Ashwini Kulkarni

Tragedy Others

3.5  

Ashwini Kulkarni

Tragedy Others

स्त्री

स्त्री

4 mins
378


आज लिहावे असे काही जे प्रत्येक स्त्रीच्या अंतरी.....

 उठ उठ सरी उठ लवकरी.... 

हो वाघीण बिघडलेली..... 

वीज हो कडाडलेली.... 

सोसून झाले खूप आता तरी उठ.. 

हो दुर्गा हो काली आदर्श तू सिंधुताईचा ठेव आणि हो जागी... 

रनरनत्या या उन्हात कर सोन तुझं

घडवून नवा इतिहास वेळ आली खास... 

आपलेच होई आपले वैरी तेव्हा सोडावी चांगुल पणाची शिदोरी.... चांगुल पणाची शिदोरी 

ही कविता लिहताना अचानक उत्साह आला आणि स्त्री नाजूक विषय अगदी तिच्यासारखा लिहावे खास आणि करावे समर्पित माझा सर्व प्रिय सखी ना.. 

  गोंधळ उडाला मनी काय लिहावे आज तुझं वरी 

जगाचा कारभार चालावनारी त्याच अस्तित्व सांभाळून चालणारी स्त्री तिला उरलय कुठलं अस्तित्व तरी ती खुश हमखास स्त्री जी अष्टभुजा नारायणी आहे, 

 रोजच्या अनेक भूमिका पार पडताना तिची तारे वरची कसरत तरी सुद्धा हसतमुख सदा तीगाडी नको..नको बंगला.. नको सोन नान.. हवा हात 

शब्बासकिचा पाठी, करावे कौतुक दोन शब्दात तरी जिकंतो कुणी तीच मन, ती सुखावते तिने जन्म दिलेल्या लेकराचं कोडं कौतुकात, 

मिळतो आनंद तिला त्या भाबड्या जीवात, 

मुलं तीच विश्व् असणारी स्त्री... म्हणून म्हणतात ना एक बाई हरू शकते पण आई नेहमीच जिंकते एक स्त्री दोनदा जन्म घेते एकदा जेव्हा ती तिच्या आईच्या उदरी येते आणि दुसरी जेव्हा ती स्वतः आई होते.

आणि एका मुलीची आईची भूमिका पार पाडताना तिची खरी कसरत होते कारण प्रश्न असतो तिच्या संस्काराचा, खरं तर तीच आयुष्य पूर्ण प्रश्नांनानी 

भरलेलं असते पण तिला द्यायचं असतात ते संस्कार जे तिला तिचा आईकडून मिळालेली शिदोरी असते, 

आणि ती शिदोरी ती मुलांना देत असते माझं काय चुकलं तर नसेल ना असं सतत स्वतःशी पुटपुटनारी स्त्री घरच्या साठी छोटीशी बाहुली असणारी मुलगी कधी बाई होते आणि सासरचे कारभार सांभाळते समजतच नाही. 

   जगात अशापण स्त्रिया असतात ज्या सतत मला नाही जमणार म्हणनाऱ्या आणि हे फक्त मलाच जमेल असेही म्हणाऱ्या, 

उपास तपास व्रतवेकल्या आपली संस्कृती आहे.. घरची स्त्री हि या घराण्यातील गृह लक्ष्मी आहे असं म्हणणारे लोक पण आहेत समाजात 

 आपल्या डोळ्यावर असलेल्या पापण्या सारखे बायकोला जपणारे असे पुरुष देखील आहेत समाजात, तर त्या उलट काही स्रियांना तोंड दाबून बुकी चा मार हि अवस्था आहे. 

याला हि कुठं तरी स्त्री जबाबदार आहे अन्याय करणं चुकीचं आहे तस ते सहन करणं सुद्धा चुकीचं आहे. 

सासरच्या लोकांचा छळ स्वीकारून नवऱ्याने मारले तर फुल पडता असं समजणाऱ्या स्त्रिया.. जर याला संस्कार म्हणतं असतील तर असे संस्कार नसलेलं बर असे वाटू लागते.

प्रत्येक परस्थितीचा कारक समाज त्यातील स्त्री पुरुष, 80%स्त्रिया नातं तुटू नये या प्रयत्नात असतात. 

कारण एकटी स्त्री राहूच शकत नाही जगूच शकत नाही अशा भूरसटलेल्या विचारांना आपला समाज संस्कार म्हणतो,  

आपलं नातं तुटू नये म्हणून ती स्वप्नाचा बळी देते तिचा जन्म फक्त चूल मुलं पर्यंत मर्यादित असावा का?  

कधी कुणी तिच्या मनाची घालमेल घुटमळ समजून घेतली का? 

आज स्त्री ला 50%आरक्षण आहे तिला मानाचं स्थान दिल मिळवून पण समाजात भूरसटले

लोक हि आहेत मी बोलते ती फक्त बायकोच नाही, ती स्त्री आहे ती कुणाची आई असू शकते, मुलगी, बहीण, किंवा मैत्रिणी हे सर्व सामान्य स्त्री विषयी आहे. 

आपल्या मुलीला राणी सारखं वागवाव तिच्या सासरच्यानी असं म्हणाऱ्या जेव्हा तुमच्या सुनेची वेळ येते तेव्हा तुमचा कायदा अस्तित्वात नसतो.   आज कुठली हि स्त्री घ्या बिनधास्त पणे समाजात वावरत नाही, तिला भीती समाजाची नसते ती तर स्वतःचा मनाची भीती असते.. आरे मी हे कपडे घालू कि नको मला लोक नाव ठेवतील.. आरे माझ्याकडे का असं बगताय माझं काय चुकलंय का सतत कसला तरी विचार मनात तिच्या, समाज म्हणजे कोण हो कुणाला एवढा वेळ एकमेकांना पाहिला कोण कुणाला ओळखते, समाज म्हणजे आपलेच लोक एक पुरुषा पासून स्त्रीला कधीच धोका नसतो तिला धोका असतो स्त्री पासूनच एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या वाईट होण्याचं कारण बनते, मग त्या बहिणी असो सासू सुना किंवा नणंद भाऊजय असो आणि माणसांना काय माहिती.. घरात किंवा गल्लीत काय चालू.. हें तर स्त्री सत्र .. त्यांचा डोक्यात भरणारे सुद्धा स्त्रीच असते, आज पुरुषा चा तिचा विषयी दृष्टीकोन बदलत चालाय त्याला कारणीभूत स्त्री आहेच कि... 

घरात बाहेर ऑफिस मध्ये पुरुष नाही, तर एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला अपमानित करण्यासाठी ती स्वतः सुद्धा खूप खालच्या पातळीस जात असते.  आणि मग त्यात स्वतःच नुकसान करून घेते, माहितीये..... मुलगी जेव्हा जन्माला येते तेव्हा माझी परी माझी परी म्हणणारे बाप आधी तिचे पंख छाटून टाकतात.. बंधन असावीत पाबंद नको.. समाजाची भीती आपणच तिचा मनात घालतो, सतत तिला असं वाटू लागत मी मुलगी म्हणून जन्माला येऊन चुकी केली, आणि 

समाजाप्रति तिची नकारात्मक स्तिती तयार होते स्वतःचे निर्णय सुद्धा घेयला ती सक्षम राहत नाही आणि अजून आपण तिला म्हणतो सोड हे तुझ्याकडून होत नाही. 

  संस्कार दया तिला उडू दया मुक्त गगनात घेउद्या ना तिला मंत्र मुग्ध भरारी करुद्या ना थोडा -वेडेपणा तोपण जगण्यासाठी महत्वाचा असतो. 

विश्वास ठेवा संस्कारवर आपल्या, माझं पाखरू उडून पुंन्हा इथेच येणार.

काही ठिकाणी स्त्री पुरुषाचा खांद्याला खांदा लावून काम करतेय पूर्णपणे तिला आधार देणारे पुरुष पण आहेत. 

तिच्यावर विश्वास टाकल्या मुळे ती चुकून सुद्धा कुठली चुकी करत नाही, 

 या जगात परिपूर्ण असं कुणीच नाही. 

      विश्वासाचा भाग आहे कुणाला दगडात देव दिसतो कुणाला सोन्याचा मूर्तीत सुद्धा नाही.

विषय असतो तो काय स्वीकारणे आणि काय नाकारने, 

असेही लोक आहेत ज्या स्त्री स्वतःसाठी जगतात स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जगतात त्यांना समाजाच्या पूर्ण विरुद्ध उभ केल जात.. तू कशी चुकीची आहे हें पुरेपूर पटून दिल जात,, आणि तिथे नाहीच काही शक्य झालं, तिथे तिच्या चारित्र्यावर बोट ठेवली जात.आणि 

 पुरुष स्वतःच मकडतो आणि पुटपुटतो आता कशी जाशील पुढे सांग...? 

इतकं असत काहो खरंच एक स्त्री काय मागते कुणीतरी समजून घेणारा आणि समजून सांगणारा वक्ती असा जो तिला ठेस लागताच घाबरेल आणि म्हणेल हिला काय झालं तर मी काय करू कसा जगू.. फक्त तिला परक नका समजू स्त्री समजायला खूप सोपी आहे.. तिला समजा तुम्ही तिला जेव्हा समजलना तेव्हा तिचे स्वप्न नकळत तुमचे होईल,  

 आणि तेव्हा तीच हसून म्हणेल आहो असुद्या तुम्हाला नाही आवडत तर तुमच्या सुखात माझं सुख आहे. 

बघा तर बोलून हसत हसत बळी देईल तिचा स्वप्नाचा तोही फक्त तुमच्यासाठी.. 

मीही एक स्त्री आहे. म्हणून एक सांगावेसे वाटते 

    ती आहे तर सर्व आहे, ती आहे म्हणून अर्थ, ती नाही तर सर्वच व्यर्थ सर्वच व्यर्थ आणि पदोपदी आशा छोट्या छोट्या गोष्टीचा हसत हसत त्याग करणाऱ्या त्या त्याग मूर्तीला अखेर एवढच म्हणेल,, 

      स्त्री जन्मा हि तुझी  कहाणी, हृदयात अमृत नयना पाणी नयना पाणी....... Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy