STORYMIRROR

Ashutosh Purohit

Romance

1.0  

Ashutosh Purohit

Romance

ते दोघं..

ते दोघं..

1 min
3.1K


ती : तुला खरंच तेव्हा काही वाटत होतं का रे माझ्याबद्दल?
 तो : असं का विचारत्येस? Pls सोड ना यार.. परत कुठे तो विषय काढतेस..
 ती : हेच... या तुझ्या "सोड ना यार" प्रवृत्तीची ना खूप भीती वाटते मला..
 तो : अगं, म्हणजे मला असं म्हणायचंय की आता परत जुनं काहीतरी उकरून काढण्यापेक्षा, आत्ताचा क्षण enjoy करूया ना..
 ती : असं आधीचं सगळं विसरून एक 'अनाथ' क्षण जगता येतो?
 तो : मन स्वच्छ असेल तर काहीही करता येऊ शकतं जगात...
 ती : ठीके, वेगळ्या विषयावर बोलू..

 (थोडा वेळ शांतता)

 तो : आपण असं सोडायला नको होतं यार एकमेकांना...

 ती निःशब्द.. तो मूक..!

 ती सरलेली... तो उरलेला...!

 


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance