Milind Joshi

Comedy

3  

Milind Joshi

Comedy

ती आणि मी

ती आणि मी

3 mins
274


मध्यंतरी फेसबुकवर मला तिचे प्रोफाईल दिसले. मी तत्काळ मित्र विनंती टाकली. काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ती स्वीकारली गेली आणि काल ती माझ्या मित्रयादीत सामील झाली.


आज मेसेंजरला तिचा मेसेज दिसला आणि काही आठवणी ताज्या झाल्या. असो. त्या गोष्टी आता भूतकालीन झाल्यामुळे इथे फक्त आमचे संभाषण देतो आहे. एक छोटीसी लव्ह स्टोरी. ज्यांना यात रस असेल त्यांनी वाचा. तिचे नाव? काय फरक पडतो काहीही असले तरी?

ती : हाय. 

मी : रामराम. 

ती : ओम साई राम.

मी : कशी आहेस?

ती : मजेत. 

मी : छानच. 

ती : तुझे प्रोफाईल बघितले. तू अजूनही खूप तरुण दिसतोस.

मी : मीही तुझे प्रोफाईल बघितले. तू अजूनही खूप छान दिसतेस.

ती : तू खरंच लग्न केलं नाहीस?

मी : नाही 

ती : का?

मी : किसी नजर को तेरा, इंतजार आज भी है |

ती : अरे आता असे गाणे म्हणायचे वय माझ्या मुलांचे आहे.

मी : हेहेहे... मी लग्न केले नसल्याने तो अधिकार मी अजूनही बाळगून आहे.

ती : हाहाहा... पण बरे झाले मी तुझ्याशी लग्न नाही केले.

मी : होय... आता मित्रांची गत बघून मलाही तसेच वाटू लागले आहे.

ती : काय रे तू? जराही बदलला नाहीस.

मी : समोरची व्यक्ती बदलली तर आपल्याला बदलण्याची गरजच पडत नाही.

ती : म्हणजे?

मी : जाऊ दे गं वाक्यांचे अर्थ काढणं, मी असंच लिहिलं, म्हटलं बघू आपल्याला असंबद्ध लिहिता येतं का?

ती : नाही, आता सांगच.

मी : चिडणार नसशील तर सांगतो.

ती : नाही चिडणार. माझं चिडून झालंय आधीच.

मी : बघ... आधी तू माझ्यापेक्षा ५ वर्षांनी लहान वाटत होतीस, आता १५ वर्षांनी मोठी वाटतेस. मी मात्र तसाच... हेहेहे...

ती : आता तू मार खाशील माझा.

मी : नको, ते काम करण्यासाठी तुझ्या घरच्यांनी आधीच एकाची निवड केली आहे.

ती : तू कधीच सिरिअस होत नाहीस का?

मी : दोन वेळेस झालो होतो.

ती : कधी?

मी : ज्यावेळी मी आजारी होतो. वाटलं होतं जातो की काय? पण देव म्हणाला... थांब अजून... 

ती : एक विचारू?

मी : विचार की 

ती : अजूनही तू मला विसरू शकला नाहीस ना?

मी : विसरलो असतो तर तुला मित्र विनंती का पाठवली असती?

ती : पण विसर आता आणि लग्न करून घे.

मी : एक बाई, मी मिलिंद जोशी आहे, मिलिंद सोमण नाही... मनात आणलं आणि लग्न केलं.

ती : तुला साधे बोलताच येत नाही का?

मी : साधे बोलता आले असते तर मी असा राहिलो असतो का?

ती : दोन वर्षांपूर्वी श्रीरामपूरला गेले होते. 

मी : अरे वा !

ती : सगळेच बदलले आहे.

मी : सगळे म्हणजे?

ती : तेथील लोक, परिसर आणि खरा म्हणजे काळ

मी : होय

ती : परवा माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता.

मी : कोण मैत्रीण?

ती : जी त्यावेळी कायम माझ्यासोबत असायची ती.

मी : अरे वा. काय म्हणत होती?

ती : तुझ्याबद्दल विचारत होती.

मी : आधीच सांगतो, माझे तिच्यासोबत काहीही नव्हते.

ती : माहितीये रे मला 

मी : नाही, मी आपलं क्लिअर केलं 

ती : आजकाल खरंच वाईट दिवस आलेत.

मी : कुणाला?

ती : मी जनरल बोलतेय रे

मी : ओके ओके 

ती : तुझ्याबद्दल सांग, काय करतोस सध्या?

मी : तुझ्यासारखे पात्र उभे करतो, मग त्याच्याशी गप्पा मारतो. मग त्या पोस्टरूपाने सोशल मीडियावर टाकतो. आणि लोकांचा वेळ खातो.

ती : ओह... आणि लोक वाचतात?

मी : होय तर, अनेक जण वाचतात.

ती : कोण आहेत असे?

मी : जे आत्ता वाचत आहेत ते... हेहेहे... 


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy