प्रवास
प्रवास


डोळ्यावरती झापड पडावे तसे क्षणात सर्व वीस्कटावे
होईल सर्व ठीक म्हणत मनाला मात्र समजवावे
केलेत हात रिकामे त्याने
देईल तोच योग्य म्हणून वेळेलाही निभावून न्यावे
मात्र वेळेला कोडे पडावे इतके निर्णयाने कठोर व्हावे.
प्रश्नात कोडे की कोड्यात प्रश्न
याचे उत्तर मात्र गहन व्हावे
चांगुलपणाची शिदोरी सांभाळून सुद्धा नात्याने मात्र परके व्हावे,
हा तर वेळेचा हिशोब
निवडलात गुलाब मग काटेही सोसावे
वेळीच न घेतलेल्या निर्णयामुळे आयुष्य मात्र खडतर व्हावे
चलो कोई नही, देर आये दुरुस्त आये,,
म्हणत स्वतःला समजवावे,
हा तर झाला सारांश आयुष्याचा.
देवालाही नाही चुकला हा प्रवास साच्या
म्हणून तर राम वनवासाला जाण्याआधी रामच होते.
आता मात्र मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीराम झाले.
हिरा व्हायचं तर अग्नीपरीक्षा असणार
त्याशिवाय चमकण्याचा आनंदच कसा मिळणार
मी सूर्य माझे सर्व आप्त ग्रह , सूर्याला सोडून ग्रह अपूर्णच.
त्यांच्याशिवाय सूर्यही अपूर्णच हे उदाहरण मात्र मा राहिले स्वप्नंच,
माती वरती पाय घसरत आयुष्याचा झोका उंच न्यावा
तो मात्र तितकाच जोराने क्षणात कोसळावा
चित्र विचित्र होतात सगळे स्वप्न मातीमोल
म्हणून तर म्हणता दुनिया आहे गोल
ते सर्व ठीक आहे पण आयुष्याचा गोल ठरवता आला पाहिजे नाहीतर माणूस शुन्यात अटकतो.
अर्धे स्वप्न अर्धे भास बाकी जमा इतिहास,
म्हणतात आशा आणि अश्रू माणसाचे खरे मित्र कायम साथ देणारी
कारण आशा मरू देत नाही आणि अश्रू जगू देत नाही.
असो उंन्हा शिवाय सावलीला मजा नाही.
आणि दुःखाशिवाय सुखाला पर्याय नाही.
तरीही पंगतीत मजा न्यारी
कधी गोड कधी तिखट,
रुचकर आमची स्वारी
जीवना तुझी पंगतच न्यारी..
जीवना तुझी पंगत न्यारी...