तो मी आणि श्रावण
तो मी आणि श्रावण
आता ही श्रावण चालू झाला होता.कधी ऊन तर कधी पाऊस पडत असायचा.शिल्पी ला खूप आवडायचा पाऊस..श्रावण महिन्यातला पाऊस खास आवडायचा तिला.म्हणायची किती छान ना हेमंत क्षणात पाऊस असतो तर क्षणात ऊन.आयुष्य पण असच असत ना रे.कधी दुःख असते तर कधी अचानक सुखाची लहर येते.
आज वीस वर्षानी तिला भेटायला चाललो होतो.जुन्या आठवणी मनात पिंगा घालत होत्या.कॉलेज मध्ये ट्रॅडिशनल डे होता तेव्हा शिल्पी चक्क नऊवारी नेसून आली.नाकात नथ,हातात बांगड्या .लालभडक मेंदी ने रंगलेले हात ."हेमंत कशी दिसते मी? त्याच्या समोर येऊन शिल्पी ने विचारले, तू ना श्रावणातली श्रावण सरी सारखी दिसतेस.प्रसन्न आणि सुंदर.माझ्या वर प्रेमाचा वर्षाव करणारी श्रावण सरी..
खूप छान लाजली होती तेव्हा.तीच ते रूप मनात साठवून ठेवले होते मी.कित्येक दिवस तिचा तो साडी मधला फोटो जपुन ठेवला होता.
कॉलेज जवळ असणाऱ्या कॅफे मध्ये,जिथे नेहमी आम्ही भेटायचो..तिथेच आज शिल्पी भेटणार होती.
हेमंत आत जावून बसला कॅफे आता पूर्ण मॉडर्न झाला होता.पाचच मिनिटात शिल्पी आली.जशी कॉलेज मध्ये होती तशीच दिसत होती.थोडा चेहरा मात्र उतरलेला दिसत होता.
हाय हेमंत कसा आहेस? त्याच्या समोर बसत तिने विचारले.
मी ठीक आहे तू सांग.
मी ही ठीक आहे .तू जरा जाड झालास हेमंत..आणि डोक्यावर चांदी उगवली की..
हममम वीस वर्षांचा काळ लोटला शिल्पी.
बाकी तू काय करतेस आणि तुझे मिस्टर?
नाही हेमंत मी लग्न नाही केले.तिच्या डोळ्यात पाणी आले.
शिल्पी..अशी कशी बनली आहेस तू. दुसऱ्यांना आनंद वाटत फिरणारी स्वतः मात्र..
हेमंत जावू दे तो विषय.मी एकटी ही आनंदात आहे रे. आपल्या आठवणी आहेत ना सोबत करायला.
पण शिल्पी एकटीने आयुष्य काढलेस ,कधी लग्न करावे अस नाही वाटल का?
नाही इच्छा नाही झाली.मग दोघे बराच वेळ बोलत राहिले.
निघताना शिल्पी म्हणाली,पुन्हा आलास की घरी ये.आणि हो तू बोलला होतास ना..श्रावणात आपण मस्त निसर्गाच्या सान्निध्यात फिरायला जावू.तिथे फक्त तू मी आणि श्रावण असेल.तो शब्द पूर्ण कर.माझी तुझ्या कडून तेवढीच अपेक्षा आहे.
हो शिल्पी नक्की जावू आपण. पुढच्या वेळेला मी श्रावणात येईन भेटायला.
एकमेकांचा निरोप घेवून दोघे आप आपल्या मार्गाला लागले.हेमंत कार चालवत होता.पण मन भूतकाळात गेले.त्याची शिल्पी आज ही त्याच्या वर प्रेम करत होती.एकटी राहिली आणि मी काय दिले तिला. फक्त अश्रू!!
हेमंत बोल ना काय झाले.इतकं तातडीने का बोलवलस मला.
शिल्पी .माझ्या बहिणी ला स्थळ आले आहे.
अरे मग छानच आहे ना,पण कोण तो मुलगा आहे इतका मोठ्या मनाचा.
शिल्पी माझी बहिण अपंग आहे.व्हील चेअर वर असते कायम.
हो हेमंत तू सांगितलेस ना मागे,म्हणून विचारतेय कोण हा मुलगा जो लग्नाला तयार झाला.ताई खुश असेल ना.
हो खूप आनंदात आहे ती,पण
पण काय हेमंत कसली अडचण आहे का?
शिल्पी तो मुलगा ताई शी लग्नाला तयार झाला कारण त्याची बहीण सुद्धा आजारी असते नेहमी,तिच्याशी मी लग्न केले तर तो ताई सोबत लग्न करेल या अटीवर.
काय....हेमंत काय बोलतो तू? आणि तू काय उत्तर दिलेस मग?
शिल्पी मला माफ कर,माझ्या बहिणी च्या सुखा साठी मी आपल्या प्रेमाचा त्याग केला आहे.मी होकार दिला आहे लग्नाला.
शिल्पी हे ऐकून सुन्न झाली,,तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले.
हेमंत शी एक शब्द न बोलता ती निघून गेली.
हेमंत ही खूप रडला. परिस्थिती ने त्याला लाचार बनवले होते.
त्या नंतर शिल्पी एक दोन वेळा भेटली पण अनोळख्या सारखं. आज त्याने इकडे आलो आहे तर प्लीज भेट .खूप वर्ष झाली तुला पाहून..अस शिल्पी ला बोलला होता.म्हणून ती तयार झाली होती.
आज श्रावणातला सुंदर दिवस होता. कोवळ ऊन सगळी कडे पडलेलं होत.कधी पाऊस तर कधी ऊन असा निसर्गाचा लंपडाव सुरू होता.शिल्पी आणि हेमंत एकत्र निसर्गाच्या रम्य वातावरणात रमले होते.
हेमंत, सौम्या बद्दल समजले तेव्हा तुला भेटाव अस नाही वाटले कारण मी तुला दुखात नाही बघू शकत.
असू दे शिल्पी मला काही नाही वाटले त्याचे.सौम्या आजारी असायची नेहमी.म्हणून एकच मुल झालं आम्हाला.ती होती तो पर्यंत तिला कसलीच कमतरता जाणवू दिली नाही.औषध, उपचार सगळ नीट केले.
जेवढं ती जगली तेवढं दिवस मी तुला सुखातच ठेवले.
हेमंत मला अभिमान वाटतो तुझा.आणि ताई कशी आहे.?
ताई ही आनंदात आहे.एक मुलगा दत्तक घेतला त्यांनी.
हेमंत थँक् यू सो मच.शिल्पी त्याचा हात हातात घेत म्हणाली.
मी दिलेला निदान हा शब्द तरी पाळू शकलो ,तुझ्या साठी इतकं करता आले यातच मला समाधान आहे
हेमंत..किती छान वाटते ना,तू मी आणि हा श्रावण..आज इतक्या वर्षांनी शिल्पी च्या डोळ्यात फुललेला श्रावण हेमंत ने बघितला.
समाप्त..साहित्य चोरी हा गुन्हा आहे.माझ्या नावा सहीत इतरत्र कथा प्रसिद्ध करू शकता.

