Neelima Deshpande

Children Stories Comedy Children

4  

Neelima Deshpande

Children Stories Comedy Children

चुप चूप' बैठे हो?

चुप चूप' बैठे हो?

4 mins
302


" 'चुप चूप' बैठे हो, जरुर कोई बात हैं जी, जरुर कोई बात हैं!"


"अथर्व इतका कमालीचा शांत कसा काय राहू शकतो? शाळा सुटल्यावर सगळी मुले जातात पण हा तर माझ्यासोबत पाळणाघरातही दिवसभर सुद्धा तो शांतपणे बसून फक्त सगळयांना बघत असतो. काहीच बोलत नाही. विचारले तरी खुणेने सांगतो. तुम्ही दोघेच असता इथे आणि तुम्ही सुद्धा नोकरी साठी दिवसभर बाहेर! तुम्ही तिघे एकमेकांसोबत इतक्या कमी वेळ असता तर त्याच्याशी बोलणार कोण? आणि आपणहून त्याला बोलत केलं नाही तर तो असाच अबोल राहील! तुम्ही आधी एखाद्या डॉक्टरांना भेटा...त्याच्या जिभेला तर काही अडचण नाही ना? की एकटा पडलाय तो? असे असेल तर ह्याच्या सोबतीला आणखी एखादं भावंड आणायचे मनावर घ्या! मी एकटी किती वेळा सांगणार तुम्हाला या गोष्टी? दरवेळी मी बोलते आणि तू मान डोलावत "हो" म्हणते पण मला त्याच्यात फरक दिसत नाही!


लेकरू खुप गुणी आहे तुमचं! तुम्हाला सोडून इथे दिवसभर शहाण्यासारखं राहतं. शाळेत शिकवताना आणि मधल्या वेळेत मुलांसाठी खेळायला काढलेली सगळी खेळणी हा नीट बॉक्समधे भरून ठेवतो. ह्याला प्रत्येक गोष्टीची जागा पाठ झाली आहे इतक्या चटकन! नव्या प्रवेशासाठी कुणी पालक आले की, हा बरोबर त्यांना बसवतो आणि मला आत येवून सांगतो...पण हे सार मुकेपणानं, खुणांनी! मला काळजी वाटते त्याची ! उद्या सुट्टी आहे ना रविवारची, मग ह्याला दाखवून आण आणि मला सांग काय म्हणतात डॉक्टर ते! "


अनेक वेळा यातले थोडे थोडे आम्हांला,आणि खास करुन मला हे मीना मॅडमनी सांगितले होते. सुरवातीला आठवडाभर तर त्या प्रचंड खुश होत्या त्याच्या शांत बसण्यावर ! खुप कौतूकही केले त्यांनी !! पण नंतर त्यांना काळजी वाटली असावी म्हणून त्यांनी माझ्याशी याविषयी बोलायला सुरुवात केली.


" पहली मुलाकात हैं जी, पहली मुलाकात हैं .... "


असं सांगून कधी मी वेळ मारुन नेली तर कधी कोणी दुसरे पालक आल्याने त्यांना माझ्याशी बोलणे थांबवून त्यांना बघावे लागले होते.


प्रत्येक मुलाची वाढ थोड्याफार प्रमाणात मागेपुढे असते आणि मुले थोडी उशिरा बोलतात, आधी चालतात असं कुणीतरी सांगितलेले मला आठवत होते आणि त्याप्रमाणे तो खुप लवकर चालायला लागला होता त्यामूळे बोलण्याचे थोडे उशीरा होईल कदाचित अशी माझी मानसिक तयारी आहे हे एकदा मी त्यांना सांगून झाले होते.


परंतू आम्ही इंदौरमध्ये नवीनच रहायला आलो आहोत आणि सोबत घरी कोणी मोठे माणूस सांगायला नाही या विचाराने आम्ही कॉलोनीतच ज्यांची घरगुती शाळा आणि शाळेनंतर पाळणाघर होते अशा 'चाईल्ड केयर' नावाच्या नर्सरीत अथर्वचे नाव घालून शाळेच्या मुख्य मीनाताई ह्यांना आमचे लेकरू रोज सकाळी सोपवून कामाला जायचो. आम्ही जसा त्यांना जीव लावला आणि भरवश्याने लेकरू सोपवले तशा त्याही त्या परक्या शहरात स्वघोषीत आमच्या पालक झाल्या.


घरात अथर्व व्यवस्थित बोलतो, काही अडचण नाही हे आता त्यांना खरे वाटत नव्हते की शाळेत का बोलत नाही याचे! माहिती नाही म्हणून त्यांना संधी मिळाली तशी त्या दिवशी त्यांनी डॉक्टरकडे जाच नाहीतर सोमवारी ह्याला मी पाळणा घरात थांबू देणार नाही अशी प्रेमळ धमकी दिल्यावर मी पण " उद्या दाखवते डॉक्टरला " असे सांगून घरी आले. त्या आजच जा म्हणत होत्या आणि मी उद्या जाईल म्हणून निघाले आणि दुसरा दिवस उगवला तेंव्हा चार ठिकाणे हिंडून झाल्यावर त्यांना फोन केल्यावर समजले की, रविवारी कोणताच डॉक्टर आम्हांला सापडणार नाही. त्यासाठीच त्या "काल जा" म्हणत होत्या.... नव्या शहरात येवून महिनाभरच झाला आहे त्यामूळे आम्हाला हे माहिती नाही यावर विश्वास ठेवत त्यांनी आम्हांला आणखी थोडा वेळ दिला.


चार पाच दिवस गेले असतील, त्यांनतर एक दिवस नेमकं मला ऑफिसमधे मिटींगमधे अडकल्याने अर्धा तास उशीर झाला तर मीना मॅडम दारात उभे राहून माझी वाटच पाहत होत्या. मला पाहताच सुटकेचा नि:श्वास सोडत त्या म्हणाल्या,


" उद्या पासून उशीरा येणार असलीस तर ह्याला सांभाळण्याचे जास्त पैसे ! "


आता लेकराने काय केले? या काळजीने आणि त्या जे काही बोलल्या ते न समजल्याने मी नुसते


" बरे, ठीक आहे देईल मी !"


म्हणत अथर्वला आवाज दिला, तर तो अंगात घातलेल्या नव्या ड्रेसमधे बाहेर आला!


"आज मला हे मीना मॅडमनी दिले ! त्या खुप खुश आहेत, त्यांनी माझे खुप लाड केले !"


असे अथर्व मला सांगत असताना, मीना मॅडम हसत म्हणाल्या,


" अग तुला उशीर झाला तर जास्त पैसे दे असे नाही म्हटले मी, उलटे मला जास्त पैसे मिळाले आज तसे आणखीही मिळतील हे सांगत होते. इतके दिवस न बोलणारा हा नवीन ऐडमिशन घेण्यासाठी आलेल्या पालकांच्या समोर इतका घडाघडा बोलला की त्यांनी हातोहात पुर्ण वर्ष भराची फी भरून त्यांच्या मुलाचे नाव नोंदवलं आहे. उद्या आणखी काही मित्रांच्या मुलांसाठी ते स्वत: त्यांना घेवून येणार आहेत. एकाच शब्दाला मी हिंदी आणि इंग्रजी मधे काय म्हणतात आणि त्याची सविस्तर माहिती देत मुलांना शिकवते. आताच तर शाळा सुरु झाली आहे त्यामूळे त्यांचे लगेच पाठ होईल अशी अपेक्षाच नव्हती पण याने सगळ्या गोष्टी, हिंदी व इंग्लिश सोबत मराठीत आणि कानडामधे त्यांना सांगितल्या आणि ते खुप खुश झाले.


तुम्ही बँगलोरला होतात, आणि घरी मराठी बोलता त्यामूळे ह्याला सुरु वातीला हिन्दी बोलणे समजत नसावे त्यामूळे तो गप्प असेल हे आज माझ्या लक्षात आले!


लेकरू बक्षीस मिळालेल्या नव्या ड्रेसमूळे खुश कारण मला यायला उशीर झाला तोवर त्याच्या साठी मीना मॅडमनी ड्रेस मागवून घेतला होता...खाऊ दिला होता....मीना मॅडमही त्यांची, ' अथर्व बोलत नाही, शांत असतो' ही काळजी मिटली आणि शाळेला एक नवा 'डेमोबॉय' मिळाला म्हणून,


"कधी रविवारी पालक आले तर तासभर याला त्यांच्याशी बोलायला पाठव ग!"


म्हणत खुश होत्या आणि मी मात्र माझं लेकरू एकदा बोलायला लागले की कसे 'अखंड' बडबडत राहते माहिती असल्याने त्यांचा आनंद असाच टिकून राहो यासाठी प्रार्थना करत गाण म्हणत होते,


" जीवनात ही घडी अशीच राहू दे ! "....


सदर विचारांच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखिकेकडे राखीव आहेत.


आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास माझ्या नावासह जरूर करावी.


आपला अभिप्राय खुप महत्वाचा, तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समधे आपले मत जरूर कळवा.


फोटो साभार Google and Pixabay



Rate this content
Log in