सांगूं.. आई म्हणाली..


साक्षी मात्र काय होईल या विचाराने अस्वस्थ होती..


आईनं साकेतला फोन करून बोलावले.. आई सुद्धा काळजीने थोडी अस्वस्थ झाली होती.. साकेतने तें बरोबर ओळखले..


आई म्हणाली, साकेतराव.. गैरसमज करून घेऊ नका..


आई अहो काय झालंय? मला सांगा ना.. मला तुम्ही काय बोलताय तें काहीच कळत नाही आहे...


आईने अतिशय नाजूकपणे हा विषय हाताळला.. सर्व काही नीट सांगितलं.. साक्षी आईला बघतच बसली..


साकेत खूप शांत पणे म्हणाला, आई आपण माझ्या काकाची मदत घेऊ.. तो इन्स्पेक्टर आहे... माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे.. काही काळजी करू नका.


त्याने काकाला भेटून सर्व काही सांगितलं... काकाने लवकरच रोशनला पकडले.. त्याला भेटून चांगलीच समज दिली..


रोशन चांगलाच घाबरला.. त्याने सर्वांसमोर साक्षीची माफी मागितली.. तिची बदनामी करणार नाही असे वचन दिले..


साक्षीला साकेतचे खरच खूप कौतुक वाटले.. त्याच्या बद्दलचा प्रेम अन् आदर दोन्ही वाढीस लागले...


तरीही साक्षीच्या मनाची अस्वस्थता काही कमी होत नव्हती.. तेव्हा काका आणि साकेत या दोघांनी तिला आश्वासन दिले की हा विषय इथेच संपला.. याची वाच्यता बाहेर कोठेही होणार नाही...


हे ऐकल्यावर साक्षी आणि तिच्या आईचा जीव भांड्यात पडला अन् आपल्या लेकीला अगदी योग्य जोडीदार मिळाला म्हणून आईच्या मनाला असणारी काळजीरूपी अस्वस्थता दूर झाली...


Rate this content
Log in