Neelima Deshpande

Children Stories Children

3  

Neelima Deshpande

Children Stories Children

मैत्री गणिताशी!

मैत्री गणिताशी!

2 mins
343


"माधवी अथर्वची थोडी काळजी वाटते.दूसरीतच त्याला गणित अवघड वाटतेय.त्याचा आत्मविश्वास परत येईल, गणित त्याच्या आवडीचे होईल ह्यासाठी सुचव काही" नंदिनीने धीर देत समजावले,


"त्याची नेमकी अडचण समजून घे.अभ्यासातल्या गोष्टी वहीपेन न घेता त्याची खेळणी, घरातल्या वस्तू,पाने फुले वापरून तू त्याला दृष्यरुपात अंक समजून घेऊ दे. बेरीज वजाबाकी करताना त्याच्या डोळ्यांना दिसणारे वस्तूंचे कमी अधिक प्रमाण पाहून त्याला समजले की तो शाब्दिक गणितेही सोडवेल.


एखादा अंक हा बाकी किती अनेक अंकाची वेगवेगळी संगत करून बनतो. त्याला बनवण्यासाठी किती अंक मित्र बनून एकत्र येतात हे त्याला समजावे यासाठी कागदावर लिहून आणि वस्तू वापरून शिकव. जसे...

1 हा अंक ....

1 0 = 1

0 1 = 1

ह्याप्रमाणे कसाही लिहिला तरी बनतो. हे जितके सोपे आहे तितकेच सोपे बाकी अंक आहेत आणि त्यांना बनवण्यात अनेक अंक मदत करतात जसे...

2 हा अंक ....

1 1 0 = 2

0 1 1 = 2

1 1=2

2 0=2

0 2=2


या पद्धतीने तू त्याला पुढच्या अंकासाठी कोणते इतर अंक लागतील/मदत करतील हे विचारत आणि त्याला विचार करायला लावून एक ते दहा या अंकाचे सगळे मदत करणारे मित्र कोण आहेत ते शोधून लिहून दाखव. अधून मधून हे शिकवलेले पुन्हा विचारत जा... त्याचा खेळ म्हणून तूम्हा दोघात किंवा त्याच्या मित्रांसोबत तुम्ही हे करु शकता.


स्वयंपाक घरात काम करताना तू त्याच्याशी बोलत बोलत कामे करू शकली तर त्याला तू जो पदार्थ बनवत आहेस तो करताना वापरत असलेल्या गोष्टींचे प्रमाण सांगत जा. त्यातून नकळत पदार्थांची नावे, गुणधर्म, प्रमाण, रंग रुप, चव आणि त्यापासून काही योग्य प्रमाणात एकत्र करुन कसे बनवायचे हे त्यांच्या कानावर पडत जाते. आपल्याला काम करताना पाहून मुले अनेक गोष्टी शंका म्हणून विचारतात त्याची उत्तरं दिली की चौकस राहिल्याने त्यांच्या मेंदूला चालना मिळत जाते.


भांडी लावताना किंवा डबे रचताना त्यांचा आकार, आकारमान यावर तू त्याला मदत करायला सांगू शकते किंवा स्वत: करताना ते बोलू शकते. यातून तो लहान- मोठे, उभे-आडवे, गोल-चौकोन असे कितीतरी आकार व आकारमानातील कंसेप्ट तो सहज हसत खेळत शिकेल. सर्वांत महत्वाचे म्हणजे त्याच्या नावाचा अर्थ अथर्ववेद व अथर्वशीर्ष काय आहेत सांगून 'ते' नाव असलेला तो प्रयत्न करुन गणित शिकू शकतो हे समजव"


Rate this content
Log in