Ashwini Kulkarni

Others

3  

Ashwini Kulkarni

Others

निसर्ग नियम

निसर्ग नियम

2 mins
748


आयुष्य म्हटले की चालायचं असे सहज म्हणण्या इतकं सोप असत का सर्व? 

   जितक्या सहज पणे म्हणतो तितक्या सहज पणे स्वीकारतो का हें सर्व,,, आयुष्यात कायमस्वरूपी असं काहीच राहत नाही सुख, दुःख, पैसा, पावर किंवा पुदीशन..... वस्तू ,, व्यक्ती आणि त्या व्यक्तीच्या मनातील स्थानसुद्धा... 

   प्रत्येक व्यक्तीच्या मनात एकच तगमग घर करत असते, एखाद्या गोष्टीची सवय होणं आणि अचानक त्यावर आपलं अधिकार शून्य होणं किती जीवघेणं असत. 

   हें माझं आहे असे म्हणण्या मागचं सुख आणि हें माझं होत हें असे म्हणण्या मागचं दुःख शब्दात मांडणं सुद्धा शक्य नसत. 

   एखादी गोष्ट मनापासून आवडणं सहाजिकच आहे. 

व्यक्तीचा, वस्तूचा, पैशाचा, पदाचा मोह होणं सुद्धा सहाजिक आहे.

    आणि तें स्वतःच्या सुखासाठी मिळवण्याचे आटो -कटीचे प्रयत्न सुद्धा योग्यच आहे. 

    पण तें मिळाल्यावर आपण त्याचा सुखद अनुभव घेण्यापेक्षा तें गमवाइच्या भीतीत आणि जीवघेण्या दडपणात जगत राहतो. 

   कायम स्वरूपी असे काहीच राहत नाही परिवर्तन हा तर निसर्ग नियम आहे,, म्हणून तर माणूस जे गमवायला घाबरत असतो तेच मात्र तो गमावून बसतो.

   हेच तर खरं चॅलेंज असत जगण्यासाठीच,

   पण निसर्गाने घडवून आणलेल्या बदलात माणसाची खूप तगमग होत असते.. 

 आणि एवढे करूनही तो बदल स्वीकारण्या पलीकडे त्याला पर्याय नसतो. 

   कारण प्रवाह विरुद्ध चालण्याचं धाडस कदाचितच कुणात असते. 

कारण तें मिळवण्यासाठी क्वचिततच कुणी प्रयत्न करत असावं.. 

   असो कस असत माणसाचं माणसाला नेमकी तेच हवं असत जे जगालेखी शून्य असत. 

    इतरांच्या नजरेत देखील त्याची किंमत काहीच नसते.. 

पण आपल्यासाठी तें आपल्या जगण्याची मूळ होऊन जातात        

   अशावेळी तो स्वतः किती हुशार असला तरी अक्कल शुन्याकडे सल्यांची अपेक्षा करतो,, 

    या युगाने तर पुस्तकांना सुद्धा मागे टाकले प्रत्येकाकडे अनुभवाचे बोल साचले,  

   कुठल्याच नात्यात प्रेमाचा ओलावा नाही प्रत्येक नातं शुष्क आणि कोरडं,,,हा म्हणेल तू दोषी तो म्हणेल दोषी तर तुझा पक्ष,,, 

    इतकं पडलेलं आवघड कोडं, उलगडा करण्याच्या नादात अजून विस्कळीत झालेलं प्रत्येक नातं इथलं 

   अशा वेळी काय करावं प्रत्येकाच्या मनात लहान मुलं दडलंय त्याला फक्त खुश ठेवावं. 

   निसर्गाचा नियम तर बदलणार नाही. आणि पहिलं बदलेल मन स्वीकारत नाही तोवर दुसरा बदल हें तर चालणारच,,, 

   फक्त स्वतः हा बदलावं.

 हवं असलेलं, आणि नकोस झालेल्या गोष्टींची सांगड घालावी. 

मग आयुष्याचा खेळ खेळून बघावा..... 

    मन मोठं केल कि घेता येत सामावून सर्व,, 

    नाहीतर स्वार्थी पणाच्या गोलात अडकून आयुष्य मात्र होणार इथे शून्य..... 

होणार इथे शून्य !!!!!!!


Rate this content
Log in