स्वछंदी
स्वछंदी


आज सकाळ पासूनच विधी तिचा विचारात गुंग होती.
घरातली सर्व कामे आटोपली आणि बाहेर ओसरीत जाऊन बसली तिथे तिची नजर अचानक सई वर गेली.
सई निवांत झोपलेली होती,
एकटक पणे सई कडे बघत विधी विचारात आणखी गुंग झाली, किती छान आणि निरागस झोपली आहे सई, लहान पण सुद्धा किती सुंदर असत ना, गेल्या कित्येक दिवसापासून इतकी शांत झोपच आली नाही कधी,
सई कडे बघत काहीशा कपाळावर आठ्या चढवत विधी भूतकाळात रमली, किती सुंदर होत ना लहान पण निखळ, निथळ, निरागस, कधीच कुठलं दडपण नाही, भीती नाही, मनसोक्त जेव्हा जे वाटेल ते करायचं तस वागायचं, बिनधास्त,
कुणाच्या जाण्याची भीती नाही, न कुणाचा येण्याची पर्वा, मान, अपमान काहीच समाजायच नाही, हे करू नको सांगितलं तरी वारंवार तीच गोष्ट करायला मज्जा यायची याने कुणाचं फायदा नुकसान कसलीच भीती नसायची, थट्टा, मस्करी आणि सायंकाळचा मैत्रिणीचा कट्टा, आता सर्व बदलय ज्या गोष्टी माझ्यासाठी जगण्याची कारण होत्या त्या पासून मी का पळ काढतेय, मी बदलीये कि या सगळ्या कडे बगण्याचा माझा दृष्टीकोण,..
कधी कधी वाट घ्यावा तो एक उनाड दिवस जगून भरभरून लहानपणी सारखं कुणाची पर्वा न करता. समाज्याच्या दृष्टीने वेडेपणा असावा कदाचित पण विधीला शोधण्यासाठी हा प्रयत्न करावाच.
दूर निघून जावं कुठेतरी तिथे फक्त निसर्ग, निरव शांतता आणि विधी पण या सर्वात मनात उठलेल्या प्रश्नाचे काय त्याने मनात माजवलेल्या काहुराच काय,
जर मनच अस्वस्थ असेल तर कुठेच शांतता लाभणार नाही.
आज विधीला त्या गोष्टीची आठवण झाली जी गोष्ट आजी लहान पणी सांगायची,
एक राणी होती. राजा तिच्यावर खूप
प्रेम करायचा, जगातले सर्व सुख तिच्या पायावर लोटांगण घालायचे, सगळंच होत राणीकडे तरी ती अस्वस्थ असायची, तिला झोप येत नसे,
राजा विचारात पडला राणीला गुलाबाचा पाकळ्याने सजलेला बिछाना आहे, तरी ती अस्वस्थ का? इथे राजा ही अस्वस्थ अचानक राणीच्या हाती ती कळी लागली जी गुलाबाचा पाकळ्या आड बिछान्यावर होती, एक गुलाबांची छोटीशी कळी तिला अस्वस्थ करत होती,ती समस्या तर छोटी होती, अर्थातच ती समस्या नव्हतीच, विनाकारण त्या गोष्टीचा इतका बाहू होता. असच होत प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या छोटी असते विनाकारण तिला हवा का द्यायची त्याने प्रश्न तर सुटणार नाहीच ना, फक्त स्वास्थ बिघडेल, मग का? जगून घेऊया कि मनसोक्त काय हरकत आहे,
विधीला आता तिच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते, काय हरकत आहे एकदा उनाड दिवस जगायला पुंन्हा एकदा लहान व्हायला,
पिझ्झा पेक्षा पाणी पुरी खाऊ, उगाच हाय फाय असल्याचा काय तो आव,
मॉल पेक्षा बागेत जाऊ, मस्त एकत्र बसून सर्व भेळभत्ता वर ताव मारून खाऊ,
कुणाचा झोका जास्ती उंच गेला यावरून थोडं तरी एकमेकांशी डोकं लावू, लपाछपी, लपंडाव खेळू, विनाकारण आकाशात फुगे सोडू, लहानपणी या गोष्टी विनाकारण होत्या, महत्व नव्हत वाटत कशाचे ,
पण तेच क्षण एका काळी पुन्हा हवे हवे से वाटतील कुणास ठाऊक होते, आज समजतय कि काय हरवले आहे, तो उनाड एक दिवस जगायचं भरभरून राहूनच गेलं खूप जगून झालं,
सगळ्या नात्याला कर्तव्याच देण देऊन झालं. आता, स्वतःसाठीचे कर्तव्य पारं पडायचे,, एक दिवस उनाड जगून घेयचा कदाचीत सर्व उत्तर सापडतील हळू हळू
स्वछंदी जगून तर बघू....
स्वछंदी जगून तर बघू.....