Anuja Dhariya-Sheth

Classics

4.0  

Anuja Dhariya-Sheth

Classics

तिची हिम्मत.. तिची ताकद

तिची हिम्मत.. तिची ताकद

3 mins
380


तुझ्यातच हिम्मत नव्हती, वेगळे राहायची असे शेखर चिडून बोलला आणि स्मिताच्या कानात कोणीतरी रक्त ओतत आहे असे वाटले तिला.. तिच्या अंगातले त्राणच नाहीसे झाले. लग्नाला १५ वर्षे झाली होती. सासूबाई, सासरे यांच्या सोबत शेखरचे मुलगा असून सुद्धा पटत नव्हते. सारखे वाद, कटकट.. स्मिता कंटाळून जायची पण आपण वेगळे झालो तर या वयात आई- बाबांना कोणाचा आधार? आणि आपले आणि त्यांचे काहीच वाकडे नाही. आई-वडील आणि मुलगा यांच्या भांडणात आपण कशाला पडायचे? असा विचार करून ती या घराला एकत्र बांधून ठेवायचा प्रयत्न करत होती. शेखर अतिशय तापट, हेकेखोर.. त्याचा स्वभावच होता तसा. स्मिता खूप कंटाळायची, रडायची..


घरात शांतता कशी राहील यासाठी तीचा प्रयत्न असायचा. घरात कटकट होऊ नये, सर्वांची मन जपली जावी म्हणून खूप प्रयत्न करायची. सासूरवासापेक्षा तिला नवरेशाही सहन करावी लागत होती.


सासू- सासरे, दीर, नणंद, मूले आणि नवरा या सर्वांच करता करता तिला इतकी वर्षे झाली तरी घटकेची देखील उसंत मिळत नव्हती. बाजारात गेली तरी जाताना सारख कॊणी ना कोणी टोकायचे, हे आण, तें आण.. बाजारातून येताना पिशव्या पकडता पकडता नाकी नऊ यायचे. शेखर जबाबदारीची जाणीव नव्हती म्हणून प्रत्येक गोष्ट ती लक्षपूर्वक करत होती..


पण आता मात्र शेखरने हद्द पार केली होती.. मधली काही वर्ष नणंदेचे लग्न म्हणून, दीराचे लग्न म्हणून तिने सर्व काही दुर्लक्ष करत करत दिवस पुढे ढकलले, आता त्यांच्या लग्नाला १५ वर्ष झाली.. मुलांचा अभ्यास, त्यात तिच्या पाळीमुळे तिच्या बारीक- सारीक तक्रारी सुरू होत्या. शेखरचे घरात कोणाशीच पटत नव्हते.. आता तिला या सर्वांचा वीट आला होता म्हणून आज ती चिडुन शेखरला बोलली, मला नाही सहन होत आता एकतर तुमचा अतातायीपणा दिवसेंदिवस वाढत आहे, सर्वाची तोंड वेगवेगळ्या दिशेला, मला नाही होत आता.. असं वाट्तय तेव्हाच वेगळी झाले असते तर बर झाल असते...


बरं या गोष्टीच खापर पण शेखरने तिच्यावर फोडले, तुझ्यातच हिम्मत नव्हती असे तिने ऐकले आणि खूप रडली... काय कराव काहीच कळत नव्हते तिला...


सासूबाईने बाहेरून त्यांचे बोलणं ऐकले होते.. पण शेखर असतंना काहीच बोलल्या नाहीत.. त्या गेल्यावर खोलीत येऊन त्या स्मिताला म्हणाल्या, मला कळतंय तुझी घूसमट होते... कारण तूला घटकेची फूरसत मिळत नाही वर परत काडीची मिळकत नाही म्हणून ऐकाव लागतंय.. अजून वेळ गेली नाही त्याने तुझी हिम्मत काढली, पण तुझ्यामध्ये खूप हिम्मत आहे बाळा, दाखवून दे त्याला..


तू या आधी केक, चोकोलेट्स, कुकीज किती छान बनवायचीस..परत सुरू करूया आपण.. मी आहे, वयाने होत नाही ग आता.. पण नेहमीच तू ह्या घराची एकी टिकावी म्हणून प्रयत्न केलास.. आज तुझी अशी अवस्था मी नाही बघू शकत..


सासूबाईंच्या बोलण्याने तिला उभारी आली.. तीने परत एकदा हे सर्व चालू करायचं ठरवले... शेखरच्या नकळत छोट्या छोट्या ऑर्डर घेऊ लागली.. तशीही कामाची सवय तिला होतीच, फक्त आता या कामाचे तीच्या हक्काचे पैसे तिला मिळणार होते शिवाय स्वतःची वेगळी ओळख सुद्धा...


सासू आणि सासरे यांच्या सपोर्ट मुळे तिने लवकरच घराजवळ आपले दुकान काढले.. शेखरचा पुरूषी अहंकार मात्र दुखावला गेला होता.. पण आता त्याच्या बोलण्याची तिला इतकी सवय झाली होती की तीला त्याचे वाईट वाटतच नव्हते.. कारण सासूबाईंनी दिलेल्या पाठींब्यामूळे तिची हिम्मत तिची ताकद बनली होती.


कशी वाटली कथा? आवडली असेल तर खाली ❤️ असा आकार आहे तो नक्की प्रेस करा.

अभिप्राय द्यायला विसरू नका हं..!! अर्थात तुमच्या कंमेंटमधून.. अजून लेख वाचत राहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका.... साहित्य चोरी हा गुन्हा आहे.

सदर कथेच्या प्रकाशनाचे, वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे याची नोंद घ्यावी.

कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.



Rate this content
Log in

Similar marathi story from Classics