Neelima Deshpande

Romance Others

3  

Neelima Deshpande

Romance Others

छोटे हसरे क्षण

छोटे हसरे क्षण

1 min
276


लग्न ठरवताना थोरांच्या साक्षीने त्याच्या घरच्यांच्या सोबत येऊन रमाला, माधव पसंत करुन गेला. ती ऑफ़िस मधे होती म्हणून सर्वांनी मनाचा मोठेपणा दाखवत तिथेच तिला भेटायचे ठरवले. साधा चहा आणि सोबत फराळ खाऊन मंडळी खुश होती कारण त्यांना मुलगी पसंद पडली होती. महिना भरानेच लग्नं करायचे असे ठरल्याने, अरेंज मैरेज करत असलेले ते दोघे एकमेकांशी फार बोलू शकत नव्हते. त्यामुळे तिने तिचा फोटो देऊन त्याचा फोटो स्वत:साठी त्याच्या कडे मागितला होता. पण गंमत अशी की त्याने जो फोटो दिला त्यात तो, त्याच्या कडेवर बाळ (पुतण्या) आणि सोबत त्याचे वडील असा फोटो दिला. यातला नवरा मुलगा कोणता असे मुद्दाम सगळे तिला विचारत व चिडवत होते म्हणून पोस्टाच्या स्टॅम्प एवढा लहान फोटो काढून त्याने जाण्याआधी खिडकीत ठेवून दिला, जो शोधताना तिच्या तोंडचे पाणी पळाले होते.


तो फोटो इतका लहान की तो काय पहावा ? असा तिला प्रश्न पडे. स्वत: चा एकही एकट्या चा फोटो त्याच्या कडे लग्नं ठरवत अस्ताना नव्हता याचे तिला आश्चर्य वाटले. लिखाणाची आवड म्हणून तिने मनोगत पत्रात लिहून, सुंदर सजवून त्याला दिले. व तू ही मला पत्र लिही असा आग्रह केला.  तिच्या आग्रहानुसार तिला लग्नाआधीच्या वाढदिवसाला त्याने एका छोट्या डायरीचे पान फाडून त्यावर 'I love you and take care' प्रेमपत्रात लिहून दिले.

हा खजिना ती वारंवार बघत हसरे प्रेमाचे क्षण जगते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance