विनोबांजीचे नियोजन
विनोबांजीचे नियोजन
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात, आंदोलनात विनोबांनी भाग घेतला होता.इंग्रजांनी त्यांना अटक केली; व अंधार कोठडीची शिक्षा दिली.
त्या अगदी छोट्या खोलीत फक्त एक वेळ पहारेकरी जेवण घेऊन येई.
सोबतीला कुणी नाही.खोलीत प्रकाश ही नाही.
ते खचतील, त्यांची प्रकृती खालावेल , ते नीराश होऊन माफी मागतील.अशी इंग्रज सरकारची अपेक्षा होती.
पण दिवस, आठवडे जसे जसे जायला लागले
तसे विनोबा अजून तजेलदार व सशक्त
दिसू लागले.
तो जेलर ही अचंबित झाला.
विनोबांनी चोवीस तासांच नियोजन केले.
रोज ते जितके मैल चालत होते; त्या खोलीची
लांबी मोजून साधारण रोजचं अतंर चालायला
कीती पावलं चालावं लागेल? हे अतंर काढून
तेवढे तास ते त्या खोलीत चालत.
या शिवाय ध्यान धारणेचा वेळ त्यांनी वाढवला.
जो पहारेकरी त्यांना जेवण घेऊन यायचा त्याच्या आयुष्यात काही दुःख आहे का याची
विचारपूस करून त्याला मार्गदर्शन करीत.
धीर देत. मग इतर ही पहारेकरी आपापली
गाऱ्हाणी घेऊन विनोबांकडे येऊ लागली.
त्यांचा संध्याकाळ चा वेळ पहारेकऱ्यांच्या
समस्या निवारणासाठी जाऊ लागला.
जे काही कच्चे भरडे अन्न मिळायचं ते ही
विनोबा समाधानाने चावून खायचे.
व्यायाम तर होताच . झोप ही शांत लागायची.
जेलर हे बघून थक्क झाला.
सांयकाळची लोकांची म्हणजे पहारेकऱ्यांची
गर्दी बघून त्याला नवल वाटले.
एक दिवस तो स्वतः विनोबांशी बोलायला
गेला . विनोबांच्या बोलण्याने तोही भारावला व
प्रभावित झाला.
रोज सभा घेण्यासाठी जेलमध्ये स्वतंत्र जागा
त्यांना देऊ केली. त्यांच्या साठी पुस्तके मागवली.
कैद्यांसाठी विनोबांची गीता प्रवचने वर्ग सुरु झालीत.
वाचन, ध्यान धारणा , गीतेचा अभ्यास या सर्व गोष्टींची गोडी त्यांनी जेल मधील कैद्यांना लावली.
प्रतिकुल परीस्थितीतही धैर्याने , बुध्दी कौशल्याने मार्ग काढणारे विनोबाजींना
शतशः प्रणाम.
