ती पावसाळी रात्र (भाग 1)
ती पावसाळी रात्र (भाग 1)
आज ही थोडा थोडा पाऊस पडतच होता .वातावरण कुंद आणि गार झाले होते. सानवी ने गरमागरम कॉफी बनवून घेतली आणि टिव्ही समोर येवून बसली.एकेकाळी हा पाऊस तिला अतिशय प्रिय होता पण आज तो एक दुःखद आठवण बनुन तिच्या समोर येत असायचा.
मोबाईल वाजला तसे सानवी ने पाहिले आदित्य कॉल करत होता.तिची इच्छा नव्हती कॉल घेण्याची पण मग आदित्य पुन पुन्हा कॉल करत राहिला असता.म्हणून तिने कॉल घेतला.
हॅलो मॅडम आज चा संडे पण एकटी नेच घरात बसून घालवायचा विचार आहे काय? बघ ना जरा बाहेर किती मस्त पाऊस पडतो आहे.
आदित्य माझी इच्छा नाही कुठे बाहेर जायची.अगदी कोरडे पणाने तिने उत्तर दिले.
सानवी ,मला माहित आहे की तुला पाऊस खूप आवडतो.तू कविता ही करत असायचीस ना अगोदर?
तुला कसे माहित आदित्य?
हम्म माय फ्रेंड फेसबुक त्याच्या कडून समजले मॅडम आणि किती छान लिहितेस तू.
आता मी काही ही लिहित नाही.आणि मला पाऊस ही आवडत नाही .
ओके मी घरी येतो ,असे ही तू एकटी बोअर झाली असशील ना? पुढे तीच काहीच न ऐकता आदित्य ने कॉल कट केला.
सानवी ला माहित होते की आदित्य काही तीच ऐकणार नाही,तो त्याच्या मनाच करणार.ती जॉब ला लागली तेव्हा पासून आदित्य तिचा बेस्ट फ्रेंड बनला तिची हर प्रकारे तो काळजी घ्यायचा,ती पुण्यात एकटी राहते म्हणून तिला गरज असेल तेव्हा हजर असायचा.तिची छोटी मोठी कामे ही करत असायचा.या सगळ्यात त्याच सानवी वर असणार नितांत प्रेम दिसून यायचे पण सगळ समजत असून ही सानवी त्या कडे दुर्लक्ष करत असे.
सानवी च
्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या की तेव्हा पाऊस तिने स्वतः ला एका कोषात बंदिस्त करून ठेवले होते.
जगण्यातला आनंदच घ्यायचा ती विसरून गेली होती.दर रविवारी आदित्य तिला बाहेर येण्यासाठी आग्रह करायचा पण ती येतच नसायची.आदित्य खरच खूप चांगला मुलगा होता.त्याला नाव ठेवण्यात काहीच जागा नव्हती.
थोड्या वेळात आदित्य सानवी कडे आला.
अरे बाहेर गेलो असतो ना आपण लाँग ड्राईव्ह वर सानवी?
नको रे आदित्य मी घरीच ठीक आहे.
ओके.मला पण कॉफी हवी ,मी घेतो बनवून मग आपण मस्त गप्प मारत बसू.
आदित्य तिच्या कडे नेहमी येत असायचा सो घरच्या सारखा त्याचा वावर होता.त्याने कॉफी बनवून घेतली आणि सानवी कडे आला.
सानवी,आज मला तुझ्या बद्दल सगळ काही ऐकायचे आहे.मी फेसबुक वर पाहिले,तुझे अगोदरचे हसरे, आनंदी फोटो .तुला पाऊस किती आवडत होता.तू त्याच्यावर कविता ही करत होतीस.मग अचानक अस काय झालं की तू जगणच सोडून दिलेस? मी तुझा बेस्ट फ्रेंड आहे सो मला हे सगळ जाणून घेण्याचा अधिकार पण आहे.मी तुला अस उदास,नाराज नाही बघू शकत आणि त्याच कारण ही तुला माहित आहे.
आदित्य मला नाही काही बोलायचे प्लीज मला फोर्स नको करू.
आज मी सगळ काही ऐकूनच इथून जाणार आहे सानवी.कारण मला तुझी काळजी वाटते.
त्याला तिच्या बद्दल वाटणारी काळजी ,त्याच प्रेम बघून सानवी चे डोळे भरून आले.
सानवी,बोलून तर बघ ग,मन हलक होईल.इतके दिवस मनात साचून राहिलेला पाऊस तुझ्या ही नकळत बाहेर येईल.प्लीज बोल.
क्रमशः..