STORYMIRROR

Venu Kurjekar

Abstract Others

3  

Venu Kurjekar

Abstract Others

तिलाच ठाऊक

तिलाच ठाऊक

1 min
183

तीन दिवसांच्या सुट्टी नंतर मंदाबाई तणतणत च आत आली. जोरात नळ सुरू कर , बादली जोरात आपट , भांड्यांच टोपलं खरकन ओढ

यातून आपला राग व्यक्त करत तीचं काम सुरू

होतं.


हे तणतण नं दर आठ पंधरा दिवसांत ठरलेलं. डोळे सुजलेले , हाताला कुठे खरचटलेलं

कधी थोडी दुखापत हे नित्याचेच .


मंदाबाई घर बदलणार होतीस ना गं 

बदललंस का? तिला चहा देत विचारलं.


नाही ना ओ ताई, धडाच कुठं मिळल तर ना

अन परवडलं ही पाहिजे .


अगं मागच्या मळ्यातल्या चाळीत ती पाटील

बाई कडे येते ती छाया अन ती दुसरी लता

अन तुझ्या त्या मैत्रीणी संगीता न सविता

तिथेच राहतात ना गं . तिथे विचारून बघ

ना.


नाही ओ ताई, तिथं तर अजिबातच नाही.

ती अगदी तत्परतेने उसळुनच म्हणाली.


का गं?


नाही ओ ताई त्या तिथं कुणालाच नवरा

 नाही . छायाचा नवरा आठ दहा महिन्यांपासून

गायब आहे. कुठं पळून गेला माहीत नाही.

बाकीच्यांचे तर वरच गेले आहेत.


मंदाबाई नेहमी म्हणत असते . बाई या 

बायकांना नवरा नाही ना सुखी आहेत त्या.

मारझोड नाही, शिविगाळ नाही.

आपलं कमवायचं, खायचं आपली पोरं

सांभाळायची. आप आपलं राहायचं मस्त .


माझ्या दारूड्या नवऱ्याला मलाच सांभाळावं

लागतं . वरून त्याचा मारही खा.

कामाचा अन धामाचा. धड कामावर जायचं

नाही न कमवायच नाही. ना घराची काळजी

ना पोरांची. दारू पिऊन पडून राहतो .

मरे ना का तिकडं एकदाचा. सुटीन तरी

या कटकटीतून


अन आता मंदाबाई म्हणते त्या बायकांना

नवरा नाही . त्यांच्या चाळीत नाही जायचं राहायला 


ती असं का म्हणते तिलाच ठाऊक


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract