Ashwini Kulkarni

Tragedy Others

4.0  

Ashwini Kulkarni

Tragedy Others

नववधू

नववधू

4 mins
311


आजचा विषय नववधू ती आणि फक्त तो...... 

 जगातील सर्वात सुंदर भावनिक नातं, नवरा बायको

 असंच नातं.. माझी प्रिय सखी             

विधी......... 

    विधी सुंदर, सालस , गोड, मस्तीखोर, सतत स्वप्नात भरकटणारी रोज नवीन स्वप्न आयुष्यात तिला काय करायचे हे तिने पुरेपूर ठरवले होते.. तिचे स्वप्न तिच्या डोळ्यात चमकायचे.

 बोलक्या डोळ्यांची विधि तडजोड मान्य नसत तिला कधी, 

 आयुष्यात कुठला रस्ता निवडायचा, 

माझा जोडीदार कसा असावा, इतर मुलींसारखी स्वप्न बघायची राजकुमारी च्या गोष्टी तिलाही भाराऊन टाकायच्या.  

    खरच छान सुंदर स्वप्नासारखं आयुष्य जगत होती विधी पण या मस्तीखोर विधीला माहिती नव्हते.

 तिच्याही आयुष्यात आता भयंकर वळण येणार होते. 

 एकदा गावी केली मामासोबत भाजी मंडई गेली. तिथे तिच्यावर एका व्यक्तीची नजर पडली बगताच क्षणी भारावलेला तो, त्याने दुसऱ्याच दिवशी मागणीचा प्रस्ताव घातला .. 

 या सर्व गोष्टींपासून बेखबर विधी....... 

    तुला आता लग्न करायचे हे मामा चे वाक् ऐकताच कावरी बावरी झाली.. 

अचानक खूप प्रश्नांनी गर्दी झाली तिच्या डोक्यात

 तिला विचारण्याची कोणाला गरजच वाटली नाही. तिला फक्त सांगण्यात आले. 

आता इथून पुढचा प्रवास घुटमळत असणार हे तिला आता कळून चुकले होते... म्हणतात ना माणूस सर्व जगाशी लढू शकतो पण आपल्या माणसाला पुढे हरून जातो. 

कधीही कुठल्याही बाबतीत तडजोड न करणारी विधी अचानक इतकी मोठी तडजोड करते. 

हे सर्व असं घडल्यामुळे विधि गप्प होऊन गेली.

लढणार तरी कोणाशी आपलीच माणस जिंकली तरी हरणार मीच, सुखासुखी लग्न पार पडले. विधी सासरी जायला निघाली. 

अचानक भावाने मागून प्रश्न केला.

    ताई तू रडत का नाही...

 विधीला कसलेही भान राहिलेले नाही...

   आता नव्या आयुष्याला तिच्या सुरुवात झाली होती. 

विधीसाठी सर्वकाही नवीन होतं आता हेच आपलं सर्वस्व ही तडजोड करायला शिकली होती... पहिल्या पावसानंतर जशी माती सुगंधित होते तसं तिच्या आयुष्याला सुगंध आला होता.. मेहंदीच्या रंगात रंगावे तसे ते संसारात ती रंगायला लागली होती. 

मोगऱ्याच्या मोहात पडावे तसे ती नवऱ्याच्या प्रेमातही पडायला लागली होती... 

हाच माझ्या स्वप्नातला राजकुमार असंही समजलं...... चैत्रात पालवी फुटावी त्याप्रमाणे विधीही मोहरली होती...

 आनंदाने संसाराला लागली होती. 

सर्वांचे मन जिंकण्याची आता तिला सवय होणे... सासरचे लोक तिचा अधिकार डावलून तिच्या कर्तव्याची जाणीव तिला करून द्यायला लागलेत.. हसत तिने तेही स्वीकारले. 

आता तिला बाळाची चाहूल लागली होती..

 पूर्ण आयुष्य बदलत चालेल होत तिच्या मनाविरुद्ध, 

 तरीही का कुणास ठाऊक तिला ते हवेहवेसे वाटायला लागले होते 

पण म्हणतात ना नव्या नवरीचे नऊ दिवस 

हळूहळू तिला माहेरच्या वरून टोमणे द्यायला सुरुवात झाली..

मग रोजचा शिवीगाळ आणि मारहाण तिच्यासाठी आता नवीन नव्हतं... तिला फोनवर बोलण्यासाठी अधिकार नव्हता. सांगणार तरी कुणाला, 

आता तर खरी रोजचे चटके होते..

 माहेरी जाणार तिच्यासोबत तिच्या नवऱ्याने ही जावे.. सांगावे तरी कसे आणि कुणाला,

 एक दिवशी संधी बघून तिने घरच्यांना सर्व सांगितले.. पण घरचेही म्हणाले  

 विधी तुला तडजोड करण्याची सवय नाही थोडाफार असतच सासरी तुझाही मस्ती खोर पणा कमी कर. लग्न झालय आता तुझ, तुझे तूच मिटव, घरच्यांनी विषयी धरसोड केला. 

वाईट वाटले पण तिला आता सहन करण्यापलिकडे उरले नव्हते काही, 

विधी सतत दडपणात राहायला लागली,,, 

  तिच्या नकळत तिच्या माहेरच्यांना फोन लावून तिचा बद्दल कानभरणी होऊ लागली तिच्या नातेवाईकांमध्ये ती चांगली नाही असे संवाद चालू व्हायला लागलेत ती या सगळ्या गोष्टींपासून बेखबर न केलेल्या चुकीची शिक्षा तिला भेटायला लागली असे काय मोठे चुकले होते तिचे 

तिच्याच मागे तिच्या घरचे असे कट-कारस्थान रचत होते.. हळूहळू विधीचा माहेरच्याशी संपर्क कमी झाला. 

अचानक असं का होतंय तिला कल्पनाही नव्हती तिला असं वाटायचं की माझ्या घरच्यांनी मला का वाळीत टाकले..

 आता तिला भावाने लग्नाच्या वेळेस केलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते.. ताई तू रडत का नाही? तिला पूर्ण आयुष रडायचे होते..रडायचे होते 

 बोलत बोलत तब्बल बारा वर्षे गेली..

 विधी आता दोन मुलांची आई झाली. 

पण काही गोष्टी आता मुलांसोबतच होऊ लागल्यात विधी आता शांत बसणार नव्हती.. 

 कारण प्रश्न तिचाच नाही तर मुलांच्या अस्तित्वाचा ही होता.. 

 जी तडजोड तिने आयुष्यभर केली .. त्याचे तिने शस्त्र बनवले.. मी केलेली तडजोड माझ्या मुलांनी का करावी, 

   आता बस आता नाही , असे पुटपुटत तिने पाऊल काढले घराबाहेर, 

  आता फक्त पाण्यात उतरायचं आहे ते किती खोल याचा विचार नाही करायचा, एकतर पोहायच नाहीतर बुडायचं असे तिने ठरवून टाकले..

 रोजचे मरण्यापेक्षा एकदाच मरावे.. नाहीतर पुरावे. 

कमीत कमी स्वतासाठी तरी प्रयत्न करायलाच हवा, आणि तिने नवी सुरुवात केली.

 नातेवाईक समाज, सर्व तिच्याविरुद्ध, तिने सर्व झुगारले. कारण ज्यावेळी तिच्यावर अन्याय झाला त्यावेळी कुठे होती हे सर्व, वारंवार मदत मागूनही तिला मदतीचा हात कधी कोणी पुढे केला नाही.. मेली म्हणून सोडून दिले. 

इतके वाईट कोणी असतं का जगात.. आपल्याच रक्ताच्या नात्याला आपल्या संस्कारांना इतका हतबल कोणी कसे बघू शकतो.. 

    तिने आता ठरवले तू आहे तर सर्व आहे. तू नाही तर काहीच नाही या जगात अशक्य असे काहीच नाही.. स्वतःसाठी लढ स्वतःसाठी जग 

 आई, वडील, मुलगा, मुलगी. भावंड, पण आपली लढाई ही आपलीच असते... one man shwo.... आणि आपल्यालाच लढावी लागते 

एवढे म्हणून तिने नवीन आयुष्याला सुरुवात केली. 

   शेवटी एवढं म्हणावसं वाटतं प्रयत्न करा परमेश्वर नक्की आहे तुम्ही त्याच्या देण्याची वाट बघत असाल कदाचित तो तुमच्या मेहनती ची वाट बघत असेल... 

    देव बदलण्यापेक्षा ध्येय बदला, तुमच्यासाठी काय योग्य आहे हे तुम्ही ठरवू शकता, लोक नाही या जगात अशक्य काहीच नाही.. बाकी परमेश्वर आहेत पाठीशी... आहेच पाठीशी....


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy