Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Ashwini Kulkarni

Others


2.3  

Ashwini Kulkarni

Others


आयुष्य

आयुष्य

2 mins 272 2 mins 272

आयुष्याचे गणित वाटते तितके सोपे असते का? असावे कदाचित माझीच गणिताची मांडणी चुकली असावी. 

म्हणून मला मनासारखी उत्तर मिळत नसावीत आपल्या आयुष्यातील प्रश्न आपल्याला जाणवत नाही लोक त्याचा उत्तर शोधण्याचा प्रयत्न का करत असावेत.. 

     आपल्या आयुष्याबद्दल पडलेली लोकांना प्रश्न आपल्या दृष्टीने मुळी तो प्रश्नच नसतो. 

आपण म्हणतो बऱ्याचदा प्रश्नातच उत्तर दडलेले असते. 

ऑल इज वेल,, असे म्हणून प्रश्न सुटतात का पण? आयुष्याचं कोडं इतक सोप असाव, 

का मग कोड पडावा अस आयुष्यच नसाव.. 

 दुसऱ्याच्या आयुष्याचे कोडे सोडविताना आपण कोड्यात पडतो , मग आपल्याच प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळत नाहीत, प्रत्येकाला जगण्याच विचाराच स्वातंत्र्य आहे.. म्हणून कदाचित त्यांना पडलेला अवघड प्रश्न माझ्यासाठी प्रश्नच नसावा. 

 मग उत्तराची अपेक्षा तरी का? 

 खूप काही पडलं जगात विचार करण्यासाठी आपण याचे त्याचे प्रश्न सोडवत बसलो आपले प्रश्न कोण सोडवणार.. 

 आपल्या जीवनाचा शिल्पकार आपणच आहोत. मग शब्दांना अलंकार द्यायला का हवय कुणी आपल्याला चांगले झाले तर मी केले आणि वाईट झाले तर तुम्ही चुकलेत, हे ऐकण्यापेक्षा आपले निर्णय आपण घ्यावेत. 

चांगले-वाईट याला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी.. 

    डोक्यातील प्रश्न मनातील विचार हे अशा प्रकारचे दलदल आहे जिथे माणूस बाहेर पडण्यासाठी जितकी धडपड करतो तितका तो त्यात गुरफटत जातो. 

आयुष्य सोपे करणे हे आपल्या हातात आहे.. 

    आपण घेतलेला निर्णय चुकीचा आहे. 

हे लोकांनी ठरवण्यापेक्षा तो निर्णय कसा योग्य आहे. या दिशेने आपल्यालाच वाटचाल करावी लागते. 

या जगात अशक्य असे काहीच नाही. 

प्रयत्न केले तर सर्वच मिळत. 

वादळ वारे वावधान भूकंप, हे सर्व सोसून माणूस पुन्हा जगतोच की लाख मोलाचा जीव वाचतो

आणखी काय हवे.. 

   अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या एवढ्याच गरजा असतात तरीही तो भौतिक सुखासाठी रात्रंदिवस स्वतःचा सापळा करीत असतो.

त्यांनी स्वतःला टाईम रोबो करून ठेवलं.       आपल्याला एक मन आहे त्या मनाची काही गरज आहे तो फक्त त्याच्या भौतिक, शारीरिक गरजा पूर्ण करतो. 

 हे काम झालं पाहिजे, हे घेतलेच पाहिजे, हे आणलच पाहिजे, होईलच, मिळवेल, यापलीकडे सुद्धा आयुष्य आहे काहीतरी माझ्या मुलांना सर्व सुखसोई चांगले शिक्षण मिळावे यासाठी झटत असतो. योग्यच आहे ते पण शिक्षण नोकरी लग्न या संकल्पनेत पडलेला तो स्वतःसाठी कधी जगत असतो.. 

    सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घड्याळाच्या काट्याप्रमाणे आपण फिरत असतो, कुणासाठी कशासाठी हा अट्टाहास ज्या कुटुंबासाठी आपण हें सर्व करतोय, -

ते हव आहे खरच त्यांना नाही त्यांना फक्त तुमचा वेळ हवा आहे.. 

प्रेमाने डोक्यावर हात कोड कौतुकाचे दोन बोल त्यांच्यासाठी तर हेच त्यांचे आयुष्य आहे -

आणि त्यातच त्यांचं सुख आहे. 

माहिती आहे का आलेला क्षण 

 फक्त जातोय, आपण कुठे जगतोय, आपण तर स्वतःला टाईम मशीन करून ठेवले आणि आपल्या आजूबाजूला असलेल्यांनाही आपण त्याच अपेक्षेने पाहतो. 

आजही बाळ आजारी पडल्यावर आईच्या कुशीत बर वाटते त्याला, 

त्यांना डॉक्टर नको असतो त्यांच्यासाठी सर्वात सुरक्षित जागा म्हणजे त्यांच्या आईची कुशी असते.. या प्रेमापुढे आणि या क्षणा पुढे सर्वच फिके असते.. 

    आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे लोकांना विचारांपेक्षा स्वतःला विचारा आपण सर्वांशी बोलतो स्वतः शी मात्र कधी बोलत नाही.. आपण आपल्यासाठी बेस्ट आहोत हे कधीच विसरायचे नाही. 

कधीच नाही.


Rate this content
Log in