komal dagade.

Romance Tragedy Thriller

4.4  

komal dagade.

Romance Tragedy Thriller

तिच्या प्रेमाचा एक प्रवास

तिच्या प्रेमाचा एक प्रवास

8 mins
322


       अनु बारावीत शिक्षण घेत होती. कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक मिळवणारी त्याबरोबर दिसायला सुंदर, उंच गोरीपान अनु एका मुलाच्या प्रेमात पडली. तो मुलगा तिच्याच क्लासमध्ये शिकत होता. कॉलेज सुटलं की दोघे फिरायला, कधी कधी मूवी पाहण्यासाठी असे त्यांचे दिनक्रम सुरु होतें. अनु आणि समीरचं एकमेकांवर खूप प्रेम होत. वाढलेले फोन, मेसेज यामुळे अनुचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ लागलं होत. समीर गरीब घरातील शेतकऱ्याचा मुलगा होता. कॉलेजमध्ये तोही टॉपर होता. समीरने एकदा कॉल करून अनुला बोलावले.तिथून दोघेही मूवीला जाणार होतें. अनु चे वडील कडक शिस्तीचे होतें. त्यात पेशाने शिक्षक असल्याने स्वभाव त्यांचा अगदी कडक होता. अनु त्यांना घाबरूनच राहत.

अनुच्या वडिलांना म्हणजे नारायणरावांना मुलीची चिन्हे वेगळी दिसू लागली होती. आज अनु बाहेर पडताना त्यांनी तिचा पाठलाग करायचा ठरवला. अनु त्यांच्या नेहमीच्या जागी पोहचली, समीर आधीच येऊन थांबला होता. नारायणरावांनी आज मुलीला एका मुलासोबत पाहिलं होत. त्यांचा अंदाज खरा ठरला होता.आता पुढे दोघे कोठे जातायेत हे ही त्यांना पाहायचं असल्याने त्यांनी दोघांचा पाठलाग केला.अनु समिरच्या गाडीवर बसली गाडीच्या मागे अनुचे वडील आहेत याकडे दोघांचे लक्ष नव्हते. दोघेही प्रेमाच्या धुंदीत होतें.अनु समीरला बिलगून बसली होती. इकडं नारायणरावांचा चेहरा रागानं लालबुंद झाला होता. समीरची गाडी एका थेटरच्या समोर येऊन थांबली. नारायणराव रागातच दोघांच्या समोर उभे होतें. अनु तर घाबरून गेली होती. समीरची तिच अवस्था होती.

नारायणरावांनी अनुच्या गालावर जोरात चपराक दिली. अनुला तर रडूच कोसळं. समीरकडे बघत कडाडलेच, "हे उद्योग करता का कॉलेजला येऊन तुझ्या वडिलांना फोन कर आधी मी बोलतो त्यांच्याशी. समीर,म म माझं प्रेम आहे अनुवर," अजून जोरात त्याच्याही गालात पडते," प्रेम करताहेत! कमवायची अक्कल आहे का? लायकी का माझ्या मुलीवर प्रेम करण्याची. स्वतःची लायकी बघ आधी. घरी दोन वेळच जेवण नाही.हीच आहे ना तुझी परिस्थिती! समजतोस काय स्वतःला? तुझी सगळी हिस्टरी माहित आहे मला पुन्हा जर दिसलास ना माझ्या मुलीच्या आसपास तर बघच? समीर खूप रडला. त्यांनी काढलेली लायकी पाहून त्यालाही प्रचंड राग आला होता. तो तिथून निघून गेला.ते पुन्हा न मागे बघण्यासाठी!

अनुच्या वडिलांनी तिला खेचतच चालवले. तिचा हात लालबुंद झाला होता.

अनु, "बाबा सोडा खूप हात दुखतोय, चुकलं माझं असं ओरडत होती. पण त्याचा काहीही तिच्या बाबांवर उपयोग होत नव्हता. अनुचे कॉलेज तिच्या बाबांनी बदलले. अनुचे लक्ष अभ्यासात नव्हतेच. तिचा फोन काढून टाकण्यात आला. अनुसाठी समीरला विसरन अशक्य होत. त्याच्या आठवणीने रडून तिने डोळे सुजूवून घेतले होतें. बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ती अनुतींर्ण झाली. त्यादिवशी तिच्या बाबांनी तिला प्रचंड मार दिला. आई मधे पडून तिला वाचावायला आली. पोरीला समजावून सांगा हे डोक्यातून प्रेमाचं खूळ काढून टाक." नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही. असं रागातच म्हणत अनुचे वडील बाहेर निघून गेले. अनुकडे समीरला विसरण्याशिवाय पर्यायच उरला नव्हता. बाबांचं बारीक लक्ष तिच्याकडे असत. कॉलेजला येता जाताना तिच्याबरोबरच थांबत. सगळे रस्ते बंद झाल्याचे तिला दिसत होतें. समीर ही कधीही नजर पडत नव्हता. कदाचित त्याने दोघांचा विषय सोडला असं तिला वाटू लागलं. सहा सात महिने होत आले होते.दोघांचाही एकमेकांशी कॉन्टॅक्ट नव्हता. गॅलरीत चहा घेत ती समीरचाच विचार करत बसली होती. अती नकारात्मक विचारांनी, शारीरिक व्याधीनी ती घेरली गेली होती.

अचानक तिचं लक्ष तिने आणलेल्या गेल्या वर्षी झाडांच्या कुंड्यान कडे गेलं. छोटीशी आणलेली रोपे फुलांनी बहरून गेलेली .तिच्या लक्षातही आलं नव्हतं. त्या जणू सांगत होत्या अनु यातून बाहेर पड आणि पुन्हा नव्याने सुरुवात कर. पण ती कशी विसरणार होती. तिने टाइमपास म्हणून प्रेम केलं नव्हतं. या प्रेमाचा तिला शेवट नसल्याचं लक्षात आलं. त्यात वडिलांनी यावर्षी पास नाही झालीस तर लग्न लावून देईन तुझं, असं धमकावून सांगितलं होत. तिने लक्ष अभ्यासाकडे देण्याचं ठरवलं. आयुष्य पुन्हा नाही येत असं रडत नाही घालवायचं. या फुलाप्रमाणे बहरून टाकायचं ठरवलं. काहीतरी निश्चय करतच ती फुलांकडे पाहत उठली. गॅलरीतून उठून ती तिच्या रूममध्ये आली. चांगले मार्क्स मिळवून तिने बारावी बोर्डामध्ये येण्याचे ठरवले. रोज अभ्यास करण्यासाठी ती गॅलरीत बसत.लावलेल्या कुंड्यांकडे पाहत अभ्यास करायला तिला खूप प्रसन्न वाटत.कुंड्यानकडे पाहताना तिला सकारात्मक एनर्जी येत.

तिने 92%गुण मिळवायचा ध्यास घेतला. तिने तिच्या बेडरूमध्ये, गॅलरीत सगळीकडे 92%ची चिटोऱ्या चिटकवल्या होत्या. जाता येता उठता बसता ती त्या चिट्याना न्याहळत. 92%घोकत असे. अभ्यासातही तिने कमी केली नव्हती. रोज सकाळी चार वाजता तिचा अभ्यास सुरु होता. काही महिन्यातच परीक्षा आली. सगळे पेपर छान लिहिले. आता निकालाची वाट पाहत होती. तिने घेतलेला ध्यास 92%मिळवणारच ते न चुकता म्हणत असे. निकालाचा दिवस उगवला.यावेळी ही बाबाच तिच्या बरोबर होतें. घरातील देवाच्या, आईबाबांचे आशीर्वाद घेऊन ती कॉलेजला गेली. तिच्या बाबांनीच तिचा निकाल पाहिला तर 92%च तिच्या निकालावर होतें. बाबांनी तिला जास्त काही आनंद दाखवला नाही. तिचा हा आनंद गगनात मावेनासा झाला. ती खूप खुश होती. तिच्या लक्षात आले होतें,सकारात्मक विचार आयुष्यात खूप मोठे बदल घडवून आणू शकतो.समीरची तिला आजही या दिवशी खूप आठवण येत होती. तोच जीवनसाथी म्हणून आयुष्यात येणार असेही तिने मनोमन ठरवले होतें.

सायन्समधून ग्रॅज्युशन पूर्ण करून पुढे तिने BHMS ला ऍडमिशन घेतलं. तशी तिच्या बाबांची इच्छा होती.रोज तिचं कॉलेज प्रॅक्टिकल सुरु झाले . तिला समीरचीही आठवन येत होती. त्याच्या आठवणीने तिचा जीव व्याकुळ होत.एक ना एक दिवस तो आयुष्यात नक्की येईल अशी मनाची समजूत काढत होती.बघता बघता तिचं शिक्षण पूर्ण झालं. तिच्या बाबांनी तिला स्वतःचं क्लिनिक टाकून दिलं. आता तिच्या बाबानी लग्नासाठी स्थळ बघायला सुरुवात केली होती. एक नात्यातलं स्थळ तिच्या बाबांना सुयोग्य वाटलं. अमर नावाच्या मुलाशी त्यांनी अनुचं लग्न लावून दिलं.

अनुचा संसार सुरु झाला पण तिचं मन मात्र अजून समीर मध्येच गुंतल होत. अमर आणि अनु शहरात फ्लॅट मध्ये राहत होतें. अमर खूप चिडचिड्या स्वभावाचा होता. त्याच्या मनासारखं झालं नाही की तो वस्तू आदळत. छोट्या छोट्या कारणावरून त्याच्यातील हैवान जागा होत असे. हे तिला नवीनच होत.तिने स्वतःच्या पैशाने खरेदी केलेलीही त्याला आवडत नव्हती. तिने नेहमी साडीमध्ये राहायला हवं. कपाळावर भली मोठी टिकली लावली पाहिजे.दोन्ही वेळी गरम गरम जेवण करायचं. रोजच्या जेवणात दोन भाज्या काकडी, टोमॅटो, चटण्या, लोणचं असायला हवंच. एखाद्या वेळी नसेल तर त्याची पुन्हा चिडचिड सुरु होयची. घरात कामवाली नको तिने सगळं करून जायचं. त्याला कमवती बायकोही पाहिजे होती आणि घरातही राबणारी अशा हेकेखोर, सणकी वृतीचा तो होता.

क्लिनिक सांभाळून घर पाहणे तिच्यासाठी खूप कठीण होऊन बसल होत. तिचं आयुष्य यंत्रवत झालं होत. कुठे फसले असं तिला वाटत होत. समीरची आठवण येत होती कोठे असेल तो?असा प्रश्न तिला पडत होता. एक दिवस ती संध्याकाळी क्लिनिकमधून घरी आली. कपाळावरील टिकली तिची पडली होती. अमरने रागानेच तिच्याकडे कटाक्ष टाकला. तिला टिकली लावायला सांगितली. ती कामामध्ये विसरून गेली. जेवायला घेताना तिच्या कपाळावर त्याला टिकली दिसली नाही म्हणून त्याने जोरात गालात लावून दिली. त्याच्या राक्षशी वृतीचा तीला पहिल्यांदाच अनुभव आला.त्या दिवशी ती उपाशी राहिली पण त्याला तिचं काही पडलंच नव्हतं. त्या दिवशी ती रडूनच झोपी गेली. एक शिकलेली असून स्त्री म्हणून अनु त्याच सगळं वागणं सहन करत होती. घरी सांगावं तर बाबांचा विश्वास नव्हता. आईच बाबांच्या पुढे काही चालत नव्हतं. तिच्या बाबांचा अमरवर खूपच विश्वास होता.

दुसऱ्या दिवशी ती आवरून क्लिनिकला चालली.आज मोकळे केस का सोडलेस?कोणाला दाखवायचे आहेत? अमरचे शब्द ऐकताच ती घाबरून गेली.

"ते मी आज धुतले होतें.ओलसर असल्याने बांधले नाहीत. त्याने तिची केस धरून ओढले, स्वतःला काय समजतेस?तू कारण सांगशील आणि मी ऐकून येईन का? मूर्ख वाटलो का मी तुला? त्याने मोठी कात्री घेऊन तिचे केस कापायला सुरुवात केली. त्याच्या हैवानी ताकदीपुढे तिचं काही चालत नव्हतं.ती अडवण्याचा प्रयत्न करत होती. पण त्याच्या शक्तिपुढे तिचा निभाव लागत नव्हता. ती ओरडत होती.त्याने सोप्यावरील उशी घेऊन तिचं तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. ती पाय हलवत होती, त्याला ज़ोरात झटका देऊन ती पळू लागली. जीव वाचवण्यासाठी ती जिवाच्या आकांताने पळत होती तशी पायाला ठेस लागून ती जोरात खाली ढासळली. डोक्याला मार लागून रक्ताने माखली होती. बेशुद्ध अवस्तेत ती तशीच पडून होती. रक्ताच्या धारोळ्यात पडलेली तिला पाहून अमर घाबरून पळून गेला. दार तसंच उघडं ठेऊन.

काही वेळानी तिचे आईवडील तिला भेटायला आले. घराचा दरवाजा उघडा पाहून तसेच आत शिरले. आत कोणीच नव्हतं. आतमध्ये आवाज दिला प्रतिसाद कोणीच देत नव्हतं. आई आतमध्ये गेली तर अनु रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. आईने घाबरून अनुच्या वडिलांना बोलवून घेतलं. तेही तिची अवस्था पाहून घाबरले. तिच्यासाठी ऍम्ब्युलन्स बोलवून घेतली. तिला तातडीने दवाखान्यात ऍडमिट केलं. डोक्याला जखम खोलवर होती. त्यामुळे डॉक्टरांनी ती शुद्धीवर येईल तेव्हा कळेल. असं सांगितलं. आईवडील डोक्याला हात लावून बसले होतें. तिची अवस्था पाहून किती तिने सहन केले समजले होतें. त्यांनाही प्रश्न पडला?का अशा माणसाबरोबर लग्न लावून दिले? जो फक्त हैवान आहे.

दोन दिवसांनी ती शुद्धीवर येत होती. समीर समीर बरळत होती. अजून तिचं प्रेम समीर वर असल्याच तिच्या बाबांच्या लक्षात आलं. त्याला कुठे शोधायचं? असाही त्यांना प्रश्न पडला. अनु उठ मी तुझा बाबा आहे.आईबाबा तिला धुसर दिसत होतें. त्यांना पाहून डोळ्यातून तिच्या अश्रू वाहू लागले. रडू नकोस आम्ही आहोत तू काळजी करू नकोस. तिचे बाबा म्हणाले. आई तिच्या डोक्याला कुरवाळीत होती. आईच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते.

डॉक्टर अनुला चेक करायला आले, तेव्हा तिथं एका रुग्णाचे नातेवाईक धन्यवाद डॉक्टर करत आले. आज तुमच्यामुळे माझी बायको वाचली. तिला कोणत्याही हॉस्पिटलमध्ये घेत नव्हते पण आज तुम्हीच वाचवलं. तो माणूस डॉक्टरांच्या पाया पडत होता. तुम्ही देवमाणूस आहात.

डॉक्टर,"हे काय करताय? मी माझं काम केलं.पुन्हा महिन्याला चेकअपला या हे माझं विझिटिंग कार्ड समीर यादव (MBBS ). अनुने नाव ऐकताच डोळे उघडले. समीर, समीर ती बोलू लागली. तिचे वडील तर उठूनच बसले. हो तो तिचा समीरच होता. त्यानेही तिला ओळखलं. तीला पाहताच त्याच्याही डोळ्यात अश्रू आले.

अनु,काय हे कशाने अशी अवस्था झाली तुझी. अनु, कोठे होतास एवढ्या दिवस किती तुला आठवत होतें. एकदाही वाटलं नाही मला भेटावं. ती रडू लागली.

तिचे आईवडील बाहेर चालेले पाहून थांबा बाबा. मीच तो तुम्ही ज्याची लायकी खूप वर्षांपूर्वी दाखवली होती. पण मी आज जे काही आहे ते तुमच्यामुळेच. मी अजून लग्न केलं नाही. अनु ला मी तसं वचनही दिलं होत झालो तर तिचाच होईल नाहीतर कोणाचाही नाही! जर तुमची संमती असेल तर अजूनही अनुचा हात मागतो. तुम्ही बघितलेला मुलगा वेगळा होता.आता बघिताय तो तुमच्या मुलीला खुश ठेवू शकतो. त्याची लायकीही आहे तुमच्या मुलीचा हात मागण्याची? बास झालं किती दुखऱ्या मनाला बोलशील, नाही बाबा तुम्ही त्यादिवशी आला नसता तर कदाचित आज एवढा यशस्वी नसतो. तुमच्यामुळेच मी पेटून उठलो. आज तरी आमचं प्रेम डावलू नका. मी त्यावेळी ही अनुशी मनापासून प्रेम केलं होत, आणि आजही मनापासून हात मागतोय. प्रेम तेच आहे व्यक्ती बदललाय बाबा. अनुच्या डोळ्यातून अश्रू वाहत होतें. शेवटी तिने पुन्हा एकदा समीरला मिळवण्याचा ध्यास यशस्वी झाला होता. तिचा समीर एवढा मोठा झाला याचा तिला खूप अभिमान वाटतं होता.

तिच्या वडिलांना यावेळेस वाटत होत या मुलावर त्यावेळी विश्वास ठेवला असता तर! आज अनुला एवढा त्रास सहन करण्याची गरज पडली नसती. हळूहळू अनुच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली होती. समीर तिची खूप काळजी घेत होता. अनुने बाबाना समीरला अमर विषयी सगळं सांगितलं. दोघांनी मिळून त्याला पोलिस चौकी दाखवली.

अनु आता खूप खुश झाली होती. तिचं पहिले प्रेम ज्याच्यावर मनापासून प्रेम केलं ते तिला पुन्हा मिळालं होत. जीवनात चढ-उतार येतच असतात पण त्यातून धैर्य आणि संयमाने पुढे जायचं असतं. त्यावेळी त्या परिस्तिथीशी झुंजण्याकरिता जी हवी असते ती सकारात्मकता त्यामुळे नक्कीच योग्य वाट सापडते.


समाप्त



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance