Neelima Deshpande

Inspirational Children

3.2  

Neelima Deshpande

Inspirational Children

आकाशी झेप घे रे पाखरा...

आकाशी झेप घे रे पाखरा...

1 min
479


"आकाशी झेप घे रे पाखरा...सोडी सोन्याचा पिंजरा....!" या गाण्याच्या ओळी कानावर पडल्या आणि रेवती ठाम निर्णय घेत स्वत:च्या जागेवरून उठली.  'फ्लाइट लेफ्टनंट' या पदाचा कार्यभार उचलण्यासाठी स्वत: चा होकार कळवत, ती तिच्या कामाच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी निघाली होती... मोहाचे सारे पाश बाजूला सारत. 


रेवती एका गर्भश्रीमंत घराण्यात, अतिशय लाडात वाढलेली रेवती मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या वेळी ताज हॉटेलमधे एका बिज़नेस सेमिनारसाठी गेलेली होती. तो सारा प्रकार तिने अगदी जवळून पाहिलाच नव्हे तर अनुभवला होता.


सर्वांनी अपेक्षा सोडून दिलेली असताना, स्वतःच्या जिवावर उदार होऊन तिच्यासह अनेकांना सेनेच्या जवानांनी सुरक्षित बाहेर काढल्यावर तिच्या आयुष्याने कलाटणी घेतली. ज्यांच्या मुळे आज माझे प्राण वाचले मी त्यांचातीलच एक होवून जगते हे तिने ठरवले. त्यासाठी प्रशिक्षण घेतले आणि कर्तव्याची वाट धरली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational