Neelima Deshpande

Classics Inspirational

4  

Neelima Deshpande

Classics Inspirational

तेरा साथ हैं तो©®

तेरा साथ हैं तो©®

2 mins
270


नोकरी निमीत्त बदलीच्या गावी बायका मुलांपासून दूर राहत असलेला अभय दिवाळीसाठी सुट्टी घेऊन त्याच्या घरी बसने यायला निघाला.  वर्षभरातला दिवाळी हा सर्वात मोठा सण असल्याने त्याच्या घरचे देखील सगळेच त्याच्या घरी परत येण्याच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. सणासाठी आठ दिवस घराकडे प्रवासाला निघेपर्यंत अभय जमेल तशी ऑफिसची कामे हातावेगळी करत होता. 


थोड्या थकलेल्या शरीरानेच त्याचा परतीचा प्रवास सुरु झाला आणि मग थोड्या वेळातच त्याचे मन मागच्या महिन्यात तो घरी गेल्यानंतर झालेल्या क्षणांची आठवण काढण्यात रमले. कामाच्या गावी दुर असल्याने त्याचे महिन्यातून एकदाच घरी येणे होते हे ठाऊक होते म्हणून बायकोने त्याला विचारले होते....

"तुमच्या जवळ थोडे जास्तीचे पैसे शिल्लक आहेत का? असतील तर देऊन जा..." 

अभयला पटले की, तेंव्हा जवळ असलेले पैसे त्याने बायकोला देऊन यायला हवे होते. तसे केले असते तर तिला निदान तो येण्याची वाट न पाहता किंवा पैसे असल्याने दिवाळीची तयारी करता आली असती. शेजारी राहत असलेल्या इतर लहान मुलांची खरेदी पाहून आपल्या पोरांनी बायकोला "बाजारात खरेदीला चल!" असे म्हणून हैराण केले असेल याची त्याला खंत वाटत होती.

आपण अगदीच वेळेवर जातोय घरी...मनातल्या विचारांना आवर घालत त्याने पाकिटातले काही पैसे वेगळे ठेऊन बायकोला पाडव्याला ओवाळणीत द्यावे असा त्याने विचार केला. 


प्रवास संपवून अभयचे पाऊल घरात पडताच त्याच्या स्वागता बरोबर मुलांच्या मागण्या आणि बाहेर खरेदीला जाण्याचा हट्ट सुरु झाला. पैसे काढून देवाजवळ ठेवावेत म्हणून त्याचा हात त्याच्या खिशाकडे वळला... खिशात टाकलेला हात परत त्यातून रिकामा बाहेर काढायची त्याची हिंमत होईना. त्याच्या डोळ्यातून अश्रू काढत तो गप्पच झाला. त्याच्या बायकोने मुलांना खेळायला बाहेर पाठवून दिले. देवघरात जाऊन ती एक पाकीट घेऊन बाहेर आली. त्याच्या हातात तिने ते पाकीट ठेवले. मागील महिनाभरात पिकोफॉल व शिलाई करुन जमवलेले सगळे पैसे तिने त्यात ठेवले होते.


प्रवासात त्याचे पाकीट चोरीला गेल्याच्या दुखा:पेक्षा आपल्या बायकोमुळे आज सण साजरा होऊ शकत असल्याचा आनंद आणि तिच्याबद्दलचा अभिमान त्याच्या मनात आणि त्याच्या डोक्यात तिला होता.

एकमेकांच्या साथीने आणि आधार देत एकमेकांच्या वाढवलेल्या हिमतीने माणूस कठीण प्रसंगी देखील आनंदी व सुखी समाधानी राहू शकतो हे त्यांना पुन्हा एकदा अनुभवाला आले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics