तेरी भी चूप और मेरी भी चूप
तेरी भी चूप और मेरी भी चूप


अधीर मन झाले, मधुर घन आले
धुक्यातुनी नभातले, सख्या प्रिया
सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे आले...
असं गाणं गुणगुणतच मी मस्त माझ्या स्वयंपाकाच्या तयारीत होते. तोवर माझा नवरा काहीच कारण नसताना "काय तो भसाडा आवाज" अस म्हणत येतो... माझा पारा चढतो "हो असू दे, तुझा काय खूप छान आहे का मग? एकतर हे माझ आवडत गाणं. त्यात मी गाणं म्हणू नाही म्हणू याला काय करायचंय आणि तू अंथरूणाच्या घड्या करून आलायस ना?"
दिवस रविवारचा... सीमा आणि राजेश दोघांनाही सुट्टीच होती. त्यांचं लग्न होऊन तीन वर्षे झाली होती. दोघं जाॅब करत असल्याने बाळाचा विचार अजून केला नव्हता... लग्नाला तीन वर्षे होऊन गेल्याने बर्यापैकी दोघांना एकमेकांचा स्वभाव पुरून ऊरला होता. दोघेही हजरजबाबी आणि स्वत:चंच खरं करण्यात माहीर... राजेशचे आई-वडील गावी होते, शेती पाहायचे... सीमा आणि राजेश जाॅबसाठी मुंबईत राहायचे. त्यांचं गाव मुंबईपासून साधारणत: तीन साडेतीन तासांवर होतं. त्यामुळे सणावाराली किंवा जोडून सुट्टी आली की दोघांची ट्रीप थेट गावाकडे असायची. दोघांनाही आवडायचं गावी जायला. मस्त जम बसलेला दोघांचा... म्हणायला गेलं तर एकदम लक्ष्मी-नारायणाचा जोडा. हा मतभेद असायचे पण दोघांमध्ये एकमेकांना ऐकून घेण्याची क्षमता जास्त होती. त्यामुळे वाद झालेच तरी समेट व्हायला वेळ नाही लागायचा आणि मध्यस्थीचीही गरज नसायची. जसं काय या दोघांना एकमेकांशिवाय अन्य कोणाचीच गरज नाही...
तर आपण कुठं होतो... भसाडा आवाज. राजेश "काय गं सीमा तुला चेष्टा वैगेरे कळती का गं, मी चेष्टेत म्हटलं तसं तुझ्या आवाजाला."
सीमा "हो का? आजकाल लोक चेष्टेत सगळं काही खरं सांगतात. समोरच्याला टोमणाही मारतात आणि चेष्टा होती म्हणून सोडून द्या म्हणून मोकळेही होतात."
राजेश "राईचा पर्वत करणं तुझ्याकडून शिकावं, किती ती बडबड करतेय एवढ्याशा गौष्टीवरून."
सीमा "हो हो करते मी राईचा पर्वत...सत्य हे नेहमीच कटू असतं."
राजेश "काय गं सीमा काय बोलतेयस तू तुझं तुला तरी कळतंय का? कसल सत्य नी कुठल सत्य? काहीही"
सीमा "तू गाणं म्हटलंस की छान म्हणायचं आणि तू माझ्या आवाजाला नावं ठेवायचीस; हे बरं पटतं तुला?"
राजेश "मग तू ही माझ्या आवाजाला नावं ठेव. मी कुठ काय म्हणतोय तुला."
सीमा "अरे पण बायकोची खोटी स्तुती करायला काय जातंय तुझं? तू म्हटलेलं गाणं म्हणा किंवा तू बनवलेला चहा किंवा तू बनवलेलं आॅम्लेट कसंही असलं, चव कमी-जास्त असेल तरी तुझं मन राखण्यासाठी मी म्हणतेच ना छान झालंय."
राजेश "आपल्याला नाही जमत बाबा खोटं बोलायला, कमी-जास्त होऊनही नावजायला. जो जैसा है वैसा ही हम बताते है|"
(खरंतर राजेशलाही सीमाच म्हणणं एव्हाना पटलं होतं पण माघार कशी घ्यायची; म्हणून शक्य होईल तोपर्यंत सीमाबरोबर वाद घालत होता.)
राजेश अजिबात माघार घेत नाहीये पाहून सीमा जास्तच चिडते.
सीमा "काही माणसांना असं वाटतं मीच खूप शहाणा, बाकी कोणाला काही कळतंच नाही."
राजेश "तुला असं वाटत नाही मी ऐकून घेतोय याचा अर्थ तू जास्तच बोलतेय."
सिमा "जास्त नाही, खरं तेच बोलतेय"
राजेशही थोडा चिडतोच...
होत अस की राजेश होता चेष्टेच्या मुडमध्ये आणि सिमा होती गाण्याच्या मुडमध्ये. राजेशच्या बोलण्याने सिमाचा गाण म्हणण्याचा मूड आॅफ होतो आणि सिमाच्या सिरीअस बोलण्याने राजेशचा मूड तापतो.....
तेव्हड्यात दाराची बेल वाजते,,,आता परत दार कोण ऊघडणार कारण दोघे भांडणाच्या तालात आणि घरात दार ऊघडायला तिसर कोणी नव्हत...तिकडे बेल वाजण चालूच होत. शेवटी राजेशच जातो कारण सिमा लवकर ऊठून घरातल आवरत होती आणि राजेश ऊशिरा ऊठलेल्या त्याने एकही काम केल नव्हत...निदान यान दार ऊघडण्याच काम तरी कराव अशी बायकोची ईच्छा. सिमा तस काही बोलली नव्हती पण तिने राजेशकडे टाकलेला कटाक्ष तसच काहीतरी सांगून गेला.....
राजेश दार ऊघडतो, जोशीकाकू आत येतात. जोशीकाकूंनी थालीपीठ आणल होत द्यायला. जोशीकाकू त्यांच्या शेजारीणबाई. तसा या दोघांचा शेजार्यांशी संपर्क सुट्टीच्याच दिवशी. जोशीकाकूंचा या दोघांवर खूप जीव होता आणि त्यांना या दोघांच कौतुकही वाटायच कारण कधी दोघांच भांडण वैगेरे ऐकायला मिळत नव्हत.....
जोशीकाकू "काय ग सिमा बाहेर ये, अगोदर हे गरम-गरम थालीपीठ खाऊन घ्या दोघे आणि मग बाकी काम आवरा."
सीमा किचनमधून बाहेर येते. "हो काकू हे बघा आलेच, भूक लागलेय मलापण."
राजेशही लगेच ब्रश करून हजर. "काकू काय मस्त वास सुटलाय."
जोशीकाकू "खावून घ्या पटकन, थंड झाल्यावर चांगल नाही लागत."
राजेश थालीपीठाचा एक घास तोडून घेतो आणि पहिल्यांदा सीमाला चारतो. सिमाही रागातच घास चावून खाते. काय करणार जोशीकाकूंसमोर राजेशला कसं नाही म्हणणार. त्यांना भांडण झालेल कशाला कळू द्यायच....दोघेही मस्तपैकी थालीपीठावर ताव मारून फस्त करतात.
सिमा; राजेश, जोशीकाकू आणि स्वत:साठी चहा आणते.
राजेश ऊगीचच मघाचा सीमाचा राग घालवण्यासाठी "चहा मस्त झालाय बर का..." जोशी काकूही त्याला दुजोरा देतात.
सीमाही राजेशची खेचण्याच्या दृष्टीने "हो का मग आणखी देवू का?"
राजेश "मला माहीत आहे तुझ माझ्यावर प्रेम आहे,,,,पण सध्यातरी नको डब्बल चहा."
सिमा त्याच्याकडे बघून नाक मुरडते. जोशीकाकू यावर हसतच "चला तुमच चालूद्या, मी निघते. काही हव असलं तर कळवत जा." म्हणून निघून जातात. सीमा दार लावते आणि मागे वळते तर तिच्या मागोमाग राजेश....."काय रे नौटंकी मला घास कशाला भरवत होतास"
"असू दे गं माझ प्रेम आहे तुझ्यावर...." म्हणून तिच्या खांद्यावर हात टाकतो.
"हो माहितेय तुझ प्रेम....." सीमा त्याचा कान ओढतच.
"आपली कितीही भांडण झाली तरी 'तेरी भी चूप और मेरी भी चूप' असच राहयच....बाहेर कळू नाही द्यायच भांडण झालेल....मग घरात कितीही भांडू नो प्रोब्लेम ! कशी वाटली आईडिया? "
यावर सीमाला खूप हसू येत "तूपण ना एक नंबर ड्रामेबाज आहेस "तेरी भी चूप और मेरी भी चूप म्हणे."
आणि हसत-हसतच ती राजेसला हग करून त्याच्या मताला सहमती दर्शवते.