STORYMIRROR

Venu Kurjekar

Abstract Inspirational Others

3  

Venu Kurjekar

Abstract Inspirational Others

माझा valentine day

माझा valentine day

3 mins
8

गोड चेहऱ्याची, प्रसन्न हसनारी रूमा परवा दुपारी म्हणजे valantine day च्या दिवशी माझ्या कडे आली. मोठ्ठं टपोरं गुलाबी गुलाबाचं फूल व तिने बनवलेली शेंगदाणा चिक्की माझ्या साठी तिने आणली होती.

आल्या आल्या "valantine day" ताई; म्हणत फूल व चिक्की मला दिली.

मीही तिला same too you म्हणाले व दोघीही खळखळून हसलो. Day वर उलट सुलट गप्पा मारल्या.आमच्या सोयीनुसार चांगले वाईट असं दोन्ही बाजूंनी बोललो.

चहा घेतला व valantine day साजरा केला.

एखाद्या लहान मुलाला चाॅकलेट दिल्यावर कसा आनंद होतो, तसा मला रुमा ने फूल दिल्यावर झाला . माझ्या मरगळलेल्या मनाला थोडी उभारी आली. तिच्या प्रसन्न हसन्याने घर भरून गेलं.

रूमा माझी शेजारची मैत्रिण. आम्ही समवयस्क नाही, पण मैत्रीला वय नसतं हे खरं .

सकाळी अंगणात वावरताना मी तिला दिसले नाही, म्हणून मला बरं आहे की नाही या काळजीपोटी ती मला भेटायला आली होती.


काळजी घेणारी,धीर देणारी, मन जपणारी, सुखदुःखात सहभागी होणारी, आपल्या वर प्रेम करणारी, आपलं मन जीच्या जवळ मोकळं करु शकू अशी व्यक्तीच आपली जवळची मैत्रीण असते.तशी रूमा मला आहे.

तीचं माझं नातं प्रेमाचं आहे, अगदी तीच्या गुलाबी गुलाबा सारखं.

आज तर गुलाबी गुलाब घेऊन जणू valentine day साजरा करायलाच आली होती.


तिचे ते टपोरे गुलाबी फुल मी एका फुलदाणीत लावून ठेवले.घर अगदी प्रसन्न वाटत होते.

संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यावर ह्यांना ते दिसले.

"कीती सुंदर फुल आहे गं हे, कुठून आणलसं? ह्यांनी विचारलं .

" अहो मला valentine day च मिळालेलं फुल आहे ते.मी आनंदून म्हणाले.

तुमच्या आधी माझ्या मैत्रिणीने मला फुल दिलंय, आहे ना मस्त? मी हसत म्हणाले.

अरे वाह! छानच गं, मस्तंच.आजचा डे साजरा केला वाटतं मैत्रीणी सोबत.हे म्हणाले...

काय गं हल्ली भारीच खूळ झालंय या डेज चं नाही? बाजार पेठेत, फुलांच्या दुकानात, गिफ्ट च्या दुकानात केवढी गर्दी, एखादा सण असल्या सारखी..... हे बाजारातली गर्दी आठवून बोलत होते.


अहो आपले सण उत्सव असतात ना त्यात ह्या डेज ची भर .त्यात बिघडलं कुठे हो.तसही नव्या गोष्टी बाबत नेहमीच आपण तळ्यात मळ्यात असतो, पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक व्हायला नको हे ही खरं.जणू मी माझे पुरोगामी विचारच सांगितले व त्यांना रूमाने आणलेली चिक्की दिली.दुपारची सारी गंमत सागींतली.कीती हसलो,कीती गप्पा मारल्या हे सांगीतले.


तुम्हा बायकांना भेटायला व गप्पा मारायला काहीतरी निमित्त च लागतं.... हे म्हणाले.


होय तर, आम्हा मैत्रिणींचं असंच असतं.

अहो; आज सकाळी मला अगदीच बरं वाटतं नव्हतं,पण रूमा आली अन् मला कीत्ती बरं वाटलं म्हणून सांगू.माझ्या मलूल मनाला प्रेमाचं सिंचन करून गेली.खूप हसवून गेली.घरात आनंदाची पखरण करुन गेली.खऱ्या अर्थाने माझा valentine day अन् friendship day एकाच वेळी साजरा झाला. मी भावूक होऊन म्हणाले.


अरे वा ! भारीच आहे बुवा तुम्हा मैत्रीणींच.

बरं वाटतं ना तुला आता.

बरं वाटण्यासाठी मैत्रीण अन् मैत्रीणीशी गप्पा रामबाण उपाय ठरला तुझ्या साठी.खरं ना? तुझ्या valentine मैत्रीणीला धन्यवाद द्यायला हवेत होय ना .

चल मीसुद्धा देतो तुला आपल्या बागेतलं छानसं लाल गुलाबाच फुल. हे माझी फीरकी घेत म्हणाले, अन् मलाही हसू आले.


आपल्याला अशी रुमा सारखी जीवाभावाची मैत्रीण असावीच.

मैत्री किंवा प्रेम व्यक्त करायला विशेष दिवसाची गरज असते असे नाही.

मैत्रीचं नातं चिरतरुण असते.वय किती ही होवो शेवटच्या श्वासापर्यंत खोडकर पणा जीवंत ठेवणारं नातं एकच असतं ते मैत्रीचं.

मीत्र नावाची देणगी जीवापाड जपावी.

जीवनातील अर्धा गोडवा हा मीत्र मैत्रीणी मुळे असतो आणि तेच आपले valentine असतात.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract