Deepali Rao

Tragedy Romance

2.5  

Deepali Rao

Tragedy Romance

ते वयच वेडं असतं

ते वयच वेडं असतं

2 mins
937........कॉलेजमध्ये गॅदरिंग सुरू होतं. मंतरलेलं…..जादुई वातावरण. आज कविता वाचनाचा दिवस होता.

गोरीपान,लांब केसांची आणि मोठ्या मोठ्या काळ्याभोर बोलक्या डोळ्यांची 

सावनी पेंडसे

तिच्या मैत्रिणींसोबत पहिल्या रांगेत बसायचं म्हणून हॉलमध्ये जरा लवकरच जाऊन पोहोचली होती.

आज अरुही कविता सादर करणार होता.  

     अरु....अरविंद साने...बी.ए. च्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता. सावनी पहिल्या वर्षाला. कॉलेज जॉईन   केल्यापासून तिने त्याच्याबद्दल बरंच ऐकलं होतं. त्याचं दिसणं, बोलण्याची स्टाईल आणि त्याच्या कविता...उफ्...भारावून गेली होती सावनी. त्याच्या समोर जाण्याची आणि त्याच्याशी बोलण्याची एकही संधी ती वाया 

जाऊ देत नव्हती. एक अजाणत आकर्षण तिला त्याच्याबद्दल वाटू लागलं होतं.

 मग मुद्दाम तो जिथे असेल तिथे मैत्रिणींसोबत जाऊन उभं राहणं, त्याच्या नोट्स मागणं...

      हळूहळू सावनी ने त्याच्याशी मैत्री वाढवली. तिला अनेकदा वाटे की त्याच्याकडे आपलं मन मोकळं    करावं. त्याला सांगून टाकावं की माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. मला तू फार आवडतोस. पण एकीकडे तिला वाटत होतं, हे सांगितलं आणि अरुला आवडलं नाही तर तो आपली मैत्रीही सोडून टाकेल. कुठल्याही            परिस्थितीत तिला अरुचा दुरावा नको होता.

    " सावनी तू अरुला सांगून का नाही टाकत ?" अश्विनीनं तिला परत एकदा विचारलं. 

   "नाही ग, तो नाही म्हणाला तर... मला भीती वाटते. जाऊ दे न !" सावनी उत्तरली.

   तितक्यात तिथे अरु आला.

 "ए सावनी, इथे काय करताय ? मी तुम्हाला कुठे कुठे शोधत होतो.पप्याला पाहिलं का कुठं? या सलवार        

कुर्त्यावर जॅकेट हवं होतं. त्याला म्हटलं तर कुठे जाऊन बसलाय कोण जाणे. आता कार्यक्रम सुरू होईल. "

  पप्याला धावत येताना बघून अरु तिकडे पोहोचला.

 "पप्या, च्यायला कुठे कडमडला होतास आणि जॅकेट कुठे आहे ? "

 " हे घे शहाण्या ! कार्यक्रम यांचा आणि धावपळ मात्र आम्हाला. " पप्या म्हणाला.

 सावनीनं अरुला जॅकेट घालायला मदत केली आणि तो विंग कडे पळाला. 

   किती स्मार्ट दिसतोय अरु....काही केल्या त्याच्याशी बोललं पाहिजे..... सावनी विचार

करत होती.

    अरु स्टेज वर आला तसा टाळ्यांचा कडकडाट झाला. सारं कॉलेज त्याच्या कवितां साठी वेड होतं.....


 ते वयच वेडं असतं

    कुणी मोहवूनी जातं

    मन स्वप्नात तरंगत रहातं

    मुग्ध गंधात गंधूनी जातं

    ते वयच वेड असतं......

        

       हातातील त्या हाताने

        एक नव नात खुलतं

    मला छोटासा कोपरा हवा म्हणताना

        सारं आभाळच मिठीत येतं

        ते वयच वेड असतं......


   सगळ्या जाणीवा बधीर होतात

   त्या एका शब्दासाठी कान आतुरतात

  प्रेमात पडल्यावर जाणवतं

   ते हुरहुरणं खरं तर याचसाठी असतं

   ते वयच वेड असतं......

  ते वयच वेड असतं......


 "अरे यार !!काश ही कविता माझ्यासाठी केली असती.  काहीतरी उपाय शोधलाच पाहिजे. " सावनी मनातल्या मनात म्हणाली. 

     दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये पोहोचल्यावर, ती पहिले अरुला शोधत कॅन्टीन मध्ये गेली. त्याला     तिच्यासाठी कॉफी आणायला सांगून पटकन त्याच्या सॅक मध्ये एक गुलाबी पत्र टाकलं. आज दिवसभर     सगळ्यांनी फक्त कल्ला केला कॉलेजमध्ये.

   घरी गेल्यानंतर त्यानं ते पत्र पाहिलं.

 "हे कुणाचं पत्र?"

  गंमत वाटली त्याला ते निनावी प्रेमपत्र वाचून. त्यानं ही गोष्ट सगळ्या मित्र मैत्रिणी पासून लपवून ठेवली.

मग मधून मधून त्याच्या सॅकमध्ये अशी गुलाबी पत्र आपोआप यायला लागली. हळूहळू हळूहळू तो 

ही या पत्रांची वाट पाहू लागला. पागल झाला होता तो त्या पत्रांसाठी आणि ती लिहीणा-यासाठी सुद्धा...

  "अरे! लक्ष कुठेय तुझं? काय चालू आहे सध्या?" राघव विचारत होता, पण अरूच लक्षच नव्हतं.

सगळे विचारत होते. फक्त सावनीलाच उत्तर माहित होतं. ती ही त्याला चिडवत गालातल्या गालात हसत    होती.

      शेवटी पत्रातून तिने त्याला भेटण्यासाठी लिहीलं. अरुची स्वारी एकदम खुश होती आज.

ती...त्याच्या स्वप्नातली अनामिका त्याला आज भेटणार होती. कॉलेजच्या मागच्या टेकडीवर तिने त्याला    

संध्याकाळी बोलावलं होतं.

   आज त्याचं चित्त थाऱ्यावर नव्हतं.

  "कशी असेल? ती कशी दिसत असेल? असुदे! कशीही असू दे. माझं खुप प्रेम आहे तिच्यावर. ती जशी असेल तसं मी तिला स्वीकारायला तयार होईन. ". खुप चलबिचल चालु होती त्याच्या मनात. आज त्यांनं त्याच्या 

मनातलं हे गुपित मित्र-मैत्रिणींना देखील सांगितलं.

  "अरे शहाण्या इतके दिवस आमच्यापासून हे लपवून ठेवलास काय?

 चल आता पार्टी काढ पहिले. "  मग काय विचारता सगळेच त्याच्याबरोबर जायला तयार झाले.  कसबस त्यांना थोपवून ठेवत त्यांनं दुसऱ्या दिवशी तिला त्यांना भेटवायचे वचन दिलं.

 लेमन यलो कलरचा शर्ट, निळी जीन्स, पायात स्पोर्ट शूज आणि डोळ्यावरती रेबॅन गॉगल चढवून   अरु संध्याकाळी ठरवलेल्या वेळा पेक्षा थोडा लवकरच त्या ठिकाणी जाऊन पोहोचला. हे वाट पाहणं फार     जीवघेणं वाटत होतं त्याला. प्रत्येक येणारी मुलगी तीच असेल का? अशा विचारानं तो थोडा पुढे व्हायचा आणि निराशा व्हायची त्याची.

   लांबूनच त्यानं सावनीला येताना पाहिलं.

 , "अग तू कशाला आली आहेस इथे? मी सांगितलं ना, उद्या तिला सगळ्यांना नक्की भेटवीन      म्हणून. " तो घाईघाईने पुढे जाऊन म्हणाला.

 "अरे! हो- हो. थोडातरी धीर धर. मी या झाडामागे लपून लांबूनच बघते. मला पण बघायचं आहे रे   तिला. " असं म्हणून ती दूरच्या एका झाडामागे जाऊन उभी राहिली.

  अरु कितीतरी वेळ वाट पहात उभा होता. अंधार पडू लागला तशी त्याची बेचैनी वाढू लागली आणि अचानक त्याला त्याच पत्रात लिहिलेल्या कवितेच्या काही ओळी ऐकू यायला लागल्या.....

         फक्त तू आणि मी

         मनमोर लुब्ध होतो

 तो भारावून पुढे गेला. पाहतो तर सावनी !

"म्हणजे सावनी ती तू? म्हणजे तू ती पत्र... " त्याच्या तोंडून शब्दच फुटत नव्हता. त्याने सावनीला घट्ट मिठी मारली.

     " माझी अनामिका....माझी सावनी"

        दुसऱ्या दिवशी दोघेही हसत हसत कॉलेजमध्ये आले. सगळ्या मित्र-मैत्रिणींनी त्याला गराडा घातला.

 "कुठे आहे ती? तिला घेऊन येणार होतास ना? "

         फक्त तू आणि मी

         मनमोर लुब्ध होतो

     हलके तरंग मनावर

        जगपसारा क्षणात स्तब्ध होतो.


  सावनीने त्याच्यासाठी म्हटलेल्या कवितेच्या पुढच्या ओळी म्हणत त्यानं तिची नव्याने ओळख  करून दिली. कविता सादर केल्यानंतर अरुनं सहेतुक सावनी कडे पाहिलं. तिच्या डोळ्यातला प्रेमाचा होकार पाहून त्याचं मन थुई थुई नाचू लागलं.

  आता अरु आणि सावनी सतत एकत्र दिसू लागले. कॉलेजमध्ये, कॅन्टीनमध्ये एकमेकांबरोबरच     राहण्यात त्यांना मजा येत होती.

  सकाळ झाली की आवरणे, कॉलेजला जाणे, संध्याकाळी आल्यावर थोडा इकडेतिकडे टाईमपास करून अभ्यास करणे आणि झोपणे ...या अरुच्या दिवसभराच्या रूटीनमध्ये आणिक दोन गोष्टी ॲड झाल्या होत्या.........सावनी ला भेटणे आणि तिच्या आठवणीत रात्री गाणी ऐकत झोपणे. पूर्वी कधीही मन लावून गाणी न     ऐकणारा अरु आता कडव्यातल्या मधल्या मधल्या ओळी मनापासून गुणगुणू लागला होता. त्यामध्ये स्वतःला आणि सावनीला गुंफुन बघत होता. त्याच्या कवितांसाठी तिच्या डोळ्यांतून मिळणारी दाद त्याला मोहून टाकत होती.

स्वतःला कोणत्याही वस्तू किंवा कपडे खरेदी करतानाही तो सावनी चा विचार करु लागला.        हा रंग तिला आवडेल का? ही स्टाईल पसंत पडेल का? आणि काय काय...

    सावनी ची देखील यापेक्षा वेगळी अवस्था नव्हती.आग उधर भी बराबर लगी थी l उगाच येताजाता आरशात पाहणे. आत्ता या क्षणाला तो बरोबर असता तर त्यानं काय केलं असतं याचा विचार करत राहणे,   यामध्येच तिचा सगळा वेळ जात होता.

    म्हणता म्हणता परीक्षा तोंडावर आली. परीक्षेच्या काळात देखील अरुने सावनीला खूप मदत केली. ती दोघं चांगल्या मार्कांनी पास झाली.

    दिवस सरत होते तसं त्यांचं प्रेम ही बहरत चालल होतं. हळूहळू बातमी घरापर्यंत पोहोचली.

सावनीच्या बाबांनी त्यांना बाईकवरून एकत्र फिरताना पाहिलं. संध्याकाळी घरी आल्यानंतर त्यांनी तिला याबद्दल विचारणा केली. सावनीने त्यांना सर्व हकीकत सांगितली. आई आणि बाबांनी तिला याबाबत    ओरडायला सुरूवात केली. ती खूपच रडवेला झाली तशी त्यांनी तिला जवळ घेतले आणि गंमत करत असल्याचे सांगितले. त्यांनी अरविंदच्या घरी जाउन त्याच्या घरच्यांशी बोलणी केली. दोघांच्याही घरून होकारच       मिळाला. मग काय विचारता? आता फक्त कॉलेज संपायची खोटी होती. मग सावनी कायमचीच अरुची होणार होती. तोपर्यंत अरूही त्याच्या वडिलांच्या बिझनेसमध्ये लक्ष घालू लागला होता.

 एकदा दोघंजण सुट्टीच्या दिवशी गडावर फिरायला गेले. वातावरणाचा अंमल दोघांवरही चढला होता. हातात हात घालून फिरताना, एकमेकांच्या मिठीत बेधुंद होत निसर्गाच्या साक्षीने ते कधी एक झाले त्यांनाच   कळले नाही.......निघता निघता थोडा उशीरच झाला.

"अरु, अरे गाडी थोडी हळू चालव ना. मला भीती वाटते आहे. "

  "घाबरतेस काय वेडे!!अगं घट्ट धरून बस मला. त्यातच तर खरी मजा आहे." डोळा मारत अरू बोलला.

   "अरु!!!! काय रे हे? " सावनी चक्क लाजली. प्रणयाची लाली तिच्या गालांवर चढली होती.

   तिच्या मोहक चेहर्‍याकडे अरु पाहातच राहिला अन् तो समोरून भरधाव वेगाने येणारा ट्रक.......

  आणि नंतर चा अपघात........

     अरुची शुद्ध हरपली. जाग आली ती हॉस्पिटलमध्ये.  त्याची तब्येत आता हळूहळू सुधारत होती. शुद्धीत आल्या-आल्या त्यानं सावनीबद्दलच    विचारायला सुरूवात केली.......

  

  "अरु sss ऐकतोयस ना? अरे आतातरी नाद सोड आणि लग्नाला तयार हो. "आई कळकळीने सांगत होती.

    पण अरुच लक्षच नव्हतं. आता या वाक्यांची त्याच्या घराला ही सवय झाली होती. काही केल्या तो बधत नव्हता...................................


 ...... "बाबा, काय करतो आहेस? आवर ना पटपट. आज मला लवकर पोहोचायचं आहे कॉलेजमध्ये.     दिवाळीनिमित्त कवितांचा कार्यक्रम ठेवला आहे. आज मी ती तुझी कविता सादर करणार आहे. " अवनी     अरुच्या खोलीत येऊन बोलत होती.

   "ती नाही का? तू आई साठी लिहीली होतीस. " अरे ती रे.. ..


     मनात होते तुझ्या तरीही 

    तू काही बोललीच नाही 

     मीच म्हणालो प्रीत माझी तुजवरी

 अन् तुझे डोळे बोलून गेले बरंच काही.


   "कित्ती रोमँटिक कविता आहे रे बाबा. खरंच सांग ना आई काय म्हणाली मग?

ए सांग ना रे. आता मी काही कुक्कुलं बाळ नाहीये. आता तरी सांगशील का मला? " अवनीचा किलकिलाट    चालूच होता.

   अरुनं लक्ष न दिल्यासारखं केलं आणि तो स्वतःचं आवरू लागला. आजही त्याचं मन सावनीच्या  प्रेमामध्ये आकंठ बुडालेलं होतं. आताही त्याला तिच्याकडे जाण्याची ओढ लागून राहिली होती.

दिवाळीचा आनंद चहूकडे सळसळत होता. सगळं वातावरण उत्साहाचं आणि प्रसन्न होतं.

आईनं केलेल्या फराळाला आजही ती झक्कास चव होती. थोडं फराळाचं त्यानं सावनीसाठीही बांधून घेतलं होतं आईकडून. दिवाळीसाठीच्या सगळ्यांसाठी आणलेल्या भेटवस्तूही त्याने कालच दिल्या होत्या. आता फक्त    "ती" च राहिली होती.

  अरू तयार होऊन खाली आला आणि पार्किंग मधून कार काढायला गेला. आजी आजोबांना नमस्कार करून नटलेली, सजलेली अवनी बाहेर आली. 

   " लाडोबा आहे नुसती. आईचंच रूप घेतलय लेकीनं ", आजी ने तिच्याकडे एक प्रेमळ कटाक्ष टाकला.

   अवनीला कॉलेज मध्ये सोडलं आणि अरू हरखून सभोवार पहातच राहिला. त्या वातावरणात हरवून भूतकाळात गेला....... बराच वेळाने भानावर आला आणि तिथून निघाला.

   .....आज दिवाळी पाडवा होता.  

    "सावनी, अग बघ ना ग मी काय आणलंय तुझ्यासाठी!

मागे वाढदिवसाला ड्रेस आणला होता पण दिवाळी सणाला मात्र तुझ्यासाठी साडीच घेतो नेहमी.

 बघ ना गं ! हा रंग तुला पसंत पडतो आहे का आणि हे फराळाचे पदार्थ आणि हो नेहमीसारखीच      तुझ्यासाठी एक सुंदर अशी कविताही करून आणली आहे.

तुझं ते डोळ्यातून व्यक्त होणं...मला आज हि वेड लावतं...... "


   तुझ्या नि माझ्या नात्यातील

   विण अजून घट्ट आहे

     तुझ्यात गुंतून राहण्याचा

     तसा हा माझा जुनाच हट्ट आहे 

    

    अरु बोलत होता आणि त्याच्या डोळ्यांतून सावनीवरचं प्रेम ओसंडून वाहत होतं.

   सिटी हॉस्पिटलच्या बेडवर पडलेल्या सावनीची तब्येत गेल्या काही दिवसात फारच खालावली होती.

.....त्या अपघातात तिच्या डोक्याला जबरदस्त मार लागला होता. ती या कोणालाही     ओळखत नव्हती.     तिची स्मरणशक्तीच ती गमावून बसली होती. 

अरू...त्यांच प्रेम... त्यांच नातं आणि त्यांची अवनी...अरविंद आणि सावनीची अवनी....

त्या प्रेमाच्या उत्कट क्षणांची आठवण...

डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून जगवलेली.......

सारंं काही हरवलं होतं.....

    आज इतक्या वर्षांनंतरही तो सावनीच्या मोठ्या-मोठ्या काळ्याभोरं  पण         निस्तेज, निर्विकार डोळ्यांमध्ये त्याचं प्रेम शोधत होता.......Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy