Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Nilesh Jadhav

Drama


3  

Nilesh Jadhav

Drama


ती, मी आणि आमची स्टोरी (भाग 3)

ती, मी आणि आमची स्टोरी (भाग 3)

3 mins 39 3 mins 39

आयुष्यात एकतरी व्यक्ती अशी असते की ती खुप जवळची होऊन जाते. अगदी मनाच्या तळघरात उतरून आपलीच बनते आणि खरं तर हे तिला माहीतही नसते. अशीच माझ्या जवळची एक व्यक्ती अगदी मनावर राज्य करून गेलेली. ती माझ्या किती जवळ येऊन गेली कदाचित तिला माहीतही नसेल....

     मी मामाच्या गावाला राहुन पुण्यात सिंहगड रोडवर एका छोट्या कंपनीत जॉब करत होतो. संध्याकाळी 05.00 वाजता सुट्टी करून घरी जातेवेळी मामाच्या गावी जाणारी दूधगाडी तिथेच फाट्यावर ऊभी असायची. गाव थोडं आडमार्गी म्हणजे सिंहगडच्या मागच्या बाजूला होते. स्वारगेटहुन एकमेव जाणारी सरकारी एस. टी. असायची ती सुद्धा लवकर निघून जायची. मग संध्याकाळी गाडी मिळणं अवघडच. दूधगाडी किमान अर्धा तास तरी तिथे ऊभी असायची. त्यावेळी मोटारसायकल खुप कमी मुलांकडे असायच्या मग कामावरून सुटून घरी जाणारी मुले आणि गवळ्यांच्या जनावरांचे खाद्य हे सगळं जमा होता होता अर्धा तास तरी लागायचा. मी ही असायचोच तिथे. दिवसभर काम करून घरी जाणाऱ्या लोकांची लगबग, भाजीवाल्या पाशी बायकांनी केलेली गर्दी, त्यांची उडालेली धांदल, गाड्यांची गर्दी आणि अशातच सुटलेली शाळा.. ही सगळी गम्मत पहातच तिथे ऊभा असायचो. खरंतर गाडीतही बसू शकलो असतो पण तिथे शालेय मुली पण उभ्या असायच्या म्हणुन मग लाज वाटायची. वयच तसं होतं जेमतेम २० वय असलेला मी लाज वाटणारच ना...

     बस किंवा रिक्षाची वाट पहात उभ्या असणाऱ्या त्या मुलींच्या घोळक्यात एक मुलगी होती. उंच, मध्यम बांध्याची, बोलकी नजर, गव्हाळी रंग, काळे लांबसड़क केस. त्या सगळ्या मुलींमधे तीच तेवढी लक्षवेधक होती. खुप सुंदर होती. इतरांचं माहीत नाही पण माझ्या नजरेत तिचं सौंदर्य अवर्णनीय होतं. पहिली नजर, पहिला प्यार असं काही नव्हतं तरीही ती मला आवडायची. खरं तर माझ्या आयुष्यात ओलमोस्ट एक मुलगी होती. म्हणून मग त्या मुलीकडे लक्ष देणे योग्य की अयोग्य या विचारात गढलेलो असायचो. पण हो तिच्या जागी हीच असती तर.... असं बऱ्याचदा वाटून गेलं हे नक्की. कारण ती होतीच तशी लक्षवेधी तिचं हसणं बोलणं सगळंच खुप वेगळं होतं.

      रोज त्यावेळी तिथे माझं असणं आणि तिचंही तिथे थांबून माझ्याकडे पाहणं आता मी हेरलं होतं. तिला माझ्याबद्दल काहीतरी वाटत असावं तिची नजर तेच सांगत होती (नजर वाचायला मी तरी चुकणार नाही) पण माझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे हे मी विसरू शकत नव्हतो. जिची स्वप्न सजवली आहेत तिला सोडून इकडे असं काही करावं हे माझ्या तत्वात बसत नव्हतं...

   आताशा त्या ग्रुप मधे माझ्याबद्दल चर्चा सुरू झाली होती. तिचं चोरून पहाणं वाढलं होतं. सुरवातीला लवकर निघून जाणारी ती आता मात्र मी पहिल्यांदा जाण्याची वाट पाहु लागली आणि कधी मैत्रिणीनं मुळे लवकर गेलीच तर नजरेने इशारा करत जाऊ लागली. तिची ती बोलकी नजर खूप काही सांगून जात होती. एवढं सगळं असतानाही मुली स्वतः न बोलता मुलांकडून बोलून घेतात या अतिसोयक्ती प्रमाणे ती माझ्या बोलण्याची वाट पहात असावी कदाचित, पण माझ्या मनाची मात्र तिच्याशी काहीच बोलण्याची तयारी नव्हती. मी तिला टाळत होतो असच समजा. त्यांच्या आपआपसातल्या बोलण्यावरुण तिचं नाव आणि ती १० वित शिकत आहे हे कळलं होतं. या उलट माझ्याबद्दल तिला काहीच कळाल नसेल.

    या 2-3 महिन्यात रोज मी तिथे येणे, गाड्यांचा गोंधळ, लोकांची घाई, शाळेतल्या मुलामुलींची लगबग, तिचं तिथे असणं, माझ्याकडे पहाणं अगदी दरदिवस तेच जसाच्या तसं काहीच बदल नाही झाला. अशातच काही कारणास्तव माझा जॉब सुटला. त्या नंतर तिथे थांबण्याचा कधी योग नाही आला. पुढे त्या मुलीचं काय झालं. मी असा अचानक गायब झाल्यावर तिला काय वाटलं असेल हे माहीत नाही.      

     कधीतरी त्या रस्त्यावरून जाताना त्या शाळेच्या भिंतीकडे पहिल्यावर ती आठवून जाते. गालातल्या गालात हसू येतं आणि नकळत डोळ्यातून ओघळणारा थेंब त्या जुन्या दिवसांची आठवण देऊन मनावर असंख्य वार करून जातो. मग वाटतं आठवणी या अशाच असतात का...? काळीज चिरणाऱ्या.

एवढ्या वर्षानंतर एक विचार मनात येतो तिला मी आठवत असेल का...? पण तिला तर माझं नावही माहीत नव्हतं मग.......


Rate this content
Log in

More marathi story from Nilesh Jadhav

Similar marathi story from Drama