Bhagyashri Chavan Patil

Fantasy Others

3.8  

Bhagyashri Chavan Patil

Fantasy Others

थँक यू कोरोना

थँक यू कोरोना

6 mins
63


थँक यू कोरोना. हो कारण या व्हायरस ने कमी आनंदात जगायला शिकवलं कुटुंब म्हणजे काय याची जाणीव करून दिली जी आई ताई आणि इतर बायका लोकं आपल्याकडे किती लक्ष देत असतात ते ही दाखवून गेलं कारण आपल्या रोजच्या जीवनात इतके व्यस्थ असतो की आपल्याला घरच्यांचा विसर पडतो तीच उणीव या कठीण काळाने डोळ्यावरची पट्टी सहज दाखवून ही दिलं सगळे लोक समान उच नीच असं कोणीच नाही याची सांगड घालून दिली विचार केला तर या व्हायरस ने काही गोष्टी चांगल्या करून दिल्या तर कोणा कोणाची ताटातूट झाली काहीतरी नवीन चांगल होण्यासाठी त्याची किंमत मोजावी लागते असे म्हणतात तर नेमके असच काहितरी घडत की रोजच जगणं सुद्धा कठीण होऊन बसतं आणि हा व्हायरस म्हणजे आपण अजाणतेपणे केलेल्या निसर्गाचा नाश नाहीतर तर मग असा हाहाकार माजतोस कसा हेच बर होईल..


         पण आपल्याला त्याचं काय असा म्हणुन माणूस जगतो आहे पण आपलं काहीतरी चुकत आहे असं कधीचं कोणाच्या लक्षात येत नाही बरं काहीच दिवस झाले या व्हायरस ने आपली जागा सगळीकडेच काबीज केली आहे पसरत आहे सगळीकडे अंधकार पसरला आहे बरं ही बातमी ऐकून हृदयाचा ठोकाच चुकला कारण जस जसं त्याच नाव कळाल तसच काही माणसे मृत्युमुखी पडले असही समजलं सगळी डॉक्टर मंडळी प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहेत की काहीतरी याच्यावर उपाय मिळू देत..


           आपण सगळेच यातून सही सलामत बाहेर येऊ पण खंत एकाच गोष्टीची वाटते की माणसे अजूनही याला हसण्यावारी नेत आहेत कसं कळत नसेल या लोकांना की काहीतरी भयंकर घडत आहे त्यासाठी आपण निदान जागरूक तरी असल पाहिजेत तरीही माणसे ऐकुदेत म्हणून एक दिवसाचा कर्फु जाहीर केला तर काही जागरूक अशी लोकं घरातच बसून राहिली काहींनी सरकार द्वारे आलेल्या नियमाचे कठोर असे पालन केले तर काहींनी सरळ रस्त्यावर येऊन मोर्चा काढला थोड चमत्कारिक आहे पण असु देत तरीही हा व्हायरस काही पसरायच थांबेना म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी सरांनी यावर तोडगा म्हणून आपण घरातच थांबुन या व्हायरस शी दोन हात करूया देशासाठी काहीतरी एकत्र करण्याची संधी मिळाली आहे त्याचा पूर्णतः आपण विचार करून त्याला सहकार्य करूया..


         पण विचार केला तर चांगली गोष्ट घडली आहे कधी ना दिसणारी चिमणी पाखरं आज दारासमोर बागडताना दिसली गोष्टी तरी चिमणी आज दारापाशी आली नवलच आहे ना काय करणार माणूस जस पेरवत आहे तसच ते उगवत आहे कारण या मुळे का होईना पशू पक्षी प्राणी बाहेर तरी आले म्हणाल तर खुप मोठं अस संकट आल आहे किवा निसर्गाने दिलेली शिक्षा आहे म्हणून तर आता तर आपण नीट डोळे विस्फारून बघुया आणि शहाणे होऊया कारण या काळाची गरज बनली आहे आणि प्रत्येकाने वैयक्तिक विचार न करता सगळ्यांचा विचार केला पाहिजे नाहीतर कोणी तरी म्हटलं आहे..


        "सिर सलामत तो पगडी पचास" हे धोरण पाळूयात आपल्या मुळे दुसऱ्या कोणाला त्रास होणार नाही याची आपणच काळजी घेऊयात ज्यांना अजुन ही गोष्ट साधी वाटतं असेल त्यांना समजावून सांगायचे काम आपण करत राहूया देशातील प्रत्येक शहराचे नाव कोरोना यादीत येणार नाही याची दक्षता घेऊया आता थोडे शहाणे होऊन आपल्या देशाला वाचवूया. आणि याबरोबरच देवाच्या रुपात अवतरल्या त्या लोकांना जरूर आठवून एकदा तरी त्यांना नतमस्तक होऊया जेणेकरून त्यांना ही थोडतरी बळ मिळेल संकटाशी सामना करायला आणि मग एकदा का कोरोणा मुक्त आपण झालो की सगळेच कंबर कसून कामाला लागू या गोष्टीत कोणाचेच दुमत नसणार आहे..


         या नंतर अशी सुट्टी मिळेल का? आणि आपल्या घरातच राहायला मिळेल का याचा विचार प्रत्येकाने केला आहे याची दिवसा ढवळ्या स्वप्न रंगवू या म्हणूनच त्यामुळे या सुट्टीचा सदुपायेग करा घरातच राहून स्वतला आणि इतर लोकांनाही तसे पशू पक्षांनीही निरोगी ठेऊया हे आतापर्यंत आपण सगळेच लोक याचे पालन कटाक्षाने करत आहोत म्हणून तर आता सगळ्यात मोठी सुखावणारी गोष्ट म्हणजे आपल्या आई बाबांच्या डोक्यावरचे ओझे आता कमी होणार आहे कारण आता लग्न समारंभ आणि बाकीचे कोणतेही सण असले तरी मोजक्या माणसांसह आवरता येणार आहे..


       प्रत्येक माणूस हा स्वावलंबी झाला आहे प्रत्येकाला आपापल्या कामांची जबाबदारी कळाली आहे फक्त आई किंवा बायको आणि इतर बायका मंडळी यांना तुम्ही घरात बसून काय करता असं कोणीही म्हणणार नाही कारण पुरुष जसा कामाचा ताण, व्याप बाहेर उचलत असतो तसचं घरी स्त्रिया या घरात कोणाला दुखलं खुपल या कडे लक्ष देत असतात आणि याची परतफेड प्रत्येकानी केलं पाहिजे आणि परतफेड ही विचार करून केली जाते तर कधी थोडीशी मदत ही सुखावणारी असते..


      संसार म्हणजे एका मोठ्या रथाचे "दोन चाक" आहेत असं का म्हणतात हे ही आता प्रत्येकाला समजायला लागले आहे याचे वाटणारे समाधान जास्त आहे आणि आता सगळ्यांमध्ये स्वतःला सांभाळता इतरांना ही कसे सांभाळू शकतो याची जाणीव झाली आहे काहीजण तर वर्क फ्रॉम होम म्हणत थोड स्वयंपाक घरात ही वाकून बघत आहेत जिभेचे चोचले पुरवण्यासाठी स्वतःही कष्ट घेत आहेत इतके दिवस बॉस ची मर्जी म्हणजे एक प्रमाण मानलं जायचं आता आई बाबा आजी आजोबा यांच्या मर्जी मध्ये राहील तरी किती आनंदाचं असतं हे समजून आलं आहे कारण हीच तर लोक आहेत जे आपल्याला शेवट पर्यंत समजुन घेत असतात..


      इतर वेळी होणारी चिडचिड पूर्णपणे बंद झाली आहे घरचं अन्न म्हणजेच पूर्णब्रह्म हे समजल्या पासून शरीरात होणाऱ्या बाकीच्या व्याधी ही आपोआप गुडूप झाल्या आहेत आता लहान मुला मुलींन कडून ही आता नवं नवीन शिकायला मिळतं आहे आता मोबाईल फोन पेक्षा घरच्या घरी राहून एकमेकांच्या सहवासात राहून विचारांची देवाण घेवाण होत आहे रामायण महाभारत सारख्या मालिकेने देवाची पूजा प्रार्थना देखील करण्याकडे कल वाढला आहे आधी ओरडून सांगावे लागत होते पण आता मन काही जुन्या गोष्टींकडे विशेष लक्ष जात आहे..


      ह्या महामारी मुळे डोळ्यात पाणी आणणाऱ्या बातम्या रोजच दाखवत आहे तर काही ठिकाणी लोकं हा व्हायरस आणि महापूर अश्या दोन्ही संकटाशी सामना करत आहेत तर काहींना राहायला घर नाही आणि खायला अन्न नाही म्हणून उपासमारीने काही लोकांचे प्राण जात आहेत तर कधी कधी हृदय पिळवटून टाकणारी घटना वारंवार घडत आहेत त्यामुळे लोकांना जगणं सुद्धा कठीण होऊन बसले आहे आणि हे आता कोठेतरी थांबल पाहिजेत असं मनात सारखं वाटतं आहे ओळख जरी नसली तरी त्या लोकांन साठी जीव तुटतो आहे आणि ही सल मनात घेऊन जगणं खूप कठीण आहे..


          तरीही माणूस खंबीर राहून हे ही दिवस जातील या आशे कडे बघतच जगत आहे आणि हे कठीण दिवस ही पुढे ढकलत आहे आपण लोकं तरी काही काळ अजुन ह्या महामारी शी दोन हात करू शकतो पण गरीब लोक यात होरपळून निघत आहेत याचीच चिंता सर्वत्र व्यक्त होत आहे तरीही यामध्ये होईल तेवढी मदत किबहूना त्या पेक्षा ही जास्ती कोरोना वॉरियर्स करत आहेत त्यांच्या कामाचं कौतुक करेल तितकं कमीच आहे देवा कडे तेवढीच प्रार्थना आहे की या वॉरियर्स ना कधीही काहीही कमी पडायला देऊ नको अशी आशा व्यक्त करत आहोत.


        आता प्रत्येकाचे डोळे व्हॅक्सीन कधी येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कारण आता डोईजड होत आहे लवकरात या महामारीवर लवकर संजीवनी येऊदेत असं सगळ्यांना वाटत आहे कारण आता आधीच जीवन हे सोईस्कर होत आणि अशीच राहण्याची सवय ही झाली आहे या वेळी फक्त जरा जास्तच स्वतःची काळजी घेऊ आणि निसर्गाचा वरदहस्त कसा आपल्या पाठी राहील याचीच प्रत्येक जण काळजी घेऊ म्हणूनच धन्यवाद कोरोनाचे नवीन संधी दिल्याबद्दल तुझे आभार पण तू लवकरच आमच्या मधून जावा कारण काही जणांना जसे शहाणपण सुचले आहे तसेच काही जणांचे जगणे कठीण होऊन बसले आहे म्हणून या पुढे आम्ही नेहमीच या गोष्टी काळजी घेऊ प्रत्येक जण होईल तेवढी मदत आपण सगळे करत राहू कारण जेवढ आपण सृष्टी कडून घेतो तेवढच आपण निसर्गाचं देणं ही लागतो अस अजन या व्हायरस ने घालून दिलं आहे म्हणूनच कोरोनाचे अजुन एकदा धन्यवाद!


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy